Mumbai Maharashtra News Today -महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. संजय राऊत हे राष्ट्रवादीत जातील असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तर शरद पवार हे मागच्या सात दिवसांपासून चर्चेत आहेत. आज सामनाच्या अग्रलेखात शरद पवारांनी वारस तयार केला नाही असं म्हटलं गेलं आहे. यावर शरद पवारांनीही भाष्य केलं आहे. आपण सामना वाचला नाही. पण शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे त्यामुळे योग्य तीच भूमिका त्यांनी घेतली असेल असं वाटतं तसंच वारस तयार केला गेला नाही हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बारसूचा दौरा केला या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात लागू शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. या सगळ्या घडामोडींसह दिवसभरात काय काय घडणार या जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai News Live Update|महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार का?
पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सह विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडीअडचणींबाबत चर्चेसाठी विद्यार्थी संघटनांतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियोजित कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परवानगी देत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुणे: शाळा सोडल्याचा दाखला मिळवून देण्यासाठी एका महिलेकडून ९१ हजार रुपये उकळणाऱ्या तोतया पत्रकाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली.
मुंबईः पाच वर्षे आणि चार वर्षांच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली.
नवी मुंबई : कळंबोलीत राहणारे जसपाल सिंग खोसा (वय ४८) हे नेहमी प्रमाणे आपल्या श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यास एका उद्यानात गेले होते.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या 'सर्जा- राजा' या बैलजोडीला मिळाला आहे.
पुणे: वडगांव जलकेंद्र येथील विद्युत वाहिनीच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून गुरुवारी (११ मे) करण्यात येणार आहे.
मुंबईः गोरेगाव पूर्व येथे १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव: वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
अमरावती : जिल्ह्यात उष्णतेच्या झळा आता जाणवू लागल्या असून, उष्माघाताचा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी पशुसंवर्धन विभागही सज्ज झाला आहे. केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो.
जळगाव: पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे दीड-दोन लाख लोकसंख्येच्या धरणगाव या तालुक्याच्या शहरात गेल्या २२ दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नाही.
अमरावती : समाज माध्यमांचा वाढता वापर स्वागतार्ह मानला जात असला, तरी या माध्यमांतून चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कल्याण – देशाच्या विविध भागात एका बनावट पर्यटन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी निघालेल्या डोंबिवली, कल्याणमधील तीन महिलांची एक लाख २० हजार रुपयांची पर्यटन कंपनीच्या प्रवर्तकांनी फसवणूक केली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांना आता पाणवठ्यातील पाणी नको तर ‘बिसलेरी’चे पाणी त्यांची तहान भागवत आहेत. या व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे ‘बिसलेरी’च्या बाटलीशी खेळताना आढळले आहेत.
कल्याण: भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरुध्द नवी दिल्लीत सुरू असलेल्या महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कल्याण शहर युवक काँग्रेसतर्फे सोमवारी कल्याण मधील छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कल्याण – डोंबिवलीतील ६५ महारेरा घोटाळ्यातील एकाही बेकायदा इमारतीमधील सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या दस्तांची नोंदणी करू नका, असे आदेश ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मागील वर्षी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांबरोबर कल्याण, डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक कार्यालयांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करणाऱ्या कल्याणमधील एका सह दुय्यम निबंधकाला विशेष तपास पथकाने नोटीस बजावली आहे.
गोंदिया: सडक अर्जुनी येथील एक्वा ॲडव्हान्चर वॉटर पार्कमध्ये नयनपुर डूग्गीपार तरणताळ येथे बॉल पासिंग खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून बाचाबाची नंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
ठाणे : शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांवर मोफत वाहने उभी करण्याची सुविधा गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.
डोंबिवली – मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकातील जमिनीलगतचे आणि उन्नत कोपर रेल्वे स्थानक (दिवास-वसई मार्गावरील) जोडणारा पादचारी पूल कोणत्याही उद्घाटनाविना मध्य रेल्वे प्रशासनाने खुला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे मार्गातून उड्या मारत येण्याचा, जुना अवघड जिना चढण्याचा त्रास वाचला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वाढू लागलेला करोनाचा संसर्ग दोन महिन्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी होऊ लागल्याचे चित्र आहे.
गोंदिया: ५ मे बुद्ध पौर्णिमेला रद्द करण्यात आलेली प्राणी गणना आता वटपौर्णिमेला करण्याचा विचार सुरू आहे. तसा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.
वाशीम : सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रिसोड शहरातदेखील रविवारी एका संस्थानवर लग्नासाठी वऱ्हाडी जमले, नवरदेव वाजत गाजत मित्र परिवारासह लग्नमंडपी जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच, वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरासह पलायन केले.
चंद्रपूर : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला दिले.
वर्धा : करोना संक्रमण काळात आपल्या कार्यशैलीने चांगलेच वादग्रस्त ठरलेले वर्धा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची अखेर शासनाने बदली केली आहे. ते नागपूर महापालिकेत उपायुक्त म्हणून बदलून जाणार आहेत. जवळपास चार वर्षे वर्धेत घालविणारे बगळे वेगवेगळ्या कारणांनी वर्धेकरांच्या चांगलेच लक्षात राहतील.
पुणे: तब्बल सहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बंगल्यात प्रवेश केलेल्या बिबट्याने कुत्र्याला उचलून नेल्याची घटना नुकतीच मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे.
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आणि उर्वरित ग्रामीण भागातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे गेल्या काही महिन्यांपासूनचे अनुदान थकले आहे.
सोलापूर : राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवा आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
कल्याण – कल्याण पूर्वेतील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवली-ढोकळी, मलंग गड रस्त्यांच्या काही भागात बेकायदा इमारतींचे मल, सांडपाणी भुयारी गटारात सोडण्याची व्यवस्था नाही. हे पाणी दररोज रस्त्यांवर वाहून येते. या दुर्गंधीयुक्त रस्त्यांवरून चालणे, पाण्यातून वाहने नेणे वाहन चालकांना अवघड होत आहे. परिसरातील रहिवासी या तुंबणाऱ्या पाण्याने हैराण आहेत.
ठाणे – ठाण्यातील उपवन तलावात सोमवारी सकाळी एका वृद्धेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुलोचना खोचरे (६७) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणाचा तपास वर्तक नगर पोलिसांकडून सुरू आहे.
चंद्रपूर : बिग फाईव्ह नावाने ओळखले जाणाऱ्या भानुसखिंडीत वाघांचे दर्शन न झाल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी दर्शनाविनाच रविवारी ताडोबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, छोटी तारा, मोगली, मटका, माया, भानूसखिंडीचे बछडे (बिग फाईव्ह), युवराज आदी वाघ वाघिणींचे मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर यांना दर्शन झाले. चार दिवसांच्या सफारीत अनेकांचे दर्शन झाले असले तरी भानूसखिंडीच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली.
गडचिरोली : भामरागडचे गटविकास अधिकारी आणि शाखा अभियंता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्यांना वाचविण्यासाठी ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले. हा आमच्यावरील अन्याय असून ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
[caption id="attachment_3581686" align="alignnone" width="670"]
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर याच आठवड्यात निकाल येणं अपेक्षित आहे. तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत जाणून घ्या त्याबाबत.