Marathi News Updates : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या कोठडीत असून वाल्मिक कराडचा या घटनेत संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही. तसेच सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. याबरोबरच एचएमपीव्ही विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. त्यामुळे याबाबत आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

13:45 (IST) 8 Jan 2025

अजित पवार गटाकडून तुम्हाला पक्षात येण्याची ऑफर आहे का? निलेश लंकेंनी स्पष्ट सांगितलं

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंके यांनी म्हटलं की, “मी असो किंवा आमच्या बाकीच्या खासदारांबरोबर अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्व खासदार एकसंघ आहोत. आमच्याकडून पक्षाला कधीही दगाफटका होईल असं आम्ही काही करणार नाहीत. राजकारणात सर्व गोष्टींना सामोरं जावं लागण्याची तयारी ठेवावी लागते”, असं खासदार निलेश लंके यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलं.

13:30 (IST) 8 Jan 2025

येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील येवला आणि लासलगाव या दोन्ही आगारांना बसेसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रकरणात अखेर ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लक्ष घातले आहे. येवला, लासलगाव आगारांना प्रत्येकी २५ नवीन बस प्राधान्याने देण्याची मागणी भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

वाचा सविस्तर…

13:29 (IST) 8 Jan 2025

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा

पुणे : रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना रुग्णालयात तोडफोड करुन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारती हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

वाचा सविस्तर…

13:27 (IST) 8 Jan 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केल्या सूचना, म्हणाले…!

पुणे : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी काय करावे याचा सात कलमी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना राबविण्याच्या सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांसाठी हा उपक्रम असून, याचा आढावा १५ एप्रिलला घेतला जाणार आहे.

सविस्तर वाचा…

13:23 (IST) 8 Jan 2025

शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी नगरसेवकांच्या या प्रवेशामुळे शहर भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

वाचा सविस्तर…

13:15 (IST) 8 Jan 2025

ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा, ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील…

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित व अभिषेक बबलू ठाकूर यांच्या सरकारनगर येथील बंगल्यावर तसेच सर्व प्रतिष्ठानवर एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी पहाटे चार वाजता छापे टाकल्याने खळबळ उडाली. सविस्तर वाचा

13:15 (IST) 8 Jan 2025

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…

राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. मात्र, हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे.

सविस्तर वाचा

13:14 (IST) 8 Jan 2025

दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून सद्यस्थितीत सुरु आहे.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 8 Jan 2025

ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी

घोडबंदर येथील कासारवडवली ते भिवंडीतील खारबाव असा खाडीपुलाबरोबच जोडरस्ता तयार करण्याच्या प्रकल्पाची आखणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 8 Jan 2025

ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक

ठाणे, कल्याण-डोंबविली आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत विविध रस्ते प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

13:11 (IST) 8 Jan 2025

कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत

कल्याण – मानवी शरीरावर अपाय करणाऱ्या, सरकारने प्रतिबंधित केलेल्या औषधाच्या साठ्यासह दोन जणांना पोलीस उपायुक्तांच्या अवैध धंद्यावर कारवाई पथकाने अटक केली आहे. हे दोघेही कल्याणमधील भोईवाडा, कोनगाव मधील रहिवासी आहेत. सविस्तर वाचा

13:11 (IST) 8 Jan 2025

ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल दिड वर्षात खुले होणार; व्यापारी संकुलातील आठ मजले रेल्वे देणार भाड्याने

ठाणे पुर्व रेल्वे स्थानकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सॅटीस पुलाची उभारणी करण्यात येत असून याच पुलाला जोडून पुर्व स्थानक परिसरात ११ मजली व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार आहे. सविस्तर वाचा

13:10 (IST) 8 Jan 2025

बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय

नवी मुंबईची उभारणी करत असताना सिडकोने अल्प उत्पन्न गटातील रहिवासी, माथाडी कामगार तसेच आर्टिस्ट व्हिलेजसारख्या वसाहतींमध्ये उभारलेल्या बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीत मोठा अडथळा ठरत असलेली पार्किंगची अट काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सविस्तर वाचा

13:07 (IST) 8 Jan 2025

पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत

मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित उरणमधील जेएनपीए बंदरातील पागोटे ते चौक या ३० किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे मुंबई पुणे मार्गातील जवळपास २० किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अतिजलद गतीने होणार आहे. सविस्तर वाचा

13:05 (IST) 8 Jan 2025

धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ यांचे बोलविते धनी कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. सविस्तर वाचा

13:04 (IST) 8 Jan 2025

‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?

भोपाळमधील ‘युनियन कार्बाईड’च्या कारखान्यात ४० वर्षांपूर्वी झालेल्या भीषण वायूगळतीचे दुष्परिणाम तेथील नागरिक अजूनही भोगत आहेत. त्या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाच्याही समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. सविस्तर वाचा

12:39 (IST) 8 Jan 2025

पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पत्नी, सासू आणि मेहुणीने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस केल्याच्या आरोपावरुन पत्नी, सासू, मेहुणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 8 Jan 2025

सांगलीत छाप्यात एकल प्लॅस्टिक जप्त

सांगली : महापालिकेने एकल वापराच्या प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी आज विविध ठिकाणी छापा टाकत ८० किलो प्लॅस्टिक जप्त करत व्यावसायिकांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले.

मंगळवारी उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशाने आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती एकमधील सांगली येथे एकल वापर प्लॅस्टिक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

12:31 (IST) 8 Jan 2025

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक

सांगली : घरफोड्या करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक करून चार घरफोड्या उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मंगळवारी दिली. या चोरट्याकडून चोरीतील साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घरफोडी प्रकरणी सुदर्शन सुनील यादव (वय १९ रा. भोसे ता. मिरज), मुनीब मुश्ताक भाटकर (वय १९ रा. आंबा चौक, सांगली) आणि दीपक गंगाप्पा आवळे (वय २० रा. शंभर फुटी, सांगली) या तिघांना अटक करण्यात आली असून, अक्षय ऊर्फ पिंट्या दोडमणी (रा. वाडेफाटा सातारा) हा परागंदा झाला आहे. तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ४ लाख २४ हजारांचे सोन्याचे दागिने, १८ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि २१ हजार ७०० रुपयांची रोकड असा ४ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

12:31 (IST) 8 Jan 2025

एसटी बसला मालमोटारीची धडक; मिरजेजवळ अपघातात १९ जखमी

सांगली : मिरजेहून कवठेमहांकाळला निघालेल्या एसटी बसला सळी वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह १९ जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत तानंग फाटा येथे घडला. जखमी विद्यार्थ्यांना मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर शासकीय निवासस्थानी धाडण्यात आले.

मिरज येथील क्रीडा स्पर्धेसाठी कवठेमहांकाळ येथील शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी आले होते. स्पर्धा पार पडल्यानंतर एसटी बसने (एमएच ४० एक्यू ६३६८) ते परतत होते. या दरम्यान, लोखंडी सळी वाहतूक करणारी मालमोटार कुपवाडकडे येत होती. या मालमोटारीने तानंग फाटा येथे बसला मागील बाजूला धडक दिली. यामध्ये शाळेचे १३ विद्यार्थी आणि बसमधील अन्य सहा प्रवासी जखमी झाले.

12:29 (IST) 8 Jan 2025

म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप शुक्रवारपासून सुरू

सांगली : पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री आ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

आ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक पार पडली. यंदा पाऊस चांगला झाल्याने पूर्व भागात हंगामी बागायती पिकांची लागवड वाढली आहे. यामुळे पाण्याची गरजही वाढली असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असल्याने म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्यात येत आहे. म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप शुक्रवार दि. १० जानेवारीपासून सुरू करण्याची सूचना आ. खाडे यांनी बैठकीत केली. या सिंचन योजनेचे पाणी मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतीला उपलब्ध होणार आहे.

12:28 (IST) 8 Jan 2025

गडहिंग्लजमध्ये ‘स्मार्ट मीटर’ विरोधात मोर्चा; मीटर बसवण्यास स्थगिती

कोल्हापूर : महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम थांबवावी, या मागणीसाठी गडहिंग्लजमध्ये विविध पक्षांनी मोर्चा काढला. यावेळी महावितरणच्या अभियंत्यांनी अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यास पुढील आदेश येईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवावे, असे पत्र सादर केले.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम आदानी इलेक्ट्रिसिटी मार्फत सुरू आहे. याला विरोध दर्शवीत आज महायुती वगळता अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

12:25 (IST) 8 Jan 2025

दुचाकी खड्ड्यात पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

सातारा : आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरून नीरा (ता. बारामती)कडे जात असताना पाडेगाव (ता. खंडाळा)च्या हद्दीत दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात बारावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. अंकिता अनिल धायगुडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

12:24 (IST) 8 Jan 2025

कुलगुरू निवड निकषांतील बदलांचे स्वागत

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीच्या निकषांची व्याप्ती वाढविण्याच्या प्रस्तावित नियमावलीचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, अन्य क्षेत्रांतून व्यक्ती निवडण्यासाठी निकष अधिक काटेकोर करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 8 Jan 2025

सातारा शहरात ‘ई बस’ सुरू करण्याचा प्रस्ताव – शिवेंद्रसिंहराजे

सातारा : शहराची झालेली हद्दवाढ आणि वाढता विस्तार लक्षात घेता पालिकेची महापालिका व शहरात ई-बस वाहतूक (सिटी बस) सुरू करणार आहोत. या संदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व सचिव संजय शेट्टी यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा शहर पत्रकार दिनाच्या कर्यक्रमानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी अनेक विषयांवर मत व्यक्त केले. त्या वेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, शहराध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, उपाध्यक्ष उमेश भांबरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मुख्याधिकारी अभिजित बापट, ओंकार कदम, सनी शिंदे आदी उपस्थित होते.

12:22 (IST) 8 Jan 2025

साताऱ्याचा अनिकेत शिंदे ‘यूपीएससी’त देशात १८ वा

सातारा – देऊर (ता. कोरेगाव)चे अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोगद्वारे घेतलेल्या परीक्षेत देशात १८ वा क्रमांक पटकावला. त्यांची इपीएफओ अंमलबजावणी अधिकारी, भारत सरकार या पदी निवड झाली आहे. यापूर्वीही त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परीक्षेमध्ये राज्यात ९२ वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी पदी निवड झाली आहे.

12:21 (IST) 8 Jan 2025

हवेत गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या तरुणाला कोठडी

सोलापूर : हवेत गोळीबार करून त्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी शोध घेऊन अटक केली आहे. मोहोळ तालुक्यातील खवणी गावात हा प्रकार घडला.

प्रशांत तुकाराम भोसले (रा. खवणी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मोहोळ येथील न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. समाजात स्वतःची दहशत पसरवण्याच्या उद्देशाने प्रशांत भोसले याने पिस्तूलने हवेत गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

12:09 (IST) 8 Jan 2025

काय सांगता! शेगावात टक्कल पडण्याची साथ! अचानक केस गळती होऊन…

बुलढाणा : शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होणे सुरू झाले असून काही दिवसातच त्यांचे टक्कल पडत असल्याने तालुक्यात हाहाकार उडाला आहे. आरोग्य यंत्रनांनी सर्वेक्षण सुरु केले असले तरी या ‘टक्कल साथ’चे नेमके कारण काय याबद्दल यंत्रणाचं संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या विचित्र आणि अभूतपूर्व आजाराने नागरिक भयभीत झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 8 Jan 2025

शहरी नक्षलवाद प्रकरण : विधिच्या परीक्षेसाठी महेश राऊतला अंतरिम जामीन

मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला आरोपी महेश राऊत याला विधि शाखेच्या पदवी परीक्षेला बसण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाने मंगळवारी १८ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चकोर भाविस्कर यांनी राऊत याला १३ ते ३० जानेवारी या कालावधीत विधि शाखेची पदवी परीक्षा देता यावी, यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला. राऊत याला २०१८ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. त्यामुळे, तात्पुरता जामीन मंजूर करताना राऊत याने राहत्या घराच्या पत्ता तसेच भ्रमणध्वनी क्रमांक तुरुंग अधिकारी व तपास यंत्रणांना उपलब्ध करावा, अशा सूचना त्याला करण्यात आल्या. मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये आणि परीक्षेच्या अंतिम दिवशी तुरुंग अधिकाऱ्यांना शरण यावे, असे आदेश न्यायालयाकडून राऊत याला देण्यात आले आहेत.

10:32 (IST) 8 Jan 2025

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीचं कारण काय?

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. मात्र, आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला नेमकं कशासाठी गेलेत? या भेटीत काही राजकीय चर्चा होणार आहे का? आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात असल्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा होते? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे.