Mumbai News Today : केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यातशुल्क लादल्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ठिक-ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…

Live Updates

Mumbai Pune News Live Today : प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर...

19:54 (IST) 22 Aug 2023
चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

मुंबई: पूर्व उपनगरांतील काही भागात येत्या गुरुवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गोवंडी, देवनार, मानखुर्द, चेंबूर येथील पाणीपुरवठा गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

सविस्तर वाचा...

19:13 (IST) 22 Aug 2023
"सत्तेचा माज आला की...", मनसेचं रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेच्या आंदोलनांवरून टीका केली होती. याला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "रखडलेल्या आणि मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने जमेल तिथे सनदशीर मार्गाने आणि भगत सिंग यांच्या वाक्याप्रमाणे 'उंचा सूनने वालो को धमाके की जरुरत होती है' अशा मनसे स्टाईल ने आंदोलन केली आहेत. त्याचा धसका भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जास्तच घेतल्याचे दिसतय. कल्याण डोंबिवली मधले शहर अंतर्गत रस्ते ही आपल्याला खड्डे मुक्त करता आले नाहीत. जनतेप्रती संवेदना संपल्या आणि सत्तेचा माज आला की दुसऱ्यांना दोष देणे सोपे होते. सत्ता असो नसो निवडणूक असो नसो महाराष्ट्र सैनिकांचा हात हा कायम जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी उठला आहे. अनेक केसेस आणि तुरुंगवास झाला तरी हा महाराष्ट्र सैनिक जनतेच्या प्रश्नासाठी कायम रस्त्यावर उभा राहिला आहे," असं गजानन काळे यांनी म्हटलं.

https://twitter.com/MeGajananKale/status/1693945718061621315

18:53 (IST) 22 Aug 2023
धारूरमध्ये बाराव्या शतकातील कन्नड शिलालेख; धाराशिव जिल्ह्यात कलचुरी कालखंडाचे पुरावे

धाराशिव शहरापासून अगदी अठरा किलोमीटर अंतरावर बाराव्या शतकातील कन्नड शिलालेख आढळून आला आहे. धाराशिवनजिक असलेल्या धारूरचा काळाच्या पडद्याआड असलेला इतिहास जगासमोर येण्यास मदत झाली आहे.

वाचा सविस्तर...

18:38 (IST) 22 Aug 2023
पिंपरी: मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट दोन ने मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला जेरबंद केल आहे.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 22 Aug 2023
नागपुरात सोन्याच्या दरात उसळी.. आजचे हे आहेत दर

नागपूरः नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात सातत्याने चढ – उतार बघायला मिळत आहे. २२ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार रुपये नोंदवले गेले.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 22 Aug 2023
‘भ्रष्टाचार’प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार! आगार व्यवस्थापक व वाहक ‘एसीबी’च्या जाळ्यात

बुलढाणा: पंढरपूरच्या आषाढी यात्रेदरम्यान कळत नकळत झालेल्या ‘भ्रष्टाचार’ प्रकरणी कारवाई न करण्यासाठी दोघांनी रोख भ्रष्टाचार केला अन दोघेही ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले.

सविस्तर वाचा...

17:41 (IST) 22 Aug 2023
विक्रोळीत शिक्षकाचा चार विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार

शाळेत शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने शिक्षा करण्याचे निमित्त करून चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

16:38 (IST) 22 Aug 2023
जळगावातील आकाशवाणी चौकात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव: शहरातून गेलेल्या महामार्गावरील मृत्यूचा सापळा म्हणून ओळख बनू पाहत असलेल्या आकाशवाणी चौकात मंगळवारी दुपारी भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 22 Aug 2023
भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेला आमदार अडकणार? सना खान हत्याकांडात आणखी दोघांना अटक

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांचे हत्याकांड आणि अश्लील चित्रफीत प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. नुकतेच नागपूर पोलिसांनी नरसिंगपूरचे पूर्वाश्रमीचे भाजपाचे आणि सध्या काँग्रेसवासी झालेले आमदार संजय शर्मा यांना नोटीस दिली आहे. ते दोन दिवसांत नागपूर पोलिसांसमोर हजर होणार आहेत. तसेच सना खान यांच्या मोबाईलची विल्हेवाट लावणारे कमलेश पटेल आणि रवीकिशन यादव ऊर्फ रब्बू चाचा या दोघांना नागपूर पोलिसांनी जबलपुरातून अटक केली.

सविस्तर वाचा...

16:20 (IST) 22 Aug 2023
नागपुरात अमली पदार्थांचा पुरवठा, नवी कार्यपद्धती, नवी ठिकाणे आणि बरेच काही

नागपूर : नागपूरमध्ये परदेशातून विमानाव्दारे अमलीपदार्थाची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. यावरून तस्कारांनी आता मोठ्या शहरासोबतच नागपूरसारख्या तुलनेने लहान शहरातही त्यांचे पाळेमुळे पसरवायला सुरुवात केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, यात आंतरराष्ट्रीय तस्कर सहभागी असल्याची बाबदेखील समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 22 Aug 2023
उत्कृष्ट गुन्हे तपास पदक हुकल्याने पोलिसांमध्ये निराशा

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उत्कृष्ट गुन्हे तपास पदकासाठी यंदा राज्यातील एकाही अधिकाऱ्याची निवड न झाल्याने पोलिसांमध्ये निराशा पसरली आहे.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 22 Aug 2023
डोंबिवली : वाढत्या घरफोड्यांनी रहिवासी हैराण

डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून पुन्हा घरफोड्या वाढू लागल्या आहेत. बंद घरांवर पाळत ठेऊन दिवसा-रात्री त्या घरांमध्ये चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून चोरुन नेला जात आहे.

वाचा सविस्तर...

15:12 (IST) 22 Aug 2023
मुंबई : वर्षभरात पाच हजार किलो प्लास्टिक जप्त, १,५८६ प्रकरणांमध्ये ७९ लाख रूपये दंड वसूल

मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात पाच हजार किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

15:09 (IST) 22 Aug 2023
बुलढाणा: बस व दुचाकीची धडक; एक ठार, दोघे गंभीर

बुलढाणा: मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस व दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एक इसम जागीच दगावला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 22 Aug 2023
गोंदिया जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ; १८ महिन्यांपासून मानधन थकले

गोंदिया: रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी चोवीस तास दक्ष असणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

सविस्तर वाचा...

14:39 (IST) 22 Aug 2023
माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला ‘सरीसृप’चे वेड; आता सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस उद्धव ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्या नेतृत्वातील चमूने पश्चिम घाटात सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘सह्याद्रीओफिस उत्तराघाटी’ असे नाव या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्यासह कॅम्पबेल, झीशान मिर्झा यांचाही टीममध्ये समावेश होता.

सविस्तर वाचा...

14:18 (IST) 22 Aug 2023
माजी मंत्री नितीन राऊत यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन घटले?

नागपूर : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्यातील नेत्यांना स्थान देताना प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री डॉ. नितीन राऊत यांना समितीमध्ये स्थान मिळू न शकल्याने त्यांचे पक्षातील राजकीय वजन कमी झाल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा...

14:16 (IST) 22 Aug 2023
बिबट्याच्या कातडीची परदेशात विक्री; सीमाशुल्क विभागाकडून साताऱ्यातून एकाला अटक

बिबट्याची कातडी परदेशात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास सीमाशुल्क विभागाने (कस्टम) साताऱ्यातून अटक केली. त्याच्या घरातून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

14:05 (IST) 22 Aug 2023
वाशीम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद पेटला, आंदोलनकर्त्यांनी नांदेड अकोला महामार्ग रोखला

वाशीम : मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने नव्याने चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतर ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत चिवरा परिसरातील ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत अकोला नांदेड महामार्ग रोखून धरला. यावेळी भाजपा आमदाराचा निषेध करण्यात आला.

सविस्तर वाचा...

13:54 (IST) 22 Aug 2023
धुळ्यातून चार दुचाकींची चोरी

धुळे: शहरातील वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकलींची चोरी करण्यात आली आहे. शहरातील वालचंद बापूजी नगरातील संदीप सोनवणे (रा. मोहाडी) यांच्या घराच्या अंगणातून २० हजार रुपयांची मोटरसायकल चोरीस गेली.

सविस्तर वाचा...

13:35 (IST) 22 Aug 2023
“कांदा नाही खाल्ला तर कोणी मेले आहे का? बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान, कांद्याला दिला ‘हा’ पर्याय

पिंपरी-चिंचवड : माजी कृषिमंत्री दादा भुसे यांचा कित्ता आमदार बच्चू कडू यांनी गिरवला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असा प्रश्न करत त्यांनी नागरिकांपुढे पर्याय ठेवला आहे. कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे आणि लसूण खायचा नसेल तर मुळा खा, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल आहे. मी सरकारमध्ये असलो तरी हे सरकार नालायक प्रवृत्तीचे आहे. हे सरकार कधी – कधी नामर्दासारखं वागत आहे. त्यांनी सुधारलं पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. ते माझं कर्तव्य आहे, असं देखील खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले आहेत. आमदार बच्चू कडू हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 22 Aug 2023
करंजाडे, कामोठे, कळंबोली येथील सिडको वसाहतीत पाण्याची बोंब; पावसाळ्यातही टँकर मागवण्याची वेळ

पनवेल: तालुक्यातील करंजाडे, कामोठे आणि कळंबोली या सिडको वसाहतींमध्ये पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 22 Aug 2023
घाऊक व स्वस्त मासळीसाठी उरणला या ! करंजा बंदर खुला झाल्याने मासळीची आवक वाढली

मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता उरणच्या करंजा बंदरात उतरू लागली आहे. त्यामुळे घाऊक व स्वस्त मासळी मिळण्याचे नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मासळी खरेदी करायची असेल तर उरणच्या करंजा बंदरात या असे आवाहन येथील मच्छिमारांनी केले आहे.

वाचा सविस्तर...

13:02 (IST) 22 Aug 2023
उरण एज्युकेशन विद्यालय संस्थेच्या ओळखपत्र शुल्काला भाजपचाही विरोध

आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली उरण एज्युकेशन सोसायटी या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या विद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रासाठी ५५० रुपये आकारण्यात येत आहेत. आता उरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपानेही पालकांची साथ देत याचा निषेध केला आहे.

वाचा सविस्तर...

13:02 (IST) 22 Aug 2023
कांदाप्रश्नी फडणवीसांची जपानहून मुंडेंवर बाजी!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असले तरी, कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत कांद्याच्या प्रश्नावर कसा तोडगा काढतात याकडेच बहुधा असावे! फडणवीसांनी परदेशातूनही मुंडेंवर (अजित पवारांवर!) कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच ती फडणवीसांनी जपानहून केल्यामुळे मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 22 Aug 2023
जेएनपीए बंदरात सडतोय कांदा; २०० कंटेनर मधील ४ हजार टन सडू लागला

उरण: कांदा निर्यातीवर शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात दुबई, श्रीलंका आणि मलेशिया या देशात निर्यातीसाठी आलेला २०० कंटेनर मधील ४ हजार टन कांदा सडू लागला आहे.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 22 Aug 2023
राज्यात प्रथमच! ससूनमध्ये ‘लठ्ठपणा’साठी स्वतंत्र वॉर्ड

ससूनमध्ये लठ्ठपणावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला असून अशी सुविधा देणारे ते राज्यातील पहिलेच सरकारी रुग्णालय ठरले आहे.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 22 Aug 2023
पुणेकरांचे २१०० कोटी ‘खड्ड्यात’, रस्ते दुरुस्तीची मलमपट्टी; खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कायम

गेल्या सहा वर्षांत रस्तेदुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने तब्बल दोन हजार १०० कोटींचा खर्च केला आहे. त्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने शहरातील सर्व रस्ते दुरुस्तीसाठी किमान एक हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

वाचा सविस्तर...

12:45 (IST) 22 Aug 2023
‘पावसाक्षरं’मध्ये सजली पावसाची विविध रूपे

अकोला: पाऊसगीतं, गद्य उतारे आणि कविता यांची एकत्र गुंफण असणारा सुरेख पावसाक्षरं कार्यक्रमातून पावसाची विविध रूपे उलगडली.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 22 Aug 2023
वर्धा : नसते धाडस बेतले जिवावर, पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्याच्या नादात दोघे वाहून गेले, अखेर मृतदेहच हाती लागले

वर्धा : पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्याचे धाडस दोघांच्या जिवावर बेतले. ही घटना सोमवारी रात्री सालई ते बोर मार्गावरील पुलावर घडली.

सविस्तर वाचा..

ministry-to-resolve-complaints-received-through-the-prime-minister-office

पंतप्रधान कार्यालयांमार्फत (पीजी पोर्टल) प्राप्त झालेल्या तक्रारींचा ३१ ऑगस्टपर्यंत निपटारा करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची सध्या धावपळ सुरू झाली आहे.  राज्यातील नागरिकांकडून वैयक्तिक पातळीवर पीजी पोर्टलवर मोठय़ा प्रमाणावर तक्रारी केल्या जात आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्रवेश नाकारला,  यांपासून ते सातबाराचा उतारा मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर केल्या जात असल्याचे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले

Story img Loader