Maharashtra Breaking News Updates, 24 September 2022 : उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मुंबईतील शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिल्यामुळे शिंदे गटातील नेते आणि उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांविरोधात टीका करत आहेत. शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अमित शाहा यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा भागातही पीएफआय संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस,जीएसटी तपास यंत्रणांमार्फत २२ सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला. त्यानंतर येथे पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा केला जातोय.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates, 24 September 2022 : राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.

20:58 (IST) 24 Sep 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? वाचा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

सविस्तर बातमी...

20:43 (IST) 24 Sep 2022
...भाजपा आता वाईनला उराशी कवटाळत आहे – नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. यावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:46 (IST) 24 Sep 2022
पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:33 (IST) 24 Sep 2022
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २७ सप्टेंबररोजी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. २७ तारखेला दुसऱ्या क्रमांवर ही केस ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

18:57 (IST) 24 Sep 2022
धुळ्यात पाण्याच्या टाकीवर चढून नगरसेवकासह नागरिकांचे आंदोलन

धुळे शहराचा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष, धुळेकर नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलन केली. मात्र धुळे मनपा प्रशासन पाण्याच्या संदर्भात अद्यापही योग्य नियोजन करू शकलेली नाही. त्यामुळे आज धुळे मनपाच्या नगरसेवकावर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:05 (IST) 24 Sep 2022
मुस्लीम सर्वेक्षणाच्या जीआरनंतर अफवांचं पेव, शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, "काही आक्षेपार्ह..."

राज्यात मुस्लीम समाजाच्या सर्वेक्षणाचा शासकीय आदेश निघाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अनेकजण या सर्वेक्षणाचा मुस्लीम आरक्षणाशी संबंध जोडत आहेत. यामुळे मुस्लीम समाजाच्या सर्वेक्षणाविषयी गैरसमज आणि अफवा पसरत आहेत, असा आरोप राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तसेच मुस्लीम सर्वेक्षणाचा आणि आरक्षणाचा कोणताही संबंध नसल्याचं नमूद केलं. दीपक केसरकर शनिवारी (२४ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

18:05 (IST) 24 Sep 2022
ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "न्यायालयावर संशय..."

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळत ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा घेण्यासाठी परवानगी दिली. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. आता वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. "नेहमीच न्यायालयावर संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांचा या निकालामुळे न्यायालयावरील संशय वाढेल," असा खोचक टोला मुनगंटीवारांनी लगावला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) चंद्रपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

सविस्तर बातमी...

18:04 (IST) 24 Sep 2022
विश्लेषण : महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला 'सत्यशोधक समाज' काय आहे? वाचा इतिहास…

महात्मा जोतिबा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यानंतर आता सत्यशोधक समाज १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. स्थापनेनंतरच्या काळात सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रासह देशातील सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावली. ही भूमिका काय? महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची गरज का वाटली? त्यासाठी त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाचा नेमका विचार काय? हा विचार रुजवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आणि त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी झाली? या सर्व प्रश्नांचा हा आढावा.

सविस्तर विश्लेषण...

17:37 (IST) 24 Sep 2022

तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मंगळवारी एका मासेमाऱ्याला तर बुधवारी त्याला आकर्षित करण्यासाठी बांधलेल्या रेडकूला फस्त करत आता या वाघाने वडस्याच्या दिशेने कुच केले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

17:36 (IST) 24 Sep 2022
भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मंगळवारी एका मासेमाऱ्याला तर बुधवारी त्याला आकर्षित करण्यासाठी बांधलेल्या रेडकूला फस्त करत आता या वाघाने वडस्याच्या दिशेने कुच केले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

16:48 (IST) 24 Sep 2022
मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

मुंबई : पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणविषयक संस्थांनी कांदळवन, खाडीची स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याला कांदळवन, खाडीतील कचरा गोळा करण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर ...

14:48 (IST) 24 Sep 2022
“…तर ते परत घरी जाणार नाहीत” पुण्यातील घोषणाबाजीनंतर नितेश राणेंचा इशारा, घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

“यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू, असे राणे म्हणाले आहेत.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 24 Sep 2022
तरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले, ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरुन भावाची हकालपट्टी

ऋषिकेशमधील पुलकित आर्या यांच्या ‘वनतारा’ रिसॉर्टजवळील कालव्यात बेपत्ता अंकिता भंडारी या तरुणीचा मृतदेह आढळ्यानंतर या रिसॉर्टला स्थानिकांनी पेटवून दिले आहे. या रिसॉर्टमध्ये पीडित तरुणी रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती.

सविस्तर वाचा...

13:30 (IST) 24 Sep 2022
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लाॅक

मुंबई : येत्या रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील धीम्या मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि ठाण्यादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर, तसेच सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लाॅक असणार आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:44 (IST) 24 Sep 2022
आरे कारशेडप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:43 (IST) 24 Sep 2022
दसरा मेळाव्यासंदर्भात शिंदे गट महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत; सुहास कांदे म्हणाले…

शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी ही बैठक आणि दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवसैनिक बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने जमणार आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच आमची भूमिका आहे, असे सुहास कांदे यांनी सांगितले. वाचा सविस्तर

12:26 (IST) 24 Sep 2022
शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार

चंद्रपूर : राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने हाच प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपने याला कडाडून विरोध केला. भाजपसाठी तेव्हा वाईट असेलली ‘वाईन’ आता ‘फाईन’ झाली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:06 (IST) 24 Sep 2022
पप्पा आईला नका मारू असे म्हणणार्‍या आठ वर्षाच्या मुलीवर बापाने झाडली गोळी

पुणे : आई आणि वडिलांचे भांडण सुरू असताना आईवर पिस्तूल रोखलेले पाहून पप्पा आईला मारू नका असे म्हणणार्‍या ८ वर्षीय राजनंदिनीवर तिच्या वडीलांनी गोळी झाडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे घडली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

maharashtra live news update

महाराष्ट्र मराठी ब्रेकिंग न्यूज

Story img Loader