Mumbai Pune Latest News Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेला भाजपा आणि शिंदे गटाकडून आजपासून सुरुवात केली जात आहे. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी आज काष्ट जाणार असून त्याच्या यात्रेमध्ये अनेक सेलेब्रिटी मंडळींची उपस्थिती अपेक्षित आहे, तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Batmya Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:24 (IST) 29 Mar 2023
खासदार गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील अंत्ययात्रेत सहभागी

पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहे. बापट यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

18:22 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

पुण्यात गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

17:57 (IST) 29 Mar 2023
सांगली : द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून १ कोटीची लूट करणारी टोळी २४ तासांत गजाआड

सांगली : द्राक्ष व्यापार्‍याला मारहाण करून एक कोटीहून अधिक रक्कम लुटणार्‍या टोळीला गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. लुटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बसवराज तेली यांनी बुधवारी सायंकाळी दिली.

सविस्तर वाचा..

17:48 (IST) 29 Mar 2023
अबब! महावितरणलाच तब्बल २१२३ कोटींच्या थकबाकीचा ‘शॉक’, वीज पुरवठा तोडणार…

महावितरण ग्राहकांना अधूनमधून लहान मध्यम धक्के देत राहते. मात्र, यावेळी जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणलाच तब्बल २१२३ कोटी रुपये थकबाकीचा मोठा ‘शॉक’ दिल्याचे चित्र आहे. यामुळे नूतन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या समक्ष महा वसुलीचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. सविस्तर वाचा…

17:47 (IST) 29 Mar 2023
दीड लाखांवर शेतकऱ्यांना दिलासा; १७४ कोटींची भरपाई मिळणार, रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात

अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीकविम्याची रक्कम मिळाल्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी मदतीस पात्र आहेत. यातील ९० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ झाल्या आहे. सविस्तर वाचा…

17:39 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death : गिरीश बापट यांचे अमरावतीशी नाते

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्‍यांचे मूळ गाव चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील सावंगी मग्रापूर. अनेकवेळा ते आपल्‍या गावी येत होते. गावातील प्रत्‍येक कुटुंबाला आपल्‍यातील माणूस गेल्‍याचे दु:ख झाले आहे. सविस्तर वाचा…

17:36 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: गिरीश बापट यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती – राज ठाकरे

17:05 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: …तेव्हा गिरीश बापटांना पाहून आमचं मन अस्वस्थ झालं – संजय राऊत

कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने आम्ही गिरीश बापटांना पाहिलं, ते पाहून आमचं मन अस्वस्थ झालं. ते ब्राह्मण समाजाचा चेहरा होते, पण तरीही सगळ्या समाजातल्या लोकांना गिरीश बापट आपले वाटत होते – संजय राऊत

16:45 (IST) 29 Mar 2023
चंद्रपुरातून सागाचं काष्ठ अयोध्येच्या दिशेनं निघालं…

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातून सागाचे काष्ठ अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यासाठी चंद्रपूरच्या बल्लारपूरमधून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे.

16:43 (IST) 29 Mar 2023
नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू राहतील

नवी मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी आता सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामाच्या दिवशी वीज देयके भरणा शक्य नसल्याने थकबाकी वाढत आहे. वीजबिल वसुली अत्यंत गरजेची असल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी, तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवारी राम नवमी, शनिवार व रविवारी वीज भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.

सविस्तर वाचा..

16:28 (IST) 29 Mar 2023
नवी मुंबई : एप्रिलमध्ये शहरातील धोकादायक वृक्ष सर्वेक्षणाला होणार सुरुवात

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना सुरुवात होत असते. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच शहरातील धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.

सविस्तर वाचा..

16:26 (IST) 29 Mar 2023
ठाणे जिल्ह्यात ३६ महिन्यात १८ बालविवाह रोखण्यात यश; ठाणे आणि कल्याण तालुक्यांतही बालविवाह

ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, मुंबई लगत असलेल्या या ठाणे जिल्ह्यात शहरीकरण होऊनही छुप्या पद्धतीने बालविवाह सुरूच असल्याचे वास्तवही समोर आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि कल्याण या तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

16:11 (IST) 29 Mar 2023
उजव्यांमधला डावा…

उजव्यांमधला डावा, अशी ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांनी आयुष्यभर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय मैत्री केली. ती मैत्री राजकारणाने डागाळली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा खरा पिंड होता. गेल्या काही वर्षांत राजकारणात जात धर्म यांना आलेले महत्त्व गिरीश बापटांना जराही शिवले नाही, याचे हे कारण. पक्ष म्हणून असलेली शिस्त पाळतानाही, आपल्या स्वभावाला मुरड किती आणि कशी घालायची, याबद्दलचे त्यांचे बरोबर आडाखे असत.

सविस्तर वाचा..

16:10 (IST) 29 Mar 2023
रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे उद्या चौथे भूमिपूजन; नितीन गडकरी यांची उपस्थिती

अलिबाग – मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे. केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत खारपाडा येथे हा सोहळा पार पडणार आहे. चौथ्या भूमिपूजन सोहळ्यानंतर तरी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा कोकणवासियांना असणार आहे.

सविस्तर वाचा..

15:02 (IST) 29 Mar 2023
यवतमाळ : अमृत योजनेत साडेसहा कोटींची अनियमितता; कार्यकारी अभियंत्याला अटक

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कंत्राटदार व वीज वितरणचे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.

सविस्तर वाचा..

14:42 (IST) 29 Mar 2023
भाजपाचा जेष्ठ लढवय्या नेता हरपला; गिरीश बापट यांच्या जाण्याने व्यथित झालोय – सुधीर मुनगंटीवार

गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. गिरीश बापट यांच्या जाण्याचे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गतीप्रदान करो अश्या शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

14:29 (IST) 29 Mar 2023
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या; करमुसे प्रकरणात झाली होती अटक

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.

सविस्तर वाचा…

14:18 (IST) 29 Mar 2023
टेल्को कंपनीत कामगार ते खासदार; गिरीश बापट यांची कारकिर्द

पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान बापट यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१९ पासून ते पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते.

वाचा सविस्तर…

14:00 (IST) 29 Mar 2023
राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या सागवानावरून श्रेयवाद; अलापल्ली येथे शोभायात्रा काढणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार

जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

13:59 (IST) 29 Mar 2023
गोड बातमी….कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘पाळणा’ हलणार ! तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांच्या जन्माचे वेध

नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यूने हळहळलेल्या चित्ताप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्यप्रदेशातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘साशा’ नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्यानातील दोन मादी चित्ता गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा…

13:58 (IST) 29 Mar 2023
बुलढाणा जिल्ह्यातील ‘हे’ दांडीबहाद्दर नेते प्रदेश काँग्रेसच्या रडारवर; प्रदेशाध्यक्षांच्या आदेशामुळे..

प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून बडेजाव मिरवणाऱ्या जिल्ह्यातील ९ नेत्यांवर आता प्रदेश व जिल्हा काँग्रेस समितीची करडी नजर राहणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. सविस्तर वाचा…

13:57 (IST) 29 Mar 2023
बुलढाणा : प्रक्षोभक भाषण, जातीय व सामाजिक तेढ वाढवल्याचा आरोप; हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंसह अठरा जणांविरुद्ध गुन्हे

आक्रमक व जहाल वक्तव्याबद्धल चर्चेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह अठरा जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. परवानगी नसताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य व भाषण करून जातीय तणाव व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:56 (IST) 29 Mar 2023
‘ई ऑफिस’ : वर्धा जिल्हा ठरला राज्यात अव्वल; तालुका स्तरावरही…

ई ऑफिस प्रणाली हा तर आता परवलीचा शब्द झाला आहे. पण त्याचे विकेद्रीकरण मात्र अपेक्षित असे झालेले नसल्याचे चित्र दिसून येते. वर्धा जिल्हा मात्र यात गतिमान ठरत असून तालुका पातळीवर असे संगणक संचालित कार्यालय कार्यरत होऊ लागले आहेत.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 29 Mar 2023
संजय राऊतांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधींची भेट!

स्वातंत्र्यवीर सारवकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात असताना त्यासंदर्भात संजय राऊतांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

13:55 (IST) 29 Mar 2023
चंद्रपुरात ‘‘हर घर राहुल गांधी”! पडोलीतील प्रत्येक घरावर छायाचित्र; एनएसयूआयचा उपक्रम

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात एनएसयूआयच्यावतीने चंद्रपूर शहरातील पडोली येथील प्रत्येक घरावर राहुल गांधी यांचे छायाचित्र लावून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव जनतेला करून दिली जात आहे.

सविस्तर वाचा…

13:54 (IST) 29 Mar 2023
“राजकारणातील गुरुतुल्य मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड”, आमदार महेश लांडगे यांचे वक्तव्य

भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीष बापट यांच्या निधनावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी आली. पुणे जिल्ह्यातील एक प्रखर राष्ट्राभिमानी नेता आपण गमावला. माझ्या राजकीय जीवनात बापट साहेबांनी कायम ताकद दिली. २०१४ ते २०१९ या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने माझ्या राजकीय वाटचालीतील गुरुतुल्य मार्गदर्शक हरपला आहे”, असे महेश लांडगे म्हणाले.

13:47 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: देवेंद्र फडणवीसांचा शोकसंदेश…

पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले – देवेंद्र फडणवीस

13:28 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: भाजपा खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन; संध्याकाळी ७ वाजता होणार अंत्यसंस्कार

Girish Bapat Passed Away: भाजपा खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन…

वाचा सविस्तर

13:27 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: त्यांची माहिती पाहून चकित व्हायचो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

13:20 (IST) 29 Mar 2023
Girish Bapat Death: पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं – अजित पवार

काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते निर्धारानं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो – अजित पवार

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)