Latest News Today: कर्नाटक निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमवीर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नुकतेच मुंबईत येऊन गेले. यावेळी भाजपाच्या सर्वच नेत्यांनी मुंबई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याशिवाय नड्डांनी भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही एकत्र निवडणुका लढण्याचा सूर दिसतोय. या पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुका राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींच्या ठरणार, हे चित्र सध्या दिसत आहे.

Live Updates

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

21:11 (IST) 18 May 2023
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, तीन जखमी

बुलढाणा: समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन उलटली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. आज, गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

20:51 (IST) 18 May 2023
न्यायाधिशाविरूध्द न्यायाधिशाने दाखल केलेले चार खटले रद्द

सोलापूर: माळशिरस तालुक्यातील पालखी मार्गासाठी केलेल्या भूसंपादनप्रकरणी एका जिल्हा न्यायाधिशाने अकलूजच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शमा पवार-ढोक यांच्या विरूध्द दाखल केलेला दावा माळशिरसच्या सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.

सविस्तर वाचा...

20:23 (IST) 18 May 2023
अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळेंचे स्मितहास्य

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी झाली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदीउपस्थित होती.

सविस्तर वाचा...

19:56 (IST) 18 May 2023
अमरावती: नवविवाहित दाम्पत्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या; नऊ महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह

अमरावती: नऊ महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने अचलपूर तालुक्‍यातील वझ्झर येथील धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली.

सविस्तर वाचा...

19:49 (IST) 18 May 2023
सोलापूर : भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचे विषप्राशन

सोलापूर : भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करून सोलापुरात पोलिसांत फिर्याद नोंदविलेल्या एका तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विषप्राशन केले.

वाचा सविस्तर...

19:19 (IST) 18 May 2023
अमरावती : नवनीत राणांविरोधात निवडणूक लढणार असल्‍याच्‍या चर्चेला सुषमा अंधारे यांचा पूर्णविराम!

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्‍या विरोधात शिवसेनेच्‍या ठाकरे गटाच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे या निवडणूक लढणार असल्‍याच्‍या चर्चेला खुद्द सुषमा अंधारे यांनी पूर्णविराम दिला आहे. तांत्रिकदृष्‍ट्या आपल्‍याला अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढता येणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

वाचा सविस्तर...

19:10 (IST) 18 May 2023
लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे निलंबित; २० हून अधिक बँक खात्यांचे गौडबंगाल

नाशिक: ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (५७) यास शासनाने निलंबित केले आहे. खरे सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या मालमत्तेचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

सविस्तर वाचा...

18:49 (IST) 18 May 2023
नवी मुंबई : पावसाळ्यात एपीएमसीत पाणी तुंबण्याची शक्यता

नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाचा निर्णय रेंगाळल्याने धोरणात्मक निर्णयाबरोबर मान्सून पूर्व नालेसफाईही रखडली आहेत. पावसाळ्याआधी ही कामे करण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक कामाच्या मंजूरीसाठी पणन संचालकांना प्रस्ताव पाठवला आहे.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 18 May 2023
केंद्रीय मंत्रिमंडळ ‘पीएमओ’ चालवते, मंत्र्यांना विचारा, ते सांगतील… नाना पटोले यांची मोदींच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदे मंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यांना तुलनेने कमी महत्वाचे खाते दिले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्जून राम मेघवाल यांना कायदेमंत्री बनवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

18:22 (IST) 18 May 2023
कल्याणमध्ये साप चावून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

कल्याण: येथील पूर्व भागातील कोळसेवाडीत एका रसवंती गृहात एका १५ वर्षाच्या मुलाला साप चावल्याने त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पालिका रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 18 May 2023
राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर

नागपूर: राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर गेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.

वाचा सविस्तर...

17:58 (IST) 18 May 2023
यवतमाळ: ‘एमडी ड्रग्ज’ची तस्करी, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ: दारव्हा तालुक्यातून ‘एमडी’ नावाच्या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची टीप मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली. या कारवाईत १४१ ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह १६ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 18 May 2023
बुलढाणा : महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व; चिखली, देऊळगाव राजा बाजार समित्यांमध्ये सभापती, उपसभापती अविरोध

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली व देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधकांना या ठिकाणी काही संधीच नसल्याने दोन्ही ठिकाणी आघाडीचे उमेदवार अविरोध निवडून आले.

वाचा सविस्तर...

17:36 (IST) 18 May 2023
नाशिक: दरेगाव शिवारात तीन संशयित गुन्हेगारांना अटक

नाशिक: दरेगांव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य चार संशयित फरार आहेत. संशयितांकडून पोलिसांनी ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर वाचा...

17:21 (IST) 18 May 2023
४१ कोटींच्या स्थानकावर २४ कोटींचे पार्किंग, नागपूर मेट्रोचा अफाट खर्च

नागपूर: महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा कार्यकाळ विवध कामांवर झालेल्या अफाट खर्चाने गाजला. ४१.२२ कोटीच्या कस्तूरचंद पार्क स्थानकावर तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्च करून वाहनतळ उभारण्यात आले.

सविस्तर वाचा...

17:20 (IST) 18 May 2023
धक्कादायक! आठवीची विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती, सातवीच्या विद्यार्थ्यावर बलात्काराचा गुन्हा

नागपूर : आठव्या वर्गात शिकणाऱ्या बहिणीच्या वर्गमैत्रीणीवर सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा जीव जडला. दोघांचे अल्पवयीन प्रेम काही दिवसांत फुलले. मुलगी तब्बल चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

सविस्तर बातमी...

16:55 (IST) 18 May 2023
“..तर २६/११ चा हल्ला नाना पटोलेंनीच केला”, देवेंद्र फडणवीसांचं ‘त्या’ आरोपांवर प्रत्युत्तर

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानी जी स्फोटके सापडली होती, ती फडणवीसांनीच ठेवली होती, असा मोठा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोलेंच्या या आरोपावर आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.” २६/११ चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला असं स्टेटमेंट द्यावं का अशी माझी इच्छा झाली आहे”, असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 18 May 2023
अकोला: मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू; तब्बल वर्षभरानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल

अकोला: मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप तेल्हारा येथील डॉक्टरवर करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी करून तब्बल वर्षभरानंतर आरोपी डॉक्टरवर तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 18 May 2023
वाहनचालकांकडून ‘चवलीपावली’ घेणारे दोन पोलीस हवालदार निलंबित; पैसे घेतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या स्वारगेट वाहतूक विभागातील बाळू दादा येडे व गौरव रमेश उभे अशा दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 18 May 2023
सैन्यदलातील जवान मुलगा १३ वर्षांपासून बेपत्ता; आई-वडिलांचे बेमुदत उपोषण

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या माळेगाव पिंप्री येथील रवींद्र भागवत पाटील हा ३२ वर्षीय जवान (६४९८१६७-W) जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असतानापासून बेपत्ता झाला आहे. त्याला १३ वर्षे झाली असून त्याचा शोध घेण्यासाठी सैन्य दलाचे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवून उपयोग होत नसल्याचा आरोप करत जवान रवींद्र पाटील यांचे आई-वडील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

सविस्तर वाचा...

16:17 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: नाना पटोलेंना पुरस्कारच द्यायला हवा - देवेंद्र फडणवीस

नाना पटोलेंना पुरस्कारच द्यायला हवा. नाना पटोले म्हणाले अंबानीच्या घरासमोर स्फोटकं मीच ठेवली. मलाही असं वाटायलं लागलं की असं म्हणालं २६/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. माझा सवाल आहे की वाझेला पोलीस दलात पुन्हा कुणी घेतलं? या वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची माणसं माझ्याकडे आली होती. मी फाईलवर लिहिलं मी हे करणार नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर वाझेला पुन्हा नोकरीत घेतलं. तो वाझे मातोश्री किंवा वर्षावर असायचा. आता परमबीर सिंगनं तुमच्यावर आरोप केले तर आमची काय चूक आहे? त्याला मुंबईचं आयुक्त उद्धव ठाकरेंनीच केलं. आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच काढलं. वाझेच्या जबानीत सगळं पुढे आलंय - देवेंद्र फडणवीस

16:12 (IST) 18 May 2023
महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवरील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळणीनंतरच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण प्रकल्पाची महारेरा नोंदणी करून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून, असे गैरप्रकार रोखण्यासाठी आता महारेराने नोंदणी प्रक्रिया आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा..

16:11 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: पुढचं एक वर्ष कुणीही काहीही मागायचं नाही - देवेंद्र फडणवीस

पुढचं एक वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुणीही काहीही मागायचं नाही. कुणी कोणतं पद मागायचं नाही, समिती मागायची नाही, मंत्रीपद मागायचं नाही. पक्षानं मला काय दिलं यापेक्षा मी पक्षाला काय दिलं या भावनेतून सगळ्यांनी काम करायला हवं - देवेंद्र फडणवीस

16:05 (IST) 18 May 2023

महाराष्ट्रात कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, भाजप पॅटर्न, मोदी पॅटर्न, छत्रपती शिवराय पॅटर्न - देवेंद्र फडणीस

16:05 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update:

जे म्हणतायत कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना सांगेन हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवरायांनी एकेक मावळा तयार केलाय. त्याला देव-देश-धर्मासाठी कसं लढायचं हे माहिती आहे - देवेंद्र फडणवीस

16:04 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: ज्यांना पोरगा झाला नाही, तेही... - फडणवीस

कर्नाटकात आपला पराजय झाल्याबरोबर काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही, तेही आपल्यालाच पोरगा झाला अशा आनंदात उड्या मारत आहेत. ज्यांचा एकही माणूस निवडून आलेला नाही, तेही आनंद साजरा करतायत. पण त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सर्व १७ महापौर थेट निवडणुकीत निवडून आले. पण त्याची चर्चा झाली नाही. देवबंदसारखी नगरपालिकाही भाजपानं जिंकली. तिथे ६५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. कारण भाजपानं सशक्तपणे काम केलं - देवेंद्र फडणवीस

16:01 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: फडणवीसांना उद्धव ठाकरेंना टोला!

आत्ताच्या शिल्लक सेनेने न्यायालयात ८ याचिका दाखल केल्या होत्या. त्यातली एकही न्यायालयाने मान्य केली नाही. पण उद्धवजी म्हणतायत गावोगावी जा आणि आपलाच विजय झालाय असं सांगा. बडवा. आपल्या बापाचं काय जातंय. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका पोपट मेलाय. पण उद्धवजींना कुणी हे सांगायला तयार नाही की पोपट मेलाय - देवेंद्र फडणवीस

15:53 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: मुंबई तुंबली, तर कुणालाही सोडणार नाही - एकनाथ शिंदे

वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक होणार असल्याचं सांगतानाच पाणी तुंबलं, लोकांना त्रास सहन करावा लागला तर कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

15:51 (IST) 18 May 2023
बुलढाणा : ‘वंचित’च्या ‘युवांनी शिजविली ‘बिरबलची खिचडी! उच्चशिक्षितांचा विदारक देखावा ठरला लक्षवेधी; मोदी सरकारच्या ‘त्या’ दाव्याची पोलखोल

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आज करण्यात आलेले ‘बिरबलची खिचडी’ आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले. खिचडी व उच्च शिक्षितांच्या बेरोजगारीचा ‘देखावा’ कडक उन्हातही सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.

सविस्तर वाचा..

15:50 (IST) 18 May 2023
Maharashtra News Update: बावनकुळेंचा राउतांना टोला

बघुयात ना. घोडा-मैदान समोर आहे. भाजपा-शिवसेना उद्याही निवडणूक घ्यायला तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टात असल्यामुळे, त्यांनी या निर्णयाविरुद्ध अपील केल्यामुळे ही केस लेट होतेय. जेव्हा निवडणुका होतील, संजय राऊतांना दिसेल की नड्डांचा प्रवास किती महत्त्वाचा होता. - चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर