Maharashtra Political News Updates, 24 February 2023: चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदारसंघात रोड शो केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, “काल त्यांनी प्रचाराचे भाषण देखील घरी बसून दिले, त्यांना माहीत होतं की इथे पराभव होणारच आहे. मग मतदारसंघात जाऊन ती काय फायदा? आधीही ते घरीच बसले होते, आताही घरूनच भाषण करत आहेत.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

Live Updates
13:33 (IST) 24 Feb 2023
नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार

बनावट बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या आधारे गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी आता महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना त्यांची प्रमाणपत्रे त्यांच्यासह महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 24 Feb 2023
नागपूर : ३० ट्रकचा मालक, करोनात डबघाईस आला, नुकसान भरून काढण्यासाठी…

पंजाबमधील ३० ट्रकचा मालक असलेल्या वाहतूकदाराला करोनात खूप नुकसान झाले. त्यामुळे त्याला सर्व ट्रक विकावे लागले. करोनात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने काही साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून चोरीचे ट्रक विक्री करण्याची योजना आखली.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 24 Feb 2023
गडचिरोली : विदेशी पर्यटकांसाठी वाघाची शिकार आयोजित करणारे ‘पोर्ला इस्टेट’चे नवाब! वाचा सविस्तर…

देशात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर भारत सरकारने १९७२ मध्ये बंदी घातली. तेव्हापर्यंत देशात शिकार पर्यटन हा व्यवसाय अस्तित्वात होता. त्यात वाघाच्या शिकारीसाठी विदेशातून पर्यटक यायचे. मध्य भारतात असेच एक ठिकाण प्रसिद्ध होते ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘पोर्ला इस्टेट’.

सविस्तर वाचा

13:28 (IST) 24 Feb 2023
विद्युत जोडणी कापल्यामुळे धान उत्पादक संतप्त

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने विद्युत बिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार पंपची जोडणी कापण्याचा सपाटा सुरू केला आहे. या विरोधात सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा प्रश्न आ. मनोहर चांद्रिकापुरे यांच्या समोर उपस्थित केला.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 24 Feb 2023
‘आपला दवाखान्यां’त १९ दिवसात एक लाख रुग्णांवर उपचार, ‘जी उत्तर’ विभागातील १७ दवाखान्यांत एक लाखांहून अधिक रुग्णांना सेवा

प्रभादेवी परिसरातील सेंच्युरी बाजार येथील म्हाडा वसाहतीमध्ये सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून २१ जणांची दोन कोटी ३० लाख  रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 24 Feb 2023
कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरण; ग्रामसेवकासह, सरपंच आणि सदस्यांवर गुन्हा दाखल

अलिबाग : कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहाजणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 24 Feb 2023
नवी मुंबई पोलिसांचा दणका,करोडोंच्या गुटख्यासह चार आरोपी जेरबंद

नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या तुर्भे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी एका संशयित टेम्पो मधून तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त केला होता,त्याच अनुषंगाने तपासात आणखी एका गुजरात मधून आलेल्या कंटेनरसह ताब्यात घेऊन तपासात कंटेनर मध्ये जवळपास 60 लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले, आतापर्यंत पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

12:03 (IST) 24 Feb 2023
लवकरच दिघा स्थानकाचे होणार उद्घाटन; ठाणे, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ठाणे – वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून, लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ८० टक्के काम झाले आहे. दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी, प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

12:02 (IST) 24 Feb 2023
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसलेला अटक

महापालिकेच्या घरफाळा गैरव्यवहारातील मूळ फिर्यादी असलेला तत्कालीन करनिर्धारक संजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. १३ जून २०२० ला गैरव्यवहाराची फिर्याद संजय भोसले यांनी दिली होती. माजी नगरसेवक भोपाल शेटे यांनी घरफळा विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. ३ कोटी १४ लाख रुपयांचा हा गैरव्यवहार होता.

12:00 (IST) 24 Feb 2023
श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी…