Mumbai Pune Latest News Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेला भाजपा आणि शिंदे गटाकडून आजपासून सुरुवात केली जात आहे. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी आज काष्ट जाणार असून त्याच्या यात्रेमध्ये अनेक सेलेब्रिटी मंडळींची उपस्थिती अपेक्षित आहे, तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi Batmya Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं – अजित पवार</p>
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – शरद पवार
पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
“पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिली.
गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मला मनाला विश्वास वाटत होता की आजारी असतानाही त्यांच्याबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतील. पण दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या ठरल्या. पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं – चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. बापट यांच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
आत्ताच गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी ऐकली. महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता – विनायक राऊत
आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय – जगदीश मुळीक
नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद काहिसे शमण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे शिंदे गटाने शहरात ‘बघा हेच खरे गद्दार’ असा उल्लेख करीत बुधवारी खासदार संजय राऊत यांना फलकाद्वारे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, याकडे छायाचित्राद्वारे लक्ष वेधण्यात आले.
नगर : महापालिकेची निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच नगर शहरात राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीसाठी रस्सीखेच आणि राजकारण सुरू झाले आहे.
जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातावर चक्क औषधी लिहून (प्रिस्क्रिप्शन) दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार येथील डॉक्टरांनी केला की परिसरातील असामाजिक तत्त्वांनी मेयोला बदनाम करण्यासाठी केला हे प्रशासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून स्पष्ट होईल.
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषी (पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील चौक) चौकात दुमजली उड्डाणपूल आणि हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पोलिसांकडून मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख लांबणीवर पडत आहे.

संजय राऊतांनी एक सूचक ट्वीट केलं असून त्यासोबत 'भारत माता की जय' असंही लिहिलं आहे. या ट्वीटमध्ये राऊतांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यात एक घोडा एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधल्याचं दिसत आहे. या फोटोवर “किती अजब गोष्ट आहे. जेव्हा गुलामीची सवय लागते, तेव्हा प्रत्येकजण आपली ताकद विसरून जातो”, असं लिहिलेलं आहे.
भारत माता की जय! pic.twitter.com/r6E4kCt03S
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने सीबीडी गांजा विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली असून, त्याच्याकडून ७० हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. विशाल लक्ष्मण घोडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सीबीडी बेलापूर येथील टाटानगर झोपडपट्टीत राहतो.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांना इतकं आजारी असताना भाजपाने प्रचारात का उतरवलं म्हणून टीकाही झाली होती. आता त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याबाबत काही वेळाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी काल माध्यमांशी बोलताना दिले होते. दूध संघाच्या माजी सदस्यांनी अद्याप पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. सविस्तर वाचा
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आक्रमक झाले. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. गटतट विसरून काँग्रेस नेते यानिमित्ताने एकत्र आले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले.
सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्राही काढण्याची घोषणा भाजपा शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या यात्रेच्या आयोजनावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या यात्रेवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तर मिळत असतील तर आम्ही या यात्रेचं स्वागत करू असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
वने आणि वन्यजीव संरक्षणात लोकसहभाग वाढवण्यासाठी राज्याच्या वनखात्याकडून विविध उपक्रम राबवले जातात. आता याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वनगीतांची रचना तयार करण्यात येणार आहे. सोबतच संरक्षण आणि पोलीस खात्यात असणाऱ्या ‘बँड’ प्रमाणे वनखात्याचाही बँड तयार करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
भीमा खोऱ्यातील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर केला.
शहरातील क्षयरुग्णांना पोषण किट देण्यासाठी रुग्णांचे पालकत्व स्वीकारण्याचे महापालिकेने आवाहन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. शिवाय स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांद्वारे दत्तक घेण्यात आले असून त्या सर्व क्षयरुग्णांचा चाचणी अहवाल नकारात्मक (निगेटीव्ह) आला आहे. सविस्तर वाचा…
पुणे : शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुंडाला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश शासनाने मंजूर केलेली स्मशानभूमीची जागा ‘गायब’ झाल्याने आलोडीकर अवाक झाले आहे. वर्धेलगत असणाऱ्या आलोडी परिसरात जागेला सोन्याचे भाव आले आहे. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीची विस्तीर्ण जागा शासनाच्या लेखी बेदखल करण्याची बाब आश्चर्याची समजल्या जाते. सविस्तर वाचा…
जनुक कोष निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यासाठी तत्कालीन सरकारने पाच वर्षांकरिता सुमारे १७२ कोटी रुपये मंजूर केले. मात्र, या प्रकल्पासाठी अजूनही सरकारकडून निधी वळता झाला नाही. सविस्तर वाचा…
भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा – माजरी रस्त्यावरील शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजताचे सुमारास घडली. सविस्तर वाचा…
दोषी ठरवलेल्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावे या माग चौकशी समितीने डझनभर अधिकाऱ्यांना दोषी ठरवल्यानंतर देखील प्रशासनाकडून कारवाई होत नाही. याविरोधात तक्रारकर्ते जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे. णीसाठी आंदोलन केले जात आहे. सविस्तर वाचा…
बदल्याचं राजकारण चालूच आहे. पण मोदी बदला कुणाशी घेतायत, का घेतायत, त्यासाठी अदाणीला का वाचवतायत? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिल्ली विधानसभेत केलेलं भाषण बोलकं आहे. ते म्हणाले अदाणी हा फक्त चेहरा आहे. त्याच्याकडचे सगळे पैसे मोदींचे आहेत. म्हणून ते अदाणींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच अदाणींचा विकास झालाय. मोदी आजही इतर सगळ्या मुद्द्यांवर बोलता आहेत. विरोधकांशी संघर्ष करत आहेत. राहुल गांधींनी २० हजार कोटींचा प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्ही उत्तर द्या. सूड, बदला, मुख्यमंत्री असताना काय झालं हा पुढचा प्रश्न आहे.
तानाजी सावंत म्हणतात, “जे बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांना जमलं नाही, ती किमया आम्ही करून दाखवली!”
संजय राऊत म्हणतात, “डॉक्टर पायलीला ५० मिळत असतात महाराष्ट्रात. एकनाथ शिंदेंनी एक शस्त्रक्रिया स्वत:वर करावी!”