Mumbai Maharashtra News Today, 27 June 2023: एकीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना दुसरीकडे बाजूच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज महाराष्ट्रातील सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालकेंचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार असल्यामुळे यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
Marathi News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
उन्हाळ्यातल्या उष्म्याने घामाच्या धारा वाहात असताना आणि अंगाची काहिली होत असताना पाऊस पडू लागला की जो आनंद होतो, तो आपण सर्वांनीच अनुभवला आहे.
बँकिंग, विमा व भांडवली बाजार सेवा या तीन प्रमुख वित्तीय सेवा आहेत. बँकिंग आणि भांडवली बाजार सेवा याबद्दल ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर माहिती आहे.
ठाणे : ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच, त्याच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेऊन त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली.
मुंबई : राज्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेल्या मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
<a href="https://www.facebook.com/LoksattaLive“>
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
बुलढाणा : हिंगोली वरून पुणे येथे निघालेल्या व भर वेगातील (एमएच ३७ एफ ८००६ क्रमांकाच्या) खासगी ट्रॅव्हल्स बसचे टायर अचानक फुटून अनियंत्रित वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळले. लोणार तालुक्यातील वेणी फाट्या जवळ २६ जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष केसीआर हे पंढरपूरनंतर आता तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.
बुलढाणा: मूळचा नंदुरबार येथील राहिवासी असलेला १५ वर्षीय विधी संघर्ष बालक बुलढाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातून फरार झाला.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो – अजित पवार</p>
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2023
विवाहानंतर पती-पत्नी दोघांच्याही आयुष्यात बऱ्याच गोष्टींत बदल होत असतात. या बदलांना वेळीच योग्यरित्या सामोरे गेल्यास पुढील वैवाहिक आयुष्य सुकर होण्यास मदत होते.
आधीच बेरोजगारी, महागाईने त्रस्त महाराष्ट्रात गुन्हेगारी डोकं वर काढतेय… दिवसाढवळ्या कोयत्यांचे वार करत जीवघेणे हल्ले होत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यासाठी शोभनीय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, ह्या समाजकंटकांना वेळीच आवरा ! – मनसे
आधीच बेरोजगारी, महागाईने त्रस्त महाराष्ट्रात गुन्हेगारी डोकं वर काढतेय… दिवसाढवळ्या कोयत्यांचे वार करत जीवघेणे हल्ले होत आहेत. हे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यासाठी शोभनीय नाही. @CMOMaharashtra ह्या समाजकंटकांना वेळीच आवरा ! pic.twitter.com/qPWzUYGB3l
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 27, 2023
व्याघ्रपर्यटनाच्या जागतिक नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर. मग या व्याघ्रप्रकल्पातील वाघांची आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा देखील जागतिक दर्जाचीच असायला हवी. अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त ‘थर्मल ड्रोन’ ने आता या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे.
गडचिरोली : राज्य शासनाने नुकतीच तलाठी आणि वनरक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यात गैरआदिवासी समाजाला नगण्य जागा दिल्याने सरकार दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.
पुणे: देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील विभागीय कार्यालये बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
गोंदिया: यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला आहे. दरम्यान, आर्द्रा लागला आणि गुरुवारपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक सुखावले आहेत. काही शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
एसटी बँक निवडणूक निकालानंतर सोमवारी रात्री समाज माध्यमावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांना सादर केलेले निवेदन व्हायला झाले. त्यातील अर्जदार सेवानिवृत्त एसटी कर्मचारी प्रभाकर पी. गोपनारायण हे आहे. अर्जदारानुसार, एसटी बँकेची निवडणूक झाली असून मत पत्रिकेवर नोटाचा पर्यायच मतदारांना दिला गेला नाही.
कल्याण– गटार, नाले, रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम कल्याण पूर्वेतील आय प्रभागाने सुरू केली आहे. या नळ जोडण्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा साचतो. पावसाचे पाणी अडून राहते. त्यामुळे जमिनी खालून, गटार, नाल्यांमधून घेतलेल्या अशाप्रकारच्या सर्व चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे
नागपूर : वृद्ध वडिलांना कुटुंबियांनी घरातून बाहेर काढले. मात्र, चार वर्षांची आवडती नात घरी आल्याचे कळताच आजोबाचा नातीवरील प्रेमांचा बांध फुटला. त्यांनी तिला भेटण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, कुटुंबियांचा विरोध आडवा आला.
मुंबई विभागातील लोणावळा स्थानकावर वाहतूक ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे २७ ते २९ जून या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या काही लोकल २७ ते २७ जून या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.
डोंबिवली- येथील एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसरातील टपाल आणि पारपत्र कार्यालय चारही बाजुने पावसाच्या पाण्याने जलमय झाले आहे. ग्राहक, टपाल कर्मचाऱ्यांना अर्धाफूट पाण्यातून वाट काढत कार्यालयात यावे लागले. टपाल कार्यालया मागून गेलेल्या नाल्यात ठेकेदाराकडून मातीचा भराव टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यासाठी रस्ता नसल्याने नाल्यातील पाणी माघारी येऊन ते टपाल कार्यालय परिसरात शिरले.
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यापीठाने बकरी ईदच्या सुट्टीमुळे काही परीक्षा रद्द केल्या आहेत.
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने पंढरपूर वारीच्या निमित्ताने सोलापूर हेच ठिकाण निवडण्यामागेही राजकीय गणिते निश्चितच दिसून येतात. केसीआर यांनी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रात जाळे विणत असताना प्रथम तेलंगणा-मराठवाडा सीमेवरील नांदेडचा भाग निवडला होता. त्यापाठोपाठ पूर्व विदर्भातही बस्तान बसविण्यासाठी पाऊल उचलले.
नागपूर: एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते सिमेंटचे करायचे आणि काही महिने जात नाही तोच तेच रस्ते केबल किंवा जल वाहिनी तत्सम कामांसाठी खोदले जात आहे. यामुळे लोकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे.तेलंगखेडी येथे वर्षभरापूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता जल वाहिनी टाकण्यासाठी फोडला जात आहे.
बुलढाणा: देऊळगाव राजा पाठोपाठ संत नगरी शेगाव व दुसरबीड येथील मुस्लीम समुदायाने आषाढीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण- ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर कारवाईचा इशारा देऊनही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, डोंबिवली, शहापूर, अंबरनाथ, कल्याण परिसरातील बहुतांशी अनधिकृत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.
अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील कुरुमनजीक कामगाराने शेरे बिहार ढाबा मालकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
यवतमाळ : पुसद येथील वसंतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका कॉन्व्हेंटमधील शिक्षकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करुन त्याची २७ जूनपर्यंत कोठडी घेतली आहे.
अमरावती : पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली असून पहिल्या शिडकाव्याने चिखलदरा येथे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांत चिखलदरा येथे ३६.२ मिमी पावसाची नोंद झाली.गेले काही महिने उन्हाची काहिली सहन केल्यानंतर आता झालेले पावसाचे आगमन हे अतिशय सुखावह आहे.
अंबरनाथ: अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने मंगळवारी रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला. सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल वेळी हा प्रकार झाला.
गोंदिया : देशांतर्गत आणि राज्यात दहशतवादी घटना घडत असतात. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ मोहीम एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे, काय उणिवा आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो .