Mumbai Maharashtra News Today, 27 June 2023: एकीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना दुसरीकडे बाजूच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज महाराष्ट्रातील सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालकेंचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार असल्यामुळे यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
Marathi News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
भाजपने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना आता बंद करत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या योजनेंतर्गत पुणेकरांचे कोट्यवधी रुपये हे सल्लागार कंपन्यांना देण्यात आले आहेत.
चंद्रपूर: ‘सर्वासाठी घरे-२०२४’ हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान ३.० (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.
पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पावन मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली. त्या वेळी हल्लेखोर तरूण तेथे आला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन स्वतंत्र आराखडे करण्यात आले आहेत. त्यानुसार मुळा नदीच्या उजव्या बाजूकडील नदीकाठाचे विकसन पुणे महापालिका ‘क्रेडीट नोट’द्वारे तर पिंपरी-चिंचवड महापालिका डाव्या बाजूच्या नदीकाठाचे ‘रोखी’ने विकसन करणार आहे.
असं वाटतं की नियती तिचं चक्र पूर्ण करत असते. तुम्ही जे पेरलंय, ते उगवत असतं. त्यांनी जर मारलं असेल, तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. अनिल परब यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण त्या आंदोलनाचं नेतृत्व तेच करत होते. अनिल परबला का सोडलंय, तो काय जावई आहे का सरकारचा? – संदीप देशपांडे
काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकते, आमच्या वैयक्तिक महत्वकांक्षामुळे काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले असून यापुढे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असल्याची ग्वाही वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांनी रविवारी सांगलीत झालेल्या महानिर्धार मेळाव्यात दिली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR सोलापुरातील भगीरथ भालकेंच्या गावी अर्थात सरकोलीत दाखल झाले आहेत. इथेच भगीरथ भालकेंचा BRS मध्ये प्रवेश होणार आहे.
पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याप्रकरणी ते वाकोला पोलीस स्थानकात हजर होणार आहेत.
वर्धा: पावसाळा म्हणजे रोगांना आमंत्रण असे म्हटल्या जाते. म्हणून मनुष्यांनाच नव्हे तर प्राण्यांनाही बाधा चटकन होते. त्यातही पाळीव प्राण्यांची तर विशेष काळजी क्रमप्राप्त ठरते.
चंद्रपूर: ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून १५० वाचनालये तयार करण्यात आली.
मुलीला पळून नेल्यानंतर पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीच्या कुटुंबावर प्रियकराने तलवारीने हल्ला केला. कुटुंबातील दोघे गंभीर जखमी असून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. ही घटना पारडी ठाण्यांतर्गत घडली. रमजान उर्फ मुनीर इकराम अंसारी (१९) रा. सबीना लेआऊट, आजरी-माजरी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
ठाणे: नितीन कंपनी येथील काट अन घाट या उपाहारगृहाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चार ते पाच तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.
नागपूर : सर्वोत्तम सेवेसाठीचे ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त नागपूर एम्समध्ये रुग्णांना लुबाडण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवीन क्लृप्ती वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. एमआरआय काढण्यासाठी रुग्णांकडून ‘कॉन्ट्रास्ट’ हे इंजेक्शन मागवून नंतर ते न वापरता ते संबंधित दुकानात परत करून रक्कम हडप केली जात होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत पिंपरी, आकुर्डीत बांधण्यात आलेल्या ९३८ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दहा हजार अनामत रक्कम व ५०० रुपये नोंदणी शुल्कासह २८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रस्ते आरक्षणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांसाठी आकुर्डी येथील गृहप्रकल्प राखीव ठेवण्यात आला होता.
बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली एकदम मान्य पण बाळासाहेबांना “म्हातारा “असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या ????
बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली एकदम मान्य पण बाळासाहेबांना "म्हातारा "असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 27, 2023
ध्यानीमनी नसताना पहिल्याच वेळी थेट चार महत्त्वाची खाती मिळाली. काही काळाने दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खाते मिळाले. त्यातूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागलेली. त्यातच प्रदेशाध्यक्षपद वाट्याला आले. इतके सारे मिळाले म्हटल्यावर कामाचा जोर आणि शाब्दिक फटकेही वाढलेले. अचानक कुस बदलली. मंत्रिमंडळातील स्थान घसरले. मंत्रीपदही तुलनेने कमी महत्वाचे आलेले.
राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज घेत उध्दव ठाकरेंच्या विरोधातील बंडामध्ये सामील होत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपद पटकावले. त्यानंतर गेल्या वर्षभरात मात्र, घोषणा भरपूर, पण अंमलबजावणीत अपयशी, अशी त्यांची अवस्था झाली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झाले.
केसीआर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, फक्त त्यांनाच व्हीआयपी दर्शनाची परवानगी, १० मंत्र्यांच्या गाड्यांनाच मंदिर परिसरात परवानगी, इतर गाड्या मंदिर परिसरापासून दूर थांबवण्यात आल्या.
केसीआर अशीच नौटंकी करत राहिले, तर ते तेलंगणातही हरतील. त्या पराभवाच्या भीतीनंच ते इथे आले आहेत. तिथे त्यांच्या पक्षाचे १२ माजी खासदार काँग्रेसमध्ये गेले आहेत. तुम्ही भाजपाला मदत करत आहात. त्याचा परिणाम तुम्हाला तेलंगणात सहन भोगावा लागेल – संजय राऊत
#WATCH | There will be no impact of Telangana CM KCR on Maharashtra politics. If KCR will do drama like this, he will lose Telangana also. Fearing loss, he came to Maharashtra but his 12-13 ministers/MPs joined the Congress yesterday. This is a fight between KCR and Congress. MVA… pic.twitter.com/HyJJ34qzbu
— ANI (@ANI) June 27, 2023
फक्त महाविकास आघाडीला त्रास द्यायचा यापलीकडे त्यांचा दुसरा उद्देश मला दिसत नाही. त्यांच्या या दौऱ्याचा पैसा कोणत्या मार्गाने येतोय? त्याची चौकशी करायला हवी. स्वागत कसलं करताय? इतक्या वर्षांत ते दर्शनासाठी स्वत: सहकुटुंब पंढरपूरला आल्याचं मला आठवत नाही. आता ५०० गाड्या आणून तुम्ही कुणाला ताकद दाखवताय? – संजय राऊत
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची शिवसेना शिंदे गटाशी जवळीक वाढत चालली आहे. बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यास शहरातून ‘लोकप्रतिनिधीमुक्त राष्ट्रवादी’ होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भिवंडी निजामपूरा महापालिकेतील १८ बंडखोर नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
सहकारनगर भागातील तळजाई पठार भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून मध्यरात्री १० ते १५ वाहनांची ताेडफोड केली.
आज 'उबाठा'चा आणखी एक मोहरा कमी होईल खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांशी निष्ठा ठेवील नाहीच राहू शकत तिथे खरे कार्यकर्ते आता स्मशान शांतता पसरणार तिकडे मारोत कुणी काही बाता सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार 'उठा' तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार ED चा फेरा ठेपलाच आहे येऊन तुमच्या दारी म्यान करून ठेवा तुमच्या गंजल्या तलवारी – नरेश म्हस्के
आज 'उबाठा'चा आणखी
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 27, 2023
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवील
नाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बाता
सुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
'उठा' तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणार
ED चा फेरा ठेपलाच आहे… pic.twitter.com/5PwBC1nsQk
तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्टनं केसीआर दर्शनासाठी येणार असल्यामुळे दुपारी ३ ते ६ यादरम्यान भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुख्य दरवाजा बंद केला जाणार आहे. मात्र, BRS पक्षानं याला विरोध केला असून भाविकांना, पुजाऱ्यांना वेठीस धरून यातून बीआरएसलाच बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा बीआरएसकडून करण्यात आला आहे.
सोलापुरात आपल्या आमदार-खासदारांसह दाखल झालेले तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर पुढे तुळजाभवानीचंही दर्शन घेणार आहेत.
मी आधी केसीआर यांना सहकुटुंब भेटायला गेलो होतो. आषाढीच्या निमित्ताने तुम्ही दर्शनासाठी या अशी मी विनंती त्यांना केली होती. त्यादरम्यान, इथल्या राजकीय परिस्थितीतील घडामोडी मी बघत होतो. माझे वडील दिवंगत भारत भालकेंनी २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही वेळेला जनता हाच माझा पक्ष म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. त्यामुळे इथल्या मायबाप जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या परवानगीनेच BRS मध्ये प्रवेश करतोय – भगीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आज केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाच्या राजकीय परिणामांची जोरदार चर्चा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर थोड्याच वेळात पंढरपूरला पोहोचणार आहेत. फक्त केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असल्याचं सांगितलं जात असून त्यांच्याबरोबरच्या आमदार-खासदारांना व्हीआयपी दर्शन मिळेल का? याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.