Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. यावेळी शिवसेनेत पडलेल्या सर्वात मोठ्या फुटीमुळे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. तसंच पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. नाना पटोले विरुद्ध अजित पवार यांच्याकडून आम्हीच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जिंकणार असा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जातो आहे. तर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचं निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live News Today|शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार? यासह राज्यातल्या ठळक घडामोडी

19:01 (IST) 5 Jun 2023
पुणे: येरवड्यात कोयता गँगची दहशत; तरुणावर वार

पुणे: येरवडा भागात कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. तरुणाचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

18:41 (IST) 5 Jun 2023
बुधवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

18:05 (IST) 5 Jun 2023
नवी मुंबई: प्रचंड पोलीस बंदोबस्तात; अखेर झोपडपट्टी हटवली

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे रेल्वे स्टेशनलगत असलेली झोपडपट्टी महानगरपालिकेने हटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही झोपडपट्टी एखाद्या भूखंडावर नव्हे तर पदपथावर पसरली होती.

सविस्तर वाचा…

17:20 (IST) 5 Jun 2023
वाशीम : खासदार भावना गवळींना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी! ११ जून रोजी ठाकरे गटाचा मेळावा, संजय देशमुख यांच्या नावाची चर्चा

वाशीम : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

16:49 (IST) 5 Jun 2023
मुंबई: डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. सुधाकर शिंदे यांचे स्वागत केले.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 5 Jun 2023
मुंबई: परिसरातील कचऱ्याची आजपासून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर तक्रार करता येणार

मुंबई: कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यात, कुठेही साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची पालिकेकडे ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. या तक्रारीनंतर घनकचरा विभागाकडून त्वरित तेथील कचरा उचलला जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

सविस्तर वाचा…

14:52 (IST) 5 Jun 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक!

पिंपरी : राज्याच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत वाढ होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात फलक झळकले आहेत.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 5 Jun 2023
टिपेश्वर अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या; पांढरकवडा तालुक्यातील घटना

यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यालगत सुन्ना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी, नापिकी व वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त होऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उजेडात आली. राजू श्रीपाद जिड्डेवार (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 5 Jun 2023
शिरूर लोकसभेवरून सुरू असलेला राष्ट्रवादीमधील वाद मिटला? विलास लांडे म्हणतात ” शरद पवार यांनी…. ”

पुणे: शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत.

सविस्तर वाचा

13:40 (IST) 5 Jun 2023
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले…

यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली. नाना पटोले यांच्या वाढ दिवसानिमित्त सालेभाटा येथे त्यांची लाडू तुला करण्यात आली या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 5 Jun 2023
श्वासही घेणे झाले होते कठीण, अखेर ‘त्यांनी’ युवकास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

वर्धा: श्वासही घेणे कठीण झालेल्या नांदेडच्या युवकास शस्त्रक्रिया करीत मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात सावंगीच्या डॉक्टरांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील १९ वर्षीय युवक रूग्ण नाकातून सतत रक्तस्त्राव होत असल्याने सावंगीच्या विनोबा भावे रूग्णालयात दाखल झाला होता.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 5 Jun 2023
मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दिल्लीवारीवर अजित पवारांची टीका; म्हणाले, आमच्यासाठी ज्ञानोबा-तुकोबा..

पुणे: शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 5 Jun 2023
सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा होता : देवेंद्र फडणवीस

दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी सुलोचना दीदी पात्र होत्या, हा पुरस्कार त्यांना मिळाला असता तर उत्तम झालं असतं. या पुरस्काराची पद्धत काय आहे याची कल्पना मला नाही, त्याबद्दल माहिती घेऊ : देवेंद्र फडणवीस

12:01 (IST) 5 Jun 2023
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या; पतीला अटक

मुंबई: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार शनिवारी रात्री शिवडी परिसरात घडला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 5 Jun 2023
अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती; महाराष्ट्रालाही बसणार फटका!

पाच जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन सात जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. स्कायमॅट या खाजगी हवामान संस्थेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. तर ॲक्युवेदरच्या हवाआन अभ्यासकांच्या मते अरबी समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे.

सविस्तर वाचा

11:41 (IST) 5 Jun 2023
नागपूर : बोगस बियाणे, खतांचा सुळसुळाट; ५४ कृषी केंद्रांवर धडक कारवाई

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांची कृषी विभाग,जिल्हा परिषदे कृषी विभागाच्या ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर १३ असे एकूण १४ भरारी पथक स्थापन करण्यात आले.

सविस्तर वाचा

11:40 (IST) 5 Jun 2023
दहावीनंतर पाच करियरचे पर्याय, जे देतात पाच ते दहा लाखांपर्यंत नोकरीची हमी

नागपूर: नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थी आणि पालकही अनेकदा करियरची निवड करताना गोंधळतात. त्यामुळे तुम्ही जर योग्य करिअर निवड करू शकत नसाल तर तुमच्या कामाचे हे पाच करिअरचे पर्याय आहेत.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 5 Jun 2023
नागपूर : प्रॉपर्टी डीलरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला अवघ्या चार तासात पोलिसांनी केली अटक

वाठोडा पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनेचा तपास सुरू केला आणि चार तासांच्या आत ४ आरोपींना शोधून काढत बेड्या ठोकल्या. नौशाद उर्फ चिकन मुस्तफा खान (२१) रा. झोन चौक, हिंगणा रोड, मोहम्मद इरशाद रईस अंसारी (३०) रा. राजीवनगर, हिंगणा रोड, नासिर शौकत शेख (२४) आणि नीतेश रामलोचन यादव (१९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा

11:25 (IST) 5 Jun 2023
नागपूर: वनहक्कधारकांच्या हक्कांसाठी आमदार उपोषणावर !!

नागपूर : जंगलावर उपजिविका असणाऱ्या आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी यांना सामूहीक वनहक्क व वनातील गौणउपजावर स्वामीत्त्व हक्क असतानाही गोंदिया वनखात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हक्कावर गदा आणली.याविराेधात गेल्या सहा दिवसांपासून वनहक्कधारक आमरण उपोषणाला बसले.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 5 Jun 2023
भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा १४ ला अकोल्यात; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे.पी. नड्डा १४ जून रोजी अकोला शहरात दाखल होणार आहेत. शहरात जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली.

सविस्तर वाचा

11:13 (IST) 5 Jun 2023
‘प्लास्टिक’च्या भस्मासुरामुळे अकोल्याचे पर्यावरण धोक्यात

अकोला: प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे शहरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. एकदा वापर करता येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी, वायू आणि भूप्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही दररोज एक लाख ८० हजार पिशव्या अकोल्याचे पर्यावरण प्रदूषित करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘निसर्गकट्टा’ संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 5 Jun 2023
नागपूरचे ‘व्हीएनआयटी’ विशिष्ट विचारधारेच्या प्रचार-प्रसाराचे केंद्र! जाणून घ्या काय घडले असे…

जागतिक दर्जाचे संशोधन, १०० टक्के नोकरीची हमी आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी देशभर प्रसिद्ध असलेली मध्यभारतातील नामवंत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘व्हीएनआयटी’ हल्ली केंद्र सरकारला हितकारक अशा विशिष्ट विचारधारेच्या प्रचार-प्रसाराची जणू केंद्र झाली आहे.

सविस्तर वाचा

11:12 (IST) 5 Jun 2023
सुनील तटकरे नाराज का झाले?

किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असला चर्चा रंगली ती तटकरेंच्या नाराजीची. खासदार सुनील तटकरे हा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. राजशिष्टाचार पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारडून सातत्याने डावलण्यात येत असल्याची तटकरे यांची भावना झाली आहे.

सविस्तर वाचा

10:39 (IST) 5 Jun 2023
पुणे: विनातिकीट दंड वसुलीतून रेल्वेची कोट्यवधींची कमाई

पुणे: रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई सुरू आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मे महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २६ हजाराहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:24 (IST) 5 Jun 2023
पुणे: देशातील सात शहरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरांना वाढती पसंती… जाणून घ्या कारणे आणि शहरे

पुणे : देशभरात तयार घरांना ग्राहकांची पसंती कायम दिसून येते. अलीकडच्या काळात बांधकाम सुरू असलेल्या घरांकडेही ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. प्रमुख सात महानगरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये घरे घेणाऱ्यांची संख्या यंदा पहिल्या तिमाहीत ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा

10:24 (IST) 5 Jun 2023
पुणे: शेगावसाठी अकोला विमानतळ सुरू करा! मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे: शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विमानसेवा अथवा इतर वाहतुकीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अकोला येथील शिवनी विमानतळ कार्यान्वित करावे, अशी मागणी हवाई वाहतूकज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सविस्तर वाचा

10:23 (IST) 5 Jun 2023
पुण्यातील नाट्यगृहांची होणार दुरुस्ती… महापालिका करणार ‘एवढे’ कोटी खर्च

पुणे : शहरातील चौदा नाट्यागृहांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सात कोटींची आवश्यकता भासणार असून महापालिकेकडून त्याबाबतचे पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

10:23 (IST) 5 Jun 2023
पिंपरी- चिंचवडचे नाव बदलून जिजाऊनगर ठेवा!; फ्लेक्सद्वारे भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी

पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर ठेवण्यात यावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. या आशयाचे फलक पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा

10:20 (IST) 5 Jun 2023
एकनाथ शिंदे यांची शिवसेना डुप्लिकेट-संजय राऊत

खऱ्या शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात असेल तर एकनाथ शिंदे दिल्लीत का जातात? मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? कारण हे सरकार जाणार आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर आम्ही समजू शकतो कारण त्यांंचं ते मक्का मदिना आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर आणि भाजपावर टीका केली आहे.

महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. यावेळी शिवसेनेत पडलेल्या सर्वात मोठ्या फुटीमुळे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत.