Maharashtra Political News Updates : अलिकडच्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या पुण्यातल्या सभेत शिवसेनेच्या शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर टीका केली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. त्यावरही आज प्रतिक्रिया पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजुला रत्नागिरीतल्या बारसू येथील रिफायनरीला होत असलेला स्थानिकांचा विरोध आणि त्यावरून तापलेलं राजकीय वातावरण आजही पाहायला मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today : राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकलवर
नागपूर : संजय राऊत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे डोके तपासून घ्यावे. आतापर्यंत राऊत जे काही बोलले ते खरे झाले का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीका राज्याचे कृषी मंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी केली.
जळगाव: तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभी असलेली मालमोटार उलटून त्याखाली दबून आडोशाला उभ्या असलेल्या अभियंत्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
अकोला: वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील मोहम्मद अली मार्गावरील अमरसिंह आयुर्वेदिक औषधी दुकान व गोदामावर छापा टाकला. यामध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष, नखे, शिंग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
मुंबईः बोरिवली पूर्व येथे राहत्या घरी तरूणीने गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सनी कुशाळकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईः अनैतिक संबंधाच्या संशयावरून धारावी परिसरात महिलेची पतीने हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.
नागपूर: पाणथळ संवर्धनात भारताने उत्तम कामगिरी बजावली असून मागील नऊ वर्षात ४९ नवीन पाणथळ जागा रामसर यादीत समाविष्ट झाल्या. त्यामुळे रामसर यादीत समाविष्ट पाणथळांची संख्या ७५ झाली आहे.
कल्याण: अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यांमधून रात्रीच्या वेळेत किमती ऐवज चोरणाऱ्या चार जणांना कल्याण लोहमार्ग गु्न्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईलसह १० लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.
मुंबईः गावदेवी येथील कारमायकल रोड परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातून सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
पुणे: उत्तरप्रदेश विधानसभेचे आमदार आणि मंत्री असल्याची बतावणी करत टोळीने पुण्यातील एका मार्बल व्यवसायिकाला ३० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवत पाच लाख ३४ हजार रुपायंची फसवणूक केली.
पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी एकच्या सुमारास खोपोली एक्झिट येथे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीविहितहानी झालेली नाही.
आज, गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका बसला. देवळी तालुक्यात एक म्हैस तसेच समुद्रपूर तालुक्यात दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले. देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील सुभाष गामे यांच्या घराचे टिनाचे छत उडून गेले. गोठ्यांचे नुकसान झाले.
राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत दिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची, तर ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे.
गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून ट्रॅक्टरने परत येत असताना झालेल्या अपघातात तीन महिला ठार, तर ३० जण जखमी झाल्याची घटना रंगधामपेठा चेक गावाजवळ घडली.
डोंबिवली: कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गा जवळ किलोमीटर अंतर दर्शविणारा एक टोकदार लोखंडी दिशादर्शक रेल्वे रुळाच्या बाजुला लावण्यात आला आहे. हा दिशादर्शक दरवाजात बेसावधपणे उभ्या असणाऱ्या प्रवाशासाठी धोकादायक आहे.
जळगाव: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा मिळविण्याचे आमिष देत शहरातील तरुणाची सुमारे १५ लाख ३५ हजारांत ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दांम्पत्य राज्यभरात चर्चेत आहे. वर्षभरापुर्वी राणा दांम्पत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडल्याने राणा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला.
गेल्या वर्षी जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुनरागमन केले आहे. बुधवार, २६ एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पळसगाव ते सर्रेगाव परिसरात सायंकाळी एका गुराख्याला हत्तींचा कळप दिसला. पडताळणी केली असता जिल्ह्यातील सीमेवर कळपाचे लोकेशन दिसून आले.
भाजपाच्या कोणत्याही नेत्यांवर संजय राऊतांनी टीका करू नये, अन्यथा त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही खरे शिवसैनिक आहोत. संजय राऊतांसारखे चाईनिज मॉडेल आम्ही नाही, अशी खोचक टीका आमदार नितेश राणे यांनी यांनी केली आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबांवरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकल्याचे दिसून आले आहे. यामुळे दिवाबत्ती खांब पडण्याचे, खांबावरील ब्रॅकेट व फिटिंगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असून त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांत पक्षाला राजधानी मुंबईत कधीच विस्तार करता आलेला नाही. पक्षाने अनेक प्रयोग केले पण त्यात यश आले नाही. यातूनत बहुधा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत पक्षाच्या दोन मेळाव्यांना हजेरी लावून नेते आणि कार्यकर्त्यांना नैतिक बळ देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे थैमान बुधवारी चांगलेच वाढले. बुधवारी रात्री यवतमाळ शहरात विजांचे तांडव अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला.
पुणे: विवाह समारंभात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी नेण्यावरुन नातेवाईक मंडळी आणि केटरिंग व्यावसयायिकात हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागातील शेवाळवाडीत घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अर्ज माघारीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेली हाणामारी गाजली असतांनाच आता या निवडणुकीसाठी मतदानाचे स्थळ हे शहराच्या एका टोकाला बाजार समितीपासून दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहा वेळा वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे पाच हजार शेतकऱ्यांची चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी गर्भात सात महिन्याचे बाळ दगावले. आठ दिवसांपासून ‘ती’ शस्त्रक्रियेची वाट बघत आहे. रुग्णालय प्रशासनाला विचारल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील विदारक परिस्थिती बघितल्यास गरिबांना जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
या वेळी मन की बातचा शंभरावा भाग, सदस्य नोंदणी, आगामी निवडणुका व अन्य विषयावर हसत खेळत चर्चा झाल्याची माहिती मिळाली. मेघे आपल्या तब्येतीची या काळात जाणीव करून देत आता उरले काय,असा निश्र्वास सोडत असतात. त्यावेळी धीर देत खा.तडस यांनी एक शेर सादर केला.
वाहतूक पोलीस दलात लाचखोरी वाढली असून अनेक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी घोळका करून वाहनचालकांकडून वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. अजनी वाहतूक परीमंडळाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने परिचारिका असलेल्या महिलेला चालान बनविण्याचा धाक दाखवून शंभर रुपयांची लाच घेतली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील नवा गोंधळ समोर आला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे ‘एमकेसीएल’ला परीक्षेचे काम देणे अंगलट आले असून गुणपत्रिका छपाईसाठी न दिल्याने दीड वर्षांपासून मूळ गुणपत्रिकाच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

‘एडीआर’च्या वतीने देशातील २८ राज्यांच्या विधानसभा आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मंत्रिमंडळाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात मंत्र्यांची संपत्ती, गुन्हे, वय, लिंग यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील ६५ टक्के मंत्र्यांवर हत्या, अपहरण, विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोण आहेत अमोल कोल्हेंचे ‘आदर्श मुख्यमंत्री’?
खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्याचवेळी तेच आदर्श मुख्यमंत्री असल्याचाही अमोल कोल्हेंनी उल्लेख केला. “शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण आखणी सुरू असताना मी कायम बघायचो. अनेकदा आम्ही कधी कार्यालयात भेटायचो, कधी साहेबांच्या घरी भेटायचो. एका सुसंस्कृत घरातला तरुण काय असू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रतीक दादा आणि राजवर्धन दादा. यात कुठेही अवाजवी, स्वत:हून काही सांगणं नाही. काही विचारल्याशिवाय स्वत:हून काही बोलणं नाही अशी त्यांची वागणूक राहिली”, असं कोल्हे म्हणाले.