Maharashtra Weather Update Today: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी बाकांवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या फॉर्म्युल्याच्या आधारावर जागावाटप होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

13:14 (IST) 30 May 2023
शेतीकामाची चिंता विसरा, यंत्रमानव आहे मदतीला – रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

जळगाव: शेतीकामे करण्यास मजूर मिळत नाही. काही ठिकाणी जास्तीचे पैसे देऊनही आहे त्या शेतातून मजूर पळविण्याचे प्रकार घडताना दिसून येतात. शेतीकामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणीही करावी लागते.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 30 May 2023
पुणे: प्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.तील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीचा मोठा निर्णय…

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएच.डी. पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रक्रियेत होणारे उल्लंघन रोखण्यासाठी यूजीसीने एक स्थायी समिती स्थापन केली असून, प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि पीएच.डी. संदर्भातील नियमांच्या उल्लंघन प्रकरणांमध्ये ही समिती लक्ष घालून कारवाई प्रस्तावित करणार आहे. सविस्तर वाचा…

13:08 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंना पाहुणचाराची सवय आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या भेटीचा आमच्यावर परिणाम होणार नाही – संजय राऊत

13:07 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: संजय राऊतांचं भाजपावर टीकास्र

सर्व पक्षांना संपवणं हेच भाजपाचं धोरण – संजय राऊत

12:56 (IST) 30 May 2023
जालना मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही, सात वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव

लागोपाठ सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा निभाव लागलेला नसल्याने जालना लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील एक प्रमुख पुढारी आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी कार्यकर्त्यांच्या या मागणीस दुजोरा दिला असून या अनुषंगाने पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 30 May 2023
यवतमाळ : पोलीस भरतीसाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य सूत्रधारास बार्शीत बेड्या

police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रमाणपत्र बनवून देणा-या मुख्य सूत्रधारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 30 May 2023
नर्मदा भ्रमण करण्यास निघालेल्या साधुंना सत्काराचा गहिवर

वर्धा: तिर्थाटनास निघालेल्या साधूंची देशभर भ्रमंती होत असल्याची भारतीय संस्कृती अद्याप जिवंत असल्याचे पाहायला मिळणे दुर्मिळच. अमरकंटक ते अमरकंटक असा दीर्घ प्रवास करीत फिरणारे साधू वर्धा वास्तव्यास आले असताना त्यांना सुखद प्रत्यय आला.

हेही वाचा…

12:53 (IST) 30 May 2023
जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत

जळगाव: ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवीत एकाला सुमारे साडेनऊ लाखांची फसवणूक करणार्‍या तरुणाला भावनगरमधून (गुजरात) सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 30 May 2023
नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक

नाशिक: महानगरपालिकेच्यावतीने पंचवटी विभागात मंगळवारी सकाळी अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई सुरू असताना जमावाने मनपा पथकासह पोलिसांवर दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 30 May 2023
मरावे परी देहरूपी उरावे! मरणोत्तर देहदानाचा वृद्ध दाम्पत्याचा संकल्प; कार्यास देणगीही दिली

वैद्यकीय शिक्षणात देहाचा अंतर्बाह्य अभ्यास केल्या जातो. त्यासाठी आवश्यक मृतदेह प्राप्त करण्यासाठी बरेच सायास करावे लागत असल्याची वैद्यकीय महाविद्यालयांची तक्रार राहते. या पार्श्वभूमीवर स्वतः मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करण्याची बाब अभिनंदनीय ठरावी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देहदान अवयवदान उपक्रम हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:31 (IST) 30 May 2023
नागपूर : प्रिन्स तुलीला पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वादग्रस्त हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली याने एका महिलेशी अश्लील चाळे करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अटक केली. मात्र, सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिन्स तुलीला अंबाझरी पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ दिल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 30 May 2023
कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला स्थानिकांचे समर्थन, पर्यावरणवाद्यांचा विरोध!; भाजप नेते म्हणतात…

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन संचाबाबत सोमवारी जनसुनावणी झाली. यावेळी बहुसंख्य स्थानिक नागरिकांसह १३ ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला समर्थन दिले. परंतु पर्यावरणवादी, काँग्रेस, आप, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मात्र प्रकल्पाला विरोध केला.

सविस्तर वाचा

12:12 (IST) 30 May 2023
कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा केवळ १७ वर्षाचा राजकीय प्रवास दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा राहिला आहे. या सतरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत धानोरकर यांनी अनेक चढउतार पाहिले.

सविस्तर वाचा

12:11 (IST) 30 May 2023
यवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या? चर्चांना उधाण

वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. प्रिया रेवानंद बागेसर (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

12:04 (IST) 30 May 2023
अलिबाग: कमी किमतीत सोने देतो सांगून फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई

शेतात नांगरणी दरम्यान जुने सोनं सापडले आहे, ते बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे, असे सांगून अनेकांची फसवणूक करून पसार होणाऱ्या टोळीचा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने पर्दाफाश केला आहे. यातील तीन आरोपींनी ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरु आहे. सविस्तर वाचा…

12:03 (IST) 30 May 2023
राज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण

आगामी काळात राज्यात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवले जाणार आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यासाठी परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवला आहे.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 30 May 2023
पुणे: शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार चार वर्षांनी उघड

शाळकरी मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने चार वर्षांपूवी एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळकरी मुलीची काढलेली छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सविस्तर वाचा…

12:01 (IST) 30 May 2023
‘एमपीएससी’त काळानुरूप बदलासाठी अभ्यास गट अत्यावश्यक; आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (एमपीएससी) असलेल्या अनेक उणिवांबाबत उमेदवारांच्या तक्रारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘एमपीएससी’मध्ये काळानुरूप बदल करायचे असतील तर राज्य शासनाने अथवा आयोगाने स्वत:हून अभ्यास गटाची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 30 May 2023
कोराडीत काँग्रेस-भाजप समर्थक समोरासमोरच; प्रस्तावित वीज प्रकल्प जनसुनावणीत तणाव, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी

कोराडीत प्रस्तावित नवीन वीज प्रकल्पाबाबत सोमवारी आयोजित जनसुनावणीत काँग्रेस-भाजप समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांकडून सुनावणीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सविस्तर वाचा…

11:59 (IST) 30 May 2023
जळगावात अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका; पाच ट्रॅक्टरभर माल जप्त

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात राबविलेल्या मोहिमेत पाच-सहा ट्रॅक्टरभर लोखंडी पेट्यांसह विक्रेत्यांच्या हातगाड्या, तसेच विविध फळे, कापडाचे गठ्ठे, असा सुमारे आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यापुढेही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.   सविस्तर वाचा…

11:58 (IST) 30 May 2023
मनमाडकरांना टंचाईत काहिसा दिलासा, करंजवण धरणातून आवर्तन

ऐन उन्हाळ्यात मनमाड शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. वाघदर्डी धरणातील जलसाठा खालावत चालल्याने शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे.

वाचा सविस्तर…

11:57 (IST) 30 May 2023
ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

निश्चलनीकरणापासून जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आलेली आहे. बँक ठेवीदारांना दरमहा पाच हजार रुपये रोख रक्कमही देऊ शकत नाही. बँकेची अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) १३४२ कोटींवर गेली आहे. बँकेवर आरबीआयकडून कारवाईची टांगती तलवार आहे.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 30 May 2023
प्रेयसीच्या भावाचा फोन आला अन् घोळ झाला; मारहाणीच्या भीतीने अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे पलायन

अकरावीचा समीर आणि दहावीची स्मिता (काल्पनिक नाव) दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघेही फुटाळ्यावर भेटले. भावी संसाराच्या गप्पाटप्पा रंगल्या आणि सायंकाळ झाली. काळजीपोटी भावाने बहिणीला फोन केला. बहिणीने फोन कट करण्याऐवजी चुकून उचलल्या गेला.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: उत्तर आणि दक्षिणेतला हा वर्चस्वाचा वाद – प्रकाश आंबेडकर

लोकसभा अध्यक्ष संसदेत येताना सेंगोल घेऊन येणार की अशोकस्तंभ घेऊन येणार? तटस्थ सभागृह धार्मिक करण्याचा हा प्रयत्न झालाय. उत्तर आणि दक्षिणेतला वाद हा वैदिक धर्मातला जुना वाद आहे. हा वर्चस्वाचा वाद आहे. कुठेतरी समतोल व्हायला हवा होता, पण ते झालं नाही. अलाहाबाद, वाराणसी वैदिक विद्यापीठाचं अग्रस्थान मानलं जात. अशावेळी त्यांना डावलून तुम्ही दक्षिणेतील बाबींना महत्त्व देताय, यात राजकारण आहे – प्रकाश आंबेडकर

11:37 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: पोपट मेलाय – फडणवीस

शिवसेना किंवा एनसीपी असेल त्यांना माहित आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो – देवेंद्र फडणवीस

11:37 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ – फडणवीस

संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटातल्या की त्याच संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल – देवेंद्र फडणवीस

वाचा सविस्तर

11:36 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: आदित्य ठाकरेंचं संतप्त ट्वीट!

खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते नींदनीय आहे. शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो! देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या तरूण खेळाडूंच्या पाठी ठाम उभं रहायला हवं आणि न्यायाची मागणी करायला हवी! – आदित्य ठाकरे</p>

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर