Maharashtra Breaking News Updates, 23 September 2022 : महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवार) रात्री उशीरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचेही समोर आले आहे. तर,शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली आहे.
अशातच मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत. शिवाय, राज्यात पावसाची देखील शक्यता आहे. एकूणच राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.
Maharashtra Breaking News Updates, 23 September 2022 : एकूणच राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली असून, शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेला परवानगी देण्याआधी उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांनी केलेली याचिका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, यावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची वेळ ठरवू असंही सांगितलं.
सविस्तर बातमी
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल (गुरुवार) ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीत भेट घेऊन तासभर चर्चा केली. ज्ञानव्यापी मशिद प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद आणि भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भेटीतून केल्याचे मानले जाते. तर या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरएसएस व भाजपावर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे : तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या कळवा खाडीवरील नवीन खाडी पुलाचे अखेर पुर्ण झाले असून हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी ठाण्यात भेट घेतली. बातमी वाचा सविस्तर …
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला. हायकोर्टात एकीकडे दसरा मेळावा प्रकरणी सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत होते.
मुंबई : सांताक्रुझ येथील एमआयएम पदाधिकाऱ्याला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून भारतात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बातमी वाचा सविस्तर …
ठाणे : करोना काळात दोन्ही पालक मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी करोनात अनाथ झालेल्या बालकांमागे शुल्कासाठी तगादा लावला होता. शाळांच्या या मागणीला त्रासुन काही विदयार्थ्यांनी याची तक्रार बालहक्क आयोगाकडे केली होती. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई : करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे एसटी सेवांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून त्याचा फटका मुंबई – पुणे मार्गावरील एसटी सेवेलाही बसला आहे. मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या मार्गावरील प्रवासीसंख्या घटल्याने एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई : करोनाविषयक निर्बंध हटविल्यानंतर खासगी कार्यालये सुरू झाली असून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून कार्यालयीन काम करण्याची दिलेली मुभा बंद केली आहे. शाळाही सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील घरांच्या मागणीत वाढ झाली असून घरभाडेही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. बातमी वाचा सविस्तर …
अमरावती : यंदा पावसाळ्यात पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. धरणांमध्ये २ हजार ८३२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९१ टक्के पाणीसाठा झाला असून वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अमरावती विभागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची ३११ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता सुमारे ३ हजार १०८ दलघमी एवढी आहे. बातमी वाचा सविस्तर …
‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. तर विरोधकांच्या टीकेला सरकारकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वटीद्वार शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…
काँग्रेसने डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयांचं होत असलेल्या अवमुल्यनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री असताना रुपयाच्या अवमुल्यनावर केलेल्या टीकेचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच रुपयाची घसरण होत असताना मोदींजींना ऐका म्हणत चिमटा काढला आहे.
डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या विषयावर येत्या दोन दिवसात शासनस्तरावर बैठक लावण्यात येईल. या बैठकीत शेतकऱ्यांना भरपाई मिळेल या अनुषंगाने चर्चा केली जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुरुवारी बाधित शेतकऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिल्यानंतर दिले. बातमी वाचा सविस्तर …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) एक निवेदन जारी करत राज्यात सुरू असलेल्या लहान मुलांच्या वेठबिगारीवर चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने तात्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडाही शिकवतील, असा सूचक इशारा दिला. राज ठाकरेंनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
नागपूर : विवाहित प्रेयसी अन्य युवकासोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने चिडलेल्या प्रियकराने वाद घातला. त्यामुळे प्रेयसीने दुसऱ्या प्रियकरासोबत कट रचला व पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केला.ही थरारक घटना १४ मैल परिसरात उघडकीस आली. बातमी वाचा सविस्तर …
अलिबाग : राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने रायगड जिल्ह्यात मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. संघटनात्मक बांधणी बरोबरच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दिले आहे. गुरुवारी अलिबाग येथे झालेल्या कार्यकारणी मेळाव्यात याची प्रचिती आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणूकीत भाजपला सोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर …
परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी अशी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू होत असून, याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती असणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे भावना व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाविरोधात केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. याचिका शेवटच्या क्षणाला करण्यात आली. शिवाय याचिकेत आशा प्रकारच्या अन्य कार्यक्रमांना आक्षेप घेण्यात आलेला नाही. बातमी वाचा सविस्तर …
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका सहा वर्षाच्या रुपवान बालिकेला गुंगीचे औषध देऊन तिच्या मदतीने भिक्षा मागणाऱ्या तिच्या आजी-आजोबांना डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बालिका आजी-आजोबांची खरच नात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी तेजस्विनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : महाराष्ट्रातील आमदार अधिक जबाबदार आहेत. सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे असंसदीय वर्तन खपवून घेतले जाणार आहे. यामुळे सभागृहाचा वेळ जातो आणि लोकांचे नुकसान होते. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई : सोमय्या ग्रुपच्या विश्वस्त ९२ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून गेल्या तीन वर्षांमध्ये एक कोटी १४ लाख रुपये काढल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी याच कंपनीतील ७५ वर्षीय व्यवस्थापकाला अटक केली. बातमी वाचा सविस्तर …
नाशिक : शिक्षक आणि पालक यांच्यातील विसंवादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यार्थ्यांवरच वर्ग घेण्याची वेळ आली आहे. इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला असून शाळा नियमितपणे दोन दिवसात सुरू न झाल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. बातमी वाचा सविस्तर …
महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.
बुलढाणा : माजी आमदार चैनसुख संचेती आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या तीन तरुणांना दिल्ली येथे गुप्तचर विभागाने (आयबी) अटक केली होती. या प्रकारामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. बातमी वाचा सविस्तर …
रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १९ तासांपासून विस्कळीत झाली आहे.
नागपूर : घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकणे एका वृद्धाला महागात पडले. सायबर गुन्हेगाराने लष्करात अधिकारी असल्याची थाप मारून दोन महिन्यांचे आगाऊ भाडे पाठवण्याच्या नावावर फसवणूक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी सतीश उद्धव चिमलवार (६५) रा. बेसा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. बातमी वाचा सविस्तर …
रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १९ तासांपासून विस्कळीत झाली आहे. टँकरमधील एलपीजी वायू सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. वाचा सविस्तर बातमी..
सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीतून मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावेळी मोहन भागवतांनी मदरशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना नव्हे तर, भाजपच जिंकेल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर बातमी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून गुरुवारी रात्री उशीरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यांशी भेट झाली नव्हती. पण रात्री उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. वाचा सविस्तर बातमी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून गुरुवारी रात्री उशीरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यांशी भेट झाली नव्हती. पण रात्री उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये शिवसेनेसह असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, दसरा मेळावा अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली.