Maharashtra Political News Updates, 24 February 2023: चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदारसंघात रोड शो केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, "काल त्यांनी प्रचाराचे भाषण देखील घरी बसून दिले, त्यांना माहीत होतं की इथे पराभव होणारच आहे. मग मतदारसंघात जाऊन ती काय फायदा? आधीही ते घरीच बसले होते, आताही घरूनच भाषण करत आहेत." राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…