Mumbai Maharashtra Breaking News , 06 September 2023: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मनोज जरांगे अध्यादेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सराकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
पिंपरी : गणेश मंडळांनी ध्वनिवर्धक यंत्रणा लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वनिप्रदूषण करु नये. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केल्या.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे.
ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल. निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल.
१. वंशावळीत कुणबी उल्लेख असल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल.
२. आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
३. समिती महिन्याभरात आरक्षणासंदर्भात अहवाल देणार
४. चुकीच्या पद्धतीने आंदोलकांवर दाखल केलेले खटले हटवले जाणार
ना शिंगरू उठले, ना मदतीसाठी कोणी धावून आले. मुक्या प्राण्यांच्या भावनाही मुक्याच ठरल्या.
बुलढाणा: शेगाव आगाराच्या लांब पल्ल्याच्या बसचे ब्रेक ऐन प्रवासात निकामी झाल्याने त्यातील सुमारे ४५ प्रवाश्यांचे जीव धोक्यात आले होते.
मी त्या गोष्टीला महत्त्वच देत नाही. माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे. राजकारण आंदोलनात घुसलं अन फसलं ते उद्योग बघ म्हणावं तुझे तू. आमच्या लफड्यात तू पडू नको. हे मराठवाड्याचं गबाळं जमलेलं आहे. खानदानी पोरांनी आंदोलन उभं केलं आहे. हे काय कुठल्या राजकारण्यानी-फाजकारण्यानी आंदोलन केलेलं नाही. हे महाराष्ट्रातले जातवाहन पोरं आहेत. आम्ही आमचे गरीबाचे लेकरं आहोत. आम्ही आमच्या भाकऱ्या आणतो, इथे जेवतो आणि उघड्यावर झोपतो. आंदोलनावर कोणता डाग वगैरे लावू नको. तुझं जर नाव कळालं ना, तुझं टमराळंच वाजवीन मी.. जो कुणी आंदोलन करणारा आहे तो… – मनोज जरांगे पाटील
मागणी करून पर्याय आम्हीच देत आहोत, पुरावेही आम्हीच देत आहोत. पण तरीही तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर आंदोलनाला किंवा जनतेला सरकारच वेठीला धरतंय असा अर्थ निघण्याची शक्यता आहे – मनोज जरांगे पाटील
तुमची समिती वर्षभरात जेवढा डाटा गोळा करेल, तेवढा आम्ही तुम्हाला एका दिवसात देतोय. त्यामुळे आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय – मनोज जरांगे
राज्यपालांची परवानगी घेऊन कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे. वटहुकूम जारी केला जाऊ शकतो. आम्ही दिलेले पुरावे घेऊन वटहुकूम काढण्याचा निर्णय घ्या – मनोज जरांगे
विधानसभा नसली तरी आपण वटहुकूम काढू शकता इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला दिले आहेत. आता सरकारने मुदत मागण्याचं कारण नाही. एका दिवसात आपण राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढू शकता. मी तुमच्यासोबत तज्ज्ञही पाठवायला तयार आहे. आता सरकारने वेळ मागू नये. – मनोज जरांगे
पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मागील वर्षी वडघर येथील विसर्जन घाटावर दुर्घटनेत ११ जणांना विजेचा शॉक लागल्याने गणेशभक्तांमध्ये खळबळ माजली होती. या घटनेतून बोध घेऊन यंदा पनवेल पालिका प्रशासनाने २० वेगवेगळे कृत्रिम तलाव आणि प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणाऱ्या मुख्य अशा चार विसर्जन घाटांवर देखभाल दुरुस्तीसाठी तसेच वीज व्यवस्था मंडपासाठी विशेष नियोजन केले आहे.
वाशिम: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात होते. त्यांनी सकाळी १० वाजे दरम्यान थेट शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली.
भंडारा : शासकीय आयटीआय तुमसर येथील यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स या पदावर कार्यरत असलेले शिल्पनिदेशक योगेश नगरकर यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून शिक्षकदिनीच आत्महत्या केली. या घटनेने शिक्षण विश्वात खळबळ उडाली आहे.
जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना विचारणा केली असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (६ सप्टेंबर) अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून 'इंडिया' नावाचा वापर टाळला जात आहे त्यावर सडकून टीका केली. “देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचं नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
जालन्याच्या उपोषणावर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. तो सौम्यच्या ऐवजी मोठा झाला. इंडिया आघाडीची बैठक त्याच काळात होती. त्यावरून लक्ष वळवण्यासाठी केलेलं हे पाप होतं. त्यात ते फसले. फडणवीसांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात पहिल्यांदा माफी मागितली. त्यांनी गुन्हा केला म्हणून त्यांनी माफी मागितली – नाना पटोले
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावरील 1 जानेवारी, 2016 नंतर कायमस्वरुपी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आजही लागू केला जात नाही. त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे. 7 वा वेतन आयोग हा सगळ्यांना लागू केलाच पाहीजे, असं कायदा सांगत असताना ठाणे महानगरपालिका ही कोणाची जहागीर आहे की, जे मनात येईल ते करतात – जितेंद्र आव्हाड
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावरील 1 जानेवारी, 2016 नंतर कायमस्वरुपी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आजही लागू केला जात नाही. त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे. 7 वा वेतन आयोग हा सगळ्यांना लागू केलाच पाहीजे, असं कायदा सांगत असताना ठाणे महानगरपालिका ही कोणाची जहागीर…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 6, 2023
कोल्हापूर : मराठा समाज आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यातून वाद वाढत चालला असताना बुधवारी रेखावार यांनी याप्रकरणी मराठा समाजाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. राहुल रेखावर यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात मराठा नेत्याकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला होता. हा वाद तीन आठवडे तापत होता, पण आता त्यांनी या माध्यमातून वादावर पडदा टाकला आहे.
ठाणे: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या निगा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नागपूर : राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी स्वच्छ हवेसाठी एकत्रित येऊन आभासी मानवी साखळी (व्हर्च्युअल ह्यूमन चेन) तयार केली आहे. सात सप्टेंबर या ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज’च्या निमित्ताने या संस्था, जागरुक नागरिक एकवटले आहेत.
देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबतीत जातीचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. मग मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले. शरद पवार यांच्यासमोर मी लहान तरीही प्रश्न विचारतो जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत ते तुम्हांला चालतात त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात आमच्या वंशजांचा पुरावा मागितला जातो ते कसे चालतात ?
देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबतीत जातीचे घाणेरडे राजकारण सुरु आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2023
मग मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले.
शरद पवार यांच्यासमोर मी लहान
तरीही प्रश्न विचारतो
जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत ते तुम्हांला चालतात
त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात… pic.twitter.com/oYfaecxWg0
मी राज्यपालांना विनंती केली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्यावी की राज्य चालवायचं कसं? कारण सगळीकडे अंदाधुंद कारभार दिसतोय. राज्यात एक घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत. यात नेमका जनरल डायर कोण? हे समोर यायला हवं. काय होणार तुम्हाला आत्ताच सांगतो. खारघर प्रकरणी चौकशी नेमली तशी बसवली जाईल. जेव्हा अहवाल येईल तेव्हा एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला सस्पेंड केलं जाईल. पण सरकारमधून ज्यांनी आदेश दिले, त्यांना काहीही होणार नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे – आदित्य ठाकरे
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केली आहे. सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेण्यासाठी लाठीचार्ज केला गेला. लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. अशा कारवाईसाठी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडून आदेश घेतले जातात. पण हे म्हणतात आम्ही आदेश दिलेच नाहीत. असं असेल तर मग सरकार चाललंय कसं? – आदित्य ठाकरे
सिडकोने उरण तालुक्यात बोकडवीरा ते नवीन शेवा व फुंडे विद्यालय ते नवघर असे तीन रेल्वे उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र या तिन्ही पुलांवर सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे.
गोंदिया : यंदा पावसाने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. यामुळेच पाऊस शेवटच्या टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील ३२ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी केवळ पाच प्रकल्पांत १०० टक्के पाण्याचा साठा आहे. मात्र, इतर प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने अनेक प्रकल्प रिकामेच आहेत. अशा स्थितीत मुसळधार पावसाची नितांत गरज आहे, मात्र, तसे न झाल्यास पुढील वर्ष कठीण जाईल.
अमरावती : भीष्मक राजा यांची कन्या रुक्मिणी अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनासाठी आल्या असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे हरण केले, अशी आख्यायिका आहे. पण या मंदिरासोबतच स्थानिक माताखिडकी परिसरातील पुरातन श्रीकृष्ण मंदिराचेही नाते आहे. या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा अध्यादेश निघेपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.
छत्रपती चौकात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. येथे जी-२० च्या प्रचार फलकाचा वापर वाहतूक कठडे म्हणून केला जात आहे.
नागपूर : महागाई, बेरोगारी, शेतमालास भाव तसेच तपास यंत्रणेचा दुरुपयोग, आदी मुद्दे घेऊन काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसंवाद यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेची जबाबदारी प्रमुख नेत्यांमध्ये विभागीयनिहाय वाटून घेण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Maharashtra Live News Today: जाणून घ्या राजकीय, सामाजिक व गुन्हेगारी जगतातील महत्त्वाच्या बातम्या