Pune-Maharashtra Breaking News Today, 20 Oct 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. तर, मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आल्याने आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

याशिवाय महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने कारवाई करत पीएफआयच्या पनवेल सचिवासह बंदी घातलेल्या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक केली आहे.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सर्व घडामोडी वाचा सविस्तर फक्त एकाच क्लिकरवर.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सर्व घडामोडी वाचा सविस्तर फक्त एकाच क्लिकरवर.

19:34 (IST) 20 Oct 2022
भांडूपमध्ये तांत्रिक बिघाड, २० मिनिटांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील मध्य रेल्वेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी मागील साधारणत: २० मिनिटांपासून परळ रेल्वेसाथानकावर रेल्वे जागेवरच थांबलेल्या आहेत. भांडूप रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले जात आहे.

18:18 (IST) 20 Oct 2022
मुंबई : अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी लाच मागणाऱ्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा

अतिक्रमणाविरोधात कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी असतानाही के-पश्चिम विभाग कार्यालयातील दुय्यम अभियंत्याने कारवाई करण्यासाठी लाच मागितली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 20 Oct 2022
क्षी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन पेटलं,'ब्रिज मॅन'ची होतेय चर्चा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

चीनच्या अध्यक्षपदी क्षी जिनपींग यांची पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे चीनमध्ये तसेच इतर देशांतही आंदोलन केले जात आहे. चीनमधील ‘झिरो कोव्हिड पॉलिसी’ला विरोध केला जात आहे. तसेच जिनपिंग यांना पदच्यूत्त करावे, अशी मागणी केली जात आहे. चीनची राजधानी बिजिंग येथे झळकलेल्या काही पोस्टर्समुळे हे आंदोलन पेटले आहे. दरम्यान, हे आंदलोन का होत आहे? आंदोलनामागे कोण आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. वाचा सविस्तर

17:49 (IST) 20 Oct 2022
उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…”

माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलत आहेत, पण शिक्षक एकच आहे, आणि बोलायचे तेच असते. शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती, की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर

17:48 (IST) 20 Oct 2022
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, ‘भू-विकास’ बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय

धोधो बरसणाऱ्या परतीच्या पावसामुळे राज्यातील दीड लाख हेक्टवरील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे शेतीवर मोठं संकट उभ राहिले आहे. त्यातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वाचा सविस्तर

17:17 (IST) 20 Oct 2022
Viral Audio: जयललिता यांच्या मृत्यूच्या तपासाला नवं वळण, व्हायरल ऑडिओमुळे शशिकला यांच्यावर संशय बळावला

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची एक लीक झालेली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अरुमुघस्वामी आयोगाचा अहवाल राज्य विधानसभेत सादर झाल्यानंतर पुढे आलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे जयललिता यांच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण लागलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

17:09 (IST) 20 Oct 2022
भंडारा : अट्टल चोराला कारवाई न करता सोडून देणे पोलिसांना भोवले ; पाच निलंबित

चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या एका अट्टल चोराला कारवाई न करताच सोडून देणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

सविस्तर वाचा

16:46 (IST) 20 Oct 2022
हाती शिवबंधन बांधताच संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंसमोरच केली घोषणा; म्हणाले

आगामी काळात संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय देशमुख यांना बळ दिले जाणार आहे. तर संजय देशमुख यांनीदेखील विदर्भात उद्धव ठाकरे यांचे समर्थक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पुढील काळात विदर्भातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे गटात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे संजय राठोड यांनी सांगितले. वाचा सविस्तर

16:45 (IST) 20 Oct 2022
पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? बंधू धनंजय मुंडे यांची खास प्रतिक्रिया; म्हणाले

लवकरच दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये नाराज नेत्यांसह भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते तथा पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधीही त्यांनी (पंकजा मुंडे) मंत्री म्हणून काम केलेलं आहे. भाजपा मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर

16:33 (IST) 20 Oct 2022
बुलढाणा: जालना-खामगाव रेल्वेमार्ग होणारच; रेल्वे राज्यमंत्री दानवेंचे वक्तव्य ‘त्या’ कार्यक्रमापुरतेच मर्यादित – खा. प्रतापराव जाधव

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील कार्यक्रमात प्रस्तावित जालना-जळगाव व जालना-खामगाव रेल्वेमार्गाविषयी केलेली विधाने त्या कार्यक्रमापुरतीच मर्यादित होती. समाज माध्यमांवर त्यांच्या विधानाचा विपर्यास करून माहिती प्रसारित करण्यात आली.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 20 Oct 2022
ठाणे: दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील ‘या’ परिसरांत वाहतूक बदल

दिवाळी पहाट निमित्ताने सोमवारी तलावपाली, नौपाडा, गोखले रोड परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. त्यामुळे परिसरातील पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावपाली परिसरात दरवर्षी खासदार राजन विचारे यांच्यातर्फे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सविस्तर वाचा

16:19 (IST) 20 Oct 2022
मुंबई: अनिल देशमुख यांची ‘दिवाळी पहाट’ घरी की तुरुंगात?; जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जामीन द्यायचा की नाही याचा  निर्णय विशेष न्यायालय शुक्रवारी देणार आहे. या प्रकरणात जामीन मिळाल्यास देशमुख यांची कारागृहातून सुटका होईल. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

सविस्तर वाचा

15:50 (IST) 20 Oct 2022
बेरोजगारांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार करणार १० लाख रिक्त जागांसाठी महाभरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याचे उद्धघाटन करणार आहेत. या मेळाव्यात १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी वाचा...

15:39 (IST) 20 Oct 2022
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट; धनंजय मुंडे म्हणाले, “कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं…”

आज राज्यात शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरत आहेत, हे माहिती नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच हे सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले असून त्यांना दुसरं काहाही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा -

15:02 (IST) 20 Oct 2022
वाशीम : जिल्हा परिषद सदस्य सुरेश मापारींच्या अपात्रतेला स्थगिती ; उच्च न्यायालयाचा दिलासा

जिल्हा परिषद सदस्य सुरेश मापारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. पदाचा दुरूपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मापारी यांना जि.प. सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश १९ ऑक्टोबर रोजी दिला होता.

सविस्तर वाचा

15:00 (IST) 20 Oct 2022
रानटी हत्ती गावात अन् गावकरी विस्थापित ; नागनडोहवासियांची दिवाळी आश्रय छावणीतच !

आधीच पुनर्वसनासारखा गुंतागुंतीचा विषय, त्यावरही हातावरचे जगणे, आज पोट भरलं तर उद्याचे काय ?, अशा अवस्थेत कसेबसे आयुष्याचा गाडा हाकणारे नागणडोह पाड्यातील आदिवासी दिवाळीच्या तोंडावर आपल्या घरापासून दूर बोरटोला येथे दिवस काढत आहेत.

सविस्तर वाचा

14:54 (IST) 20 Oct 2022
भंडारा कारागृहात ‘शोले स्टाईल’ ड्रामा; कैदी चढला झाडावर, मग झाले असे की…

भंडारा कारागृहात मंगळवारी सायंकाळी ‘शोले स्टाईल’ ड्रामा पहायला मिळाला. कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढून एका कैद्याने संपूर्ण कारागृह प्रशासनाला वेठीस धरले. जोरजोराने ओरडून त्याने आत्महत्येचा इशारा दिल्याने कारागृहात एकच खळबळ उडाली. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला झाडाखाली उतरवण्यात प्रशासनाला यश आले.

सविस्तर वाचा

14:52 (IST) 20 Oct 2022
पुणे: ओला दुष्काळ, पूरस्थितीत सरकारचे अस्तित्वच नाही; धनंजय मुंडे यांची टीका

राज्यात ओला दुष्काळ आणि पूर परिस्थितीचे संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्रच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्यातील सरकारचे अस्तित्वच कोठे दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 20 Oct 2022
“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र

राज्यात परतीच्या पावसामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखी पिकं काढून ठेवली होती. मात्र, पावसामुळे ही पिकं खराब झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून या शेकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिले आहे. सविस्तर वाचा -

13:54 (IST) 20 Oct 2022
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलचा गौरव; मुख्यमंत्र्यांकडून २ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यास रोख २ कोटी रुपये देण्याचे आज(गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. वाचा सविस्तर बातमी...

13:29 (IST) 20 Oct 2022
नागपूर : महिलेशी मैत्री करून तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आईशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा युवकाने गैरफायदा घेत तिच्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना पारडीत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

सविस्तर वाचा

13:28 (IST) 20 Oct 2022
पुणे : नगर महामार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक बंद

शिक्रापूर-चाकण मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने पुणे-नगर महामार्गावर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

12:50 (IST) 20 Oct 2022
मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रकरण : आझाद मैदान पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हा वर्ग

मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती देणारा दूरध्वनी केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. संबंधित गुन्हा नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांना वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सविस्तर वाचा

12:42 (IST) 20 Oct 2022
“वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…”, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्र

दिवाळी निमित्त मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्याकरिता भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच ”जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावणार नाहीत”, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला. सविस्तर वाचा -

12:11 (IST) 20 Oct 2022
दादर-स्वारगेट ‘शिवशाही’ महागली ; एसटीची उद्यापासून १० टक्के हंगामी भाडेवाढ

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 20 Oct 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील नागरिकांची दिवाळी गोड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोपरी- पाचपखडी मतदार संघात दिवाळी साहित्याचे पाट खुले केल्याचे चित्र आहे. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत शिंदे यांच्याकडून मतदार संघातील नागरिकांना दिवाळी साहित्याची भेट देण्यात येत आहे. मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत ही भेट घरोघरी पोहचविली जात आहे. त्यामुळे या नागरिकांची दिवाळी गोड होताना दिसत आहे.

सविस्तर बातमी

11:41 (IST) 20 Oct 2022
“गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत, मनसुख हिरेन….” – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ!

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका दादरस्थित गौरी भिडे यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:29 (IST) 20 Oct 2022
‘क्षी जिनपिंग महान नेते नाहीत’, बिजिंगमध्ये झळकलं पोस्टर, देशभरातून राष्ट्राध्यक्षांना हटवण्याची मागणी

क्षी जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सध्या चीनमध्ये आंदोलन सुरु आहे. राजधानी बिजिंगमध्ये झळकावण्यात आलेलं एक पोस्टर यासाठी कारणीभूत ठरलं. या पोस्टरमध्ये क्षी जिनपिंग यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. कडक लॉकडाउन आणि निर्बंधांचा या पोस्टरमधून निषेध करण्यात आला होता. यानंतर संपूर्ण चीनमध्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरलं आहे.

सविस्तर बातमी

11:28 (IST) 20 Oct 2022
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन मारली उडी

मुंबईत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पारस पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले असून, तपास सुरु आहे.

सविस्तर बातमी

11:23 (IST) 20 Oct 2022
दहशतवाद्याची पुन्हा पाठराखण, पाकिस्तानी दहशतवाद्याला काळ्या यादीत टाकण्याच्या भारत-अमेरिकेच्या प्रयत्नाला चीनचा खोडा

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलाह सईद याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ठेवला होता. हा प्रस्ताव तांत्रिक कारण देत चीनने स्थगित केला आहे.

सविस्तर बातमी वाचा...

ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते, असंही ते म्हणाले आहेत.

 

Story img Loader