Marathi News Today, 22 May: कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे आणि काँग्रेसचा विजय. सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. २०२४ ला राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं आपलं लक्ष्य आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ आहोत असंही वक्तव्य केलं त्यावरही विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. तर दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढण्याचा मुद्दाही गाजतो आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय आमचाच होणार हा दावा भाजपानेही केला आहे आणि महाविकास आघाडीनेही. या आणि अशा सगळ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक आणि जिल्हा स्तरावरच्या बातम्या एका क्लिकवर बघायच्या असतील वाचा आमचा हा लाइव्ह ब्लॉग.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai News Today:महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला का? यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी
नाशिक – सक्त वसुली संचलनालयच्या (इडी) माध्यमातून भाजपा सत्तेचा गैरवापर करीत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी भाजपाच्या कार्यशैलीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
नागपूर: उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असतानाच शहरातील मेडिकल चौक परिसरात जल वाहिनी फुटली. त्यामुळे तेथून पाणी वाहात आहे.
जळगाव – वीज देयकाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती लघुसंदेशाद्वारे मिळविण्यासाठी जळगाव परिमंडळातील ९० टक्के ग्राहकांनी महावितरणकडे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविला आहे.
पुणे : टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रुपये देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. न्यायप्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी याबाबतचा निकाल दिला.
कल्याण: तांत्रिक बिघाड झालेल्या एका अवजड कंटनेरच्या धडकेत सोमवारी सकाळी कल्याण मधील पत्रीपुलाजवळ दोन रिक्षांचा चुराडा झाला. यामध्ये एका रिक्षेतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील कर्जत बाजूकडील जिन्यावर आज सकाळी एका गर्दुल्ल्याने रेल्वे स्थानकात चाललेल्या एका महिला प्रवाशाला अचानक मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने संबंधित महिला घाबरली. तिने ओरडा केल्याने आणि इतर प्रवाशांनी त्या महिलेच्या बचावासाठी धाव घेऊन तिची सोडवणूक केली.
बीड: ‘बीड जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळावे, यासाठी महाविकाआघाडीतून मोठा वाटा मिळवावा लागेल, या खासदर संजय राऊत यांच्या वाक्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला असला तरी त्यातून खूप काही राजकीय लाभ मिळेल, हा निव्वळ भ्रम असल्याचे विश्लेषण केले जात आहे.
जळगाव: २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील पदवीच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी परीक्षांचे निकाल प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन जाहीर केले जाणार आहेत.
डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणी मागील काही महिन्यांपासून थंडावलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथक (एसआयटी) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या तपासाने पुन्हा वेग घेतला आहे.
नागपूर: राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे- फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते.
नागपूर : पदवीधर, शिक्षक, जिल्हा परिषद निवडणुकांमधील पराभव तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्यानेच नागपूर या पक्षाच्या बालेकिल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसांत चार मतदारसंघांमध्ये पक्षाचे मेळावे घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे.
नाशिक: २००० रुपयांच्या नोटा वितरण प्रणालीतून काढून टाकण्यात येणार असल्याने त्याच प्रमाणात आता ५०० रुपयांच्या नोटा युध्दपातळीवर उपलब्ध करण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला पुढील चार महिन्यांत ५०० रुपयांच्या २८० दशलक्ष नोटा छापून देण्याची सूचना करण्यात आली आहे.
राहाता : अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत.
वर्धा : केंद्रातील ‘मोदी सरकार’ला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ३० मे ते ३० जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपा पक्षाद्वारे करण्यात आले आहे. राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी ‘मोदी सरकार’च्या कामाचा लेखाजोखा लोकसभा व विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमांतून मांडण्याची सूचना केली आहे.
पुणे: देशातील अतिश्रीमंतांच्या संख्येत आगामी काळात वाढ होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी (२०२२ मध्ये) देशात १२ हजार ६९ अतिश्रीमंत होते. त्यांची संख्या २०२७ मध्ये १९ हजार ११९ वर पोहोचण्याची शक्यता आहे. अतिश्रीमंतांच्या संख्येत पाच वर्षांत ५८.४ टक्के वाढ अपेक्षित आहे.
नागपूर : अंगनातून ८ वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. काळजाचा तुकडा दिसत नसल्यामुळे आई सैरभैर झाली. दोन दिवस उलटले तरी मुलाचा पत्ता नाही. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरू होता.
पुणे: शिरूर येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली. पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोहीम राबविली. सायंकाळपर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सामदा बूज वन बीटमध्ये येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या भागात पिंजरे लावले असता मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद करण्यात यश आले.
वर्धा : मान्यवर जेव्हा एखाद्या कार्याची पाहणी करण्यास जातात, तेव्हा ते कार्य नेमके कसे चालते ते स्वतः तपासण्याचा मोह त्यांना पडतोच. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर प्रत्येक बाब स्वतः हाताळून पाहण्याचे नेहमीच आवडते, असे सांगितल्या जाते.
नागपूर : आजपासून “नवतपा”ची सुरुवात झाली आहे. तापमान पुन्हा एकदा ४३ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढगदेखील आहेत. त्यामुळे यावर्षी “नवतपा”चा ताप फारसा वाढणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्याची अखेर म्हणजे “नवतपा”चा ताप. या काळात तापमानाची सर्वोच्च नोंद होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आज (२२ मे) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. ते ईडी कार्यालयात हजर राहण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या समर्थकांनी जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.