Mumbai Maharashtra News Today, 27 June 2023: एकीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना दुसरीकडे बाजूच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज महाराष्ट्रातील सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालकेंचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार असल्यामुळे यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
Marathi News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
धुळे – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आधी त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. त्यांचा पक्ष दिल्लीत फुटला ना. तो त्यांनी सांभाळावा. त्यांचं राज्य सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकारने गेल्या ११ महिन्यांत जनतेला सोयीसुविधा दिल्या आहेत. सर्व घटकांसाठी कामं केली आहेत. त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला नाहीये – एकनाथ शिंदे
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम वेळापत्रकाची प्रतीक्षा मंगळवारी अखेर संपली. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास अवघे तीन महिने बाकी असताना हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील उद्घाटनाचा आणि समारोपाचा सामना अहमदाबादला मिळाला असून, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहराला पाच सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे.
एकनाथ खडसेंना नवीन मालक मिळाला आहे. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. जमिनीत जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं, तर काळे झेंडे दाखवण्याची वेळ थोडी आली असती? नवीन मालकाकडे जाण्याची वेळ थोडी आली असती? त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे लोक आम्ही थोडी लोक आहोत – देवेंद्र फडणवीस
ही सगळी मंडळी एकत्र का आलेत? कारण त्यांचे घोटाळे बाहेर निघतायत. त्यांच्यावर कारवाई होत आहे. मोदींचंं सरकार राहिलं तर ही कारवाई होतच राहील आणि आपले सांगाडे बाहेर येत राहतील हे लक्षात आल्यामुळे हे सगळे एकत्र आलेत. पण जनतेचा मोदींवर विश्वास आहे. जनता मोदींच्याच पाठिशी उभी राहील – देवेंद्र फडणवीस
कामाचा उरक असूनही तो कुरघोडीच्या राजकारणात कसा झाकोळला जातो याचा मासलेवाईक अनुभव इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या प्रशासकाच्या कामगिरी निमित्ताने येत आहे. उण्यापुऱ्या दहा महिन्याच्या कालावधी होत असताना डॉ. सुधाकर देशमुख यांना बदली करून घेण्याच्या निर्णयाप्रत यावे लागले आहे.
मुंबई: रस्त्यालगत उभ्या वाहनांमधील निरनिराळे भाग चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली.
मी औरंगाबादला गेलो, तर तिथे मला म्हणाले की ८ दिवसांत एकदा पाणी येतं. सोलापुरात ४-५ दिवसांतून एकदा पाणी येतं. अकोल्यात १० दिवसांत एकदा पाणी येतं. मुंबई-पुण्यातही पाणीकपात केली जातेय. हे काय चाललंय? त्यामुळे देशाची जलनीती बंगालच्या खाडीत बुडवून टाकली पाहिजे. नवीन पॉलिसी बनायला हवी. हेच भारताचं परिवर्तन आहे. देशात पाणी नसतं तर वेगळी बाब असती. पण पाणी असूनही आपण पाण्यापासून वंचित आहोत. आत्तापर्यंत नेतेमंडळींनी भूलथापा मारल्या. ना पिण्यासाठी, ना सिंचनासाठी पाणी येतं – के चंद्रशेखर राव
देशाच्या पंतप्रधानांनी मेक इन इंडियाची घोषणा केली. पण मेक इन इंडिया असेल तर प्रत्येक शहरात चायना बाजार का लागतो? भारत बाजार कुठे आहे? पतंगाचा मांजा, दिवाळीचे फटाके, होळीचे रंग हे सगळं चीनमधून येतं. भारतात एवढीही क्षमता नाहीये का की या सगळ्या गोष्टी इथे तयार होऊ शकतील? – केसीआर
इथले पक्ष प्रस्थापित आहेत. त्यांना काय भीती आहे माहिती नाही. तुम्ही आमच्या अजेंड्यावर बोला. देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये मी पहिल्यांदा आलो तेव्हा म्हणाले होते केसीआरजी तुमचं इथे काय काम आहे? तुमचं काम तेलंगणामध्ये आहे. मी म्हटलं मी भारताचा नागरीक आहे. कुठेही जाऊन काम करू शकतो. मी इथे शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आलोय. जर मी इथे यायला नको असेन तर मग तुम्ही तेलंगणा पॅटर्न इथे १०० टक्के राबवा, माझं काम होईल. मी मजेत निघून जाईन. महाराष्ट्रात येणार नाही. त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये – के चंद्रशेखर राव
दलित वर्ग आपल्या देशाचं एक अंग आहे. त्यांना आपण मागे ठेवलं आहे. ते आपलंच पाप आहे. ते पाप आपल्याला धुवावं लागेल. दुसरं कुणी येऊन ते करणार नाही. अमेरिकेत काळ्या लोकांना गोऱ्या लोकांनी फार त्रास दिला होता. पण अमेरिकन समाजाच जागृती आल्यानंतर बराक ओबामांना देशाचे राष्ट्राध्यक्ष बनवून त्यांनी ते पाप धुतलं. तसंच इथे व्हायला हवं. आपला दलित बंधू वंचित राहायला नको. जोपर्यंत तो असा मागास राहील, तोपर्यंत हा भारताच्या चेहऱ्यावर डाग कायम राहील – केसीआर
निवडणुकांमध्ये पक्ष जिंकायला नकोत. जेव्हा भारतात जनता निवडणुकांमध्ये जिंकेल, तेव्हा बदल घडायला सुरुवात होईल. हे फार महत्त्वाचं आहे – केसीआर
किसान जिएगा तो कौन मरेगा?
किसान मरेगा तो कौन जिएगा?
दु:ख होतं की एवढ्या श्रीमंत महाराष्ट्र राज्यात रोज ८ ते १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हेच आपल्या शेतकऱ्यांचं नशीब आहे का? आपण एकच शपथ घ्यायची की सगळे शेतकरी जर एकत्र झाले आणि शेतकऱ्यांच्या पक्षाला उभं केलं तर आपल्या समस्या सुटू शकतील. तेलंगणामध्ये लोकांनी शेतकऱ्यांचं सरकार स्थापन केलं. तिथे २४ तास उच्च दर्जाची वीज मोफत उपलब्ध करून दिली जाते. शेतकऱ्यांना कितीही वीज वापरली, तरी कुणी विचारत नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देतो, तेव्हा मनापासून देतो. निवडणुकांसाठी, मतांसाठी वीज दिली जात नाही. शेतकऱ्यांना प्रतीएकर १० हजार रुपये लागवडीसाठी मदत दिली जाते. शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांची ५ लाखांची विमा पॉलिसी सरकारने काढली असून त्याचा हप्ता सरकार भरते. शेतकऱ्यांचं सर्व धान्य सरकार खरेदी करतं. तिथे आम्ही ७ हजारांच्या वर खरेदी केंद्र उभारली आहेत. महाराष्ट्रात हे कसं होतं, ते मला माहिती आहे – केसीआर
महाराष्ट्रात उसाच्या भावासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना का लढा द्यावा लागतो? काय कमी आहे? या समस्येवर एका वर्षात चर्चा करून कायमचा तोडगा काढण्याइतकाही दम या सरकारमध्ये नाहीये का? शेतकऱ्यांचं सरकार आलं, तर हे अगदी सहज होईल. शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हेच चालत राहील. – केसीआर
वर्धा: शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व पुढे सुरू राहण्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेकांसाठी ही नसती डोकेदुखी ठरते.
नागपूर: शहरात ‘सेक्स रॅकेट’चा सुळसुळाट झाला असून ब्युटीपार्लर, मसाज सेंटर, स्पेशल स्पा, पंचकर्म आणि युनिसेक्स सलून अशा गोंडस नावाखाली बिनबोभाट देहव्यापार सुरू आहे.
समुद्र सपाटीपासून तीन मीटर उंचीवर खांदेश्वर रेल्वेस्थानक उभारल्यानंतरही प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी पाय आणि पादत्राणे भिजवूनच स्थानकात जावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. नियोजनबद्ध शहरांचे शिल्पकार अशी नवी मुंबईची ओळख आहे.
कल्याण : वाहतुकीचे नियम धुडकावून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कल्याणमध्ये वाहतूक विभागाने जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात शहराच्या विविध भागात वाहतूक विभागाच्या पथकाने ४९३ वाहन चालकांवर कारवाई करुन पाच लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिवसेना कार्यकर्त्यांनी शाखेतले बाळासाहेबांचे फोटो काढण्याची परवानगी मागितली होती. पण तरीही ती न देता पाडकामाची कारवाई करण्यात आली. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा टाकतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन चालूच राहणार. जर कारवाई झाली नाही, तर आम्हालाही शिवसेना म्हणून रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. मला अटक करायची असेल तर मला सांगा, मी स्वत: पोलीस स्थानकात हजर होईन – अनिल परब</p>
नागपूर: महापारेषण या शासकीय वीज कंपनीत रिक्त असलेली सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) १ हजार ८६८ पदे आणि इतरही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या सह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री राव यांचा सत्कार केला.
सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या हल्लेखोर तरूणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. पोलीसांनी आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव वय २२ रा मुळशी डोंगरगाव याला ताब्यात घेतले आहे. आरोपी जाधव याने केलेल्या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला : अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर व जुने शहरातील ३१९ वर्षे पुरातन विठ्ठल मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सूचना भाविक-भक्तांना मंदिरातील फलकांवरून देण्यात आली आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे व रमेश राजुरकर या दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने भाजपने शक्तीप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
अमरावती: शहरातील एका महिलेला पैशांची आवश्यकता असल्यामुळे तिने एका ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून २२०० रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्या महिलेने तब्बल १० हजार रुपये परत केले.
वडिलांच्या निधनानंतर वरीष्ठ नेत्यांनी माझ्या मतदारसंघात जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्यांची तशी इच्छाच नाहीये – भगीरथ भालकेंचा आरोप
मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण राज्य व्यापले असून गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अकोला: शहराच्या तापमानात दरवर्षी प्रचंड वाढ होत आहे. जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. हे तापमान कमी करण्यासाठी वृक्षरोपण एकमेव पर्याय आहे.
सरकोली या भालकेंच्या गावात झालेल्या कार्यक्रमात चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी BRS पक्षात प्रवेश केला.
वर्धा: सेवाग्राम आश्रम देश विदेशातील पर्यटक तसेच गांधी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र या परिसरातील एक वास्तू तब्बल दीड महिने बंद ठेवण्यात आली होती.