Mumbai News Updates, 23 November 2022 : सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसताना आता कर्नाटक सरकारने थेट सांगलीतल्या जत तालुक्यामधली ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा विषय दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live, 23 November 2022 : रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
जामनेर तालुक्यातील पहूर येथे पेट्रोलपंपासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी करणार्या पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या लाचखोर निरीक्षकाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत रंगेहाथ अटक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर…
विरार : आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. बातमी वाचा सविस्तर...
ठाणे, पालघर, जळगाव जिल्ह्यांच्या हद्दीत वाहने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी, दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्यावर पालघर, ठाणे, जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही आरोप केले. मात्र, आता या प्रकरणा सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे आरोप खोटे ठरले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. “ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते, त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे… ही केवळ लाचारी आहे”, अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा समाचार घेतला.
ट्विटरमधील नोकरकपात त्यानंतर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुरू झालेले राजीनामासत्र पाहता ट्विटरच्या भवितव्याबाबत काही युजर्संकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही मायक्रो ब्लॉगिंग साईट टिकणार नाही, असा कयास काही युजर्सकडून बांधला जात आहे. या टीकाकारांना एलॉन मस्क यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजीचा समावेश आहे. या कुटुंबियांचे मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी आढळून आले आहेत.
जत तालुक्यामधली ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. सविस्तर वाचा
कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. जतमधील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याच ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत. पाणी तसेच इतर प्रश्नांच्या निमित्ताने जतमधील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला होता. याच ठरावाचा आधार घेऊन बोम्मई यांनी हा दावा केला आहे. सविस्तर वाचा
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली.