Maharashtra News Updates Today : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार त्यांना मंत्रीपद मिळणार असा दावा करत आहे. दुसरीकडे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन करणार असल्याच्या मुद्द्यावरही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. १९ विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स…
Mumbai News Updates Today : राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
शाब्दिक कोट्या करण्यात अर्थ नाही. हे दोघेही एक झाले, तरी त्याचा काहीही उपयोग नाही. यांना उत्तर द्यावं लागतं. उद्धव ठाकरे २ वर्षे ८ महिने राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी एकदाही उत्तर दिलं नाही. त्यांनी राज्याची काय अवस्था केली आहे. आर्थिक स्थिती वाईट आहे. ते शेतकऱ्यांशी खोटं बोलायचे. हा यांचा मुळ स्वभाव आहे.
– सुधीर मुनगंटीवार
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणे माजी आमदार आशीष देशमुख यांना महागात पडले आहे. त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. एकीकडे त्यांच्यवार निलंबनाची कारवाई झालेली असताना दुसरीकडे ते बाजार समितीच्या राजकरणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले आहेत.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावरून भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात असताना त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी आघाडी केली”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह