Latest News Today: कर्नाटक निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमवीर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नुकतेच मुंबईत येऊन गेले. यावेळी भाजपाच्या सर्वच नेत्यांनी मुंबई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याशिवाय नड्डांनी भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही एकत्र निवडणुका लढण्याचा सूर दिसतोय. या पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुका राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींच्या ठरणार, हे चित्र सध्या दिसत आहे.

Live Updates

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

15:38 (IST) 18 May 2023
अकोला पोलिसांचे आता सोशल मीडियावर लक्ष; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला बजावल्या नोटिसा

अकोला : शहरात हिंसाचाराची घटना घडल्यानंतर आता अकोला पोलिसांनी समाजमाध्यमांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘व्हॉट्सॲप’ समूह ॲडमिनला विविध पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांनी नोटीस बजावल्या आहेत.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 18 May 2023
संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर येताच उडाली खळबळ, कारण काय?

नागपूर : रेल्वेने लांबचा प्रवास करीत असताना आजारी व्यक्तीने आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. अशा व्यक्तीसोबत परिचित व्यक्तीने प्रवास करणे उत्तम ठरते. त्यामुळे अचानक आजार बळावला तर तातडीची मदत मिळू शकते. एकट्याने प्रवास करीत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि नागपूर रेल्वे स्थानकावर बंगळुरू-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेस पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 18 May 2023
पुणे : बैलगाडा शर्यतीचा मार्ग खुला; श्रेयवादावरून खासदार कोल्हे आणि आमदार लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर!

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली असून, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात बैलगाडा मालक, प्रेमी आणि शौकीन यांनी जल्लोष साजरा केला आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू झाल्याने राजकीय नेत्यांमधील श्रेयवाद पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 18 May 2023
डोंबिवलीत देवीचापाडा येथे वर्दळीच्या रस्त्यात सात माळ्याची बेकायदा इमारत

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील काळुबाई मांढरादेवी मंदिरा लगत खाडी किनारी जाण्याच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दोन भूमाफियांनी एक बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे.

सविस्तर वाचा…

14:45 (IST) 18 May 2023
एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल‌, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.

वाचा सविस्तर…

14:39 (IST) 18 May 2023
चंद्रपूर : “एसबीआय कर्ज घोटाळाप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी; १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बनावट आयकर रिटर्न्स व चुकीचे अंकेक्षण दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी कनिष्ठ अधिकारी व कर्जदारांना अटक करण्यात आली. मात्र, अजूनही राजकीय दबावामुळे मोठे बिल्डर्स, सनदी लेखापाल, तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडिट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी केली.

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 18 May 2023
नागपूर : कामगार कल्याण केंद्र, की असामाजिक तत्त्वाचा अड्डा?

नागपूर : दक्षिण नागपुरातील सोमवारी कॉटरमधील कामगार केंद्राच्या इमारतीत असामाजिक तत्त्वाचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.

सविस्तर वाचा..

14:26 (IST) 18 May 2023
अकोला बाजार समितीवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम; सभापतीपदी शिरीष धोत्रे, ज्ञानेश्वर महल्ले उपसभापती

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिरीष धोत्रे, तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर महल्ले यांची गुरुवारी अविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे सलग चौथ्यांदा सभापतीपदी विराजमान झाले. या बाजार समितीवर धोत्रे गटाची तब्बल ४० वर्षांपासून सत्ता असून राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले आहे.

सविस्तर वाचा…

14:26 (IST) 18 May 2023
मुंबई : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींवर नोटीस बजावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत एकूण २१६ इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या असून, या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा..

14:25 (IST) 18 May 2023
गिरणी कामगारांचे मंगळवारी एमएमआरडीएविरोधात धरणे आंदोलन; रांजनोळीतील १२४४ घरांच्या दुरुस्तीसाठी कामगार रस्त्यावर

मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी रांजनोळी येथील १,२४४ घरे राखीव असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या घरांच्या दुरुस्तीबाबत उदासीन असल्यामुळे गिरणी कामगार संतप्त झाले आहेत.

सविस्तर वाचा…

14:25 (IST) 18 May 2023
अमरावती : नामांकित विकासकांचा वाद पो‍होचला पोलीस ठाण्‍यात; फसवणुकीचा गुन्‍हा दाखल

अमरावती : शहरातील नामांकित उद्योजक आणि भू-विकासक नरेंद्र भारानी तसेच दुसरे भू-विकासक संजय हरवानी यांच्‍यातील वाद आता पोलीस ठाण्‍यात पोहोचला असून भारानी यांच्‍या तक्रारीच्‍या आधारे हरवानी यांच्‍या विरोधात नांदगावपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्‍हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा..

13:48 (IST) 18 May 2023
वीजचोरी करणे महागात; आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी

जळगाव: चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वीजचोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एकाला एक वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांनी सुनावली.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 18 May 2023
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत केले जाणार ‘हे’ संकल्प

पुणे: आगामी वर्षात होणा-या सर्व प्रकारच्या निवडणुकांच्या दृष्टीने पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीची बैठक होत असून या बैठकीत राजकीय विचारमंथन होऊन काही ठराव संमत केले जातील, अशी माहिती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 18 May 2023
अमरावती : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे लोकसभा निवडणूक लढणार? भाजपा-शिंदे गटाला ‘टक्कर’ देण्यासाठी ठाकरे गटाची खेळी

अमरावती : शिवसेना ठाकरे गटाच्‍या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्‍याची चर्चा रंगली असून, ठाकरे गटाच्‍या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळाल्‍यास भाजपाच्या सहयोगी खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

12:49 (IST) 18 May 2023
मुंबई : ‘इन्‍कोव्‍हॅक’ लसीला अल्प प्रतिसाद; २० दिवसांत केवळ ८९ जणांनी घेतली लस

मुंबई : ‘कोविशिल्ड’ अथवा ‘कोवॅक्सिन’ची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा घेता यावी यासाठी २८ एप्रिलपासून नाकावाटे घ्‍यावयाची ‘इन्‍कोव्‍हॅक’ करोना प्रतिबंधित लस उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून या लसीला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील २० दिवसांमध्ये मुंबईतील केवळ ८९ जणांनी ही लस घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 18 May 2023
नागपूर: मालगाडीचे दोन वॅगन रुळावरून घसरले; कॉर्ड लाईनवर अपघात झाल्याने…

नागपूर: रासायनिक खते घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे दोन वॅगन नागपुरातील कळमना रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर बुधवारी रात्री रुळावरून घसरले.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 18 May 2023
दक्षिण गडचिरोलीवर पुन्हा एकदा ‘खाण संकट’!

गडचिरोली : सूरजागड लोहखाणीमुळे चर्चेत असलेल्या दक्षिण गडचिरोली परिसरात पुन्हा चार लोह आणि एक चुनखडी अशा पाच खाणींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात तीन दशकांपासून प्रलंबित असलेली देवलमरी-काटेपल्ली चुनखडी (सिमेंट) खाण ‘अंबुजा’, तर सूरजागड टेकडीवरील चार लोहखाणी ‘जिंदाल’सह इतर चार कंपन्यांना पुढील प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे दक्षिण गडचिरोलीवर पुन्हा एकदा ‘खाण संकट’ ओढवल्याची भीती येथील नागरीक व्यक्त करीत आहे.

सविस्तर वाचा..

12:33 (IST) 18 May 2023
बैलगाडा शर्यतीला परवानगी कशी मिळाली?, वैज्ञानिक अहवालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बैल धावणारा प्राणी…”

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे. अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पारित केलेला बैलगाडा शर्यतीसंदर्भातील कायदा अवैध नव्हता हे सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सविस्तर वाचा

12:17 (IST) 18 May 2023
गडचिरोली : शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात! अनेक शिक्षण संस्था अडचणीत येणार

गडचिरोली : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद असतानाही काही जिल्ह्यांमध्ये मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्यांच्या बनावट पत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यापर्यंत असून आता चौकशी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे बोगस शिक्षक भरती करणाऱ्या काही शिक्षण संस्था अडचणीत येण्याची चिन्हे आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 18 May 2023
लोहमार्ग पोलिसांकडून चोरीसह नऊ गुन्हे उघडकीस; सव्वा चार लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

मनमाड: धावत्या रेल्वे गाडीत प्रवाशांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्यांचे किंमती भ्रमणध्वनी आणि सामान चोरीच्या घटना नेहमीच घडतात. कधी त्या उघडकीस येतात, कधी प्रवासी तक्रार न देताच निघून जातात.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 18 May 2023
वर्धा : २०१९ ची निवडणूक शेवटची संधी? रोखठोक भूमिका घेणारे भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी ‘तो’ दावा फेटाळला

वर्धा : रोखठोक भूमिका घेवून भाजपामध्ये खळबळ उडवून देणारे आर्वीचे आमदार दादाराव केचे आता आरपारच्या लढाईत उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून माझ्या पत्राशिवाय माझ्या मतदारसंघात निधी देताच कसा, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केल्याने ज्येष्ठ नेतेही थक्क झाले.

सविस्तर वाचा..

11:58 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

मला आनंद आहे. कारण तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर २६/११ हल्ल्यातला पाकिस्तानचा हात जगजाहीर होणार आहे. तो तसाही सर्वांना माहितीच आहे. पण जेव्हा तो कायद्यानं जगजाहीर होतो, तेव्हा पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून अंकित करण्यासाठी किंवा त्याच्यावर निर्बंध घालण्यासाठी मोठा फायदा आपल्याला होणार आहे. डेविड हेडलीची साक्ष आपण घेतली. त्या साक्षीमुळे हा मार्ग खुला झाला आहे. यासाठी मी विशेष सरकारी वकिलांचं मनापासून अभिनंदन करेन. मोदी सरकारमुळे आपण हे करू शकलो. कारण मोदी सरकारने यात पुढाकार घेतला होता. उज्ज्वल निकम यांनी स्वत: जाऊन डेविड हेडलीची साक्ष घेतली. त्यामुळे हे शक्य झालं – देवेंद्र फडणवीस

11:51 (IST) 18 May 2023
त्र्यंबकेश्वर मंदिरप्रकरणी आता संजय राऊतांकडूनही चौकशीची मागणी; म्हणाले, “गोमूत्रधारी दंगलखोर…”

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात स्थानिक दुसऱ्या धर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी गठीत केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

वाचा सविस्तर

11:50 (IST) 18 May 2023
नड्डा, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक; उदय सामंत म्हणाले, “नेत्यांच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत…”

जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल (१७ मे) बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा झाली असल्याचीही माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. दरम्यान याप्रकरणी मंत्री उदय सामंत यानी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर

11:50 (IST) 18 May 2023
नागपूर : पेट्रोल पंपचालकाचा भर दुपारी खून, दीड लाखांची लुटमार

नागपूर : भिवापूर ते नागभीड रोडवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपवर तिघांनी पंपचालकाचा चाकूने हल्ला करून खून करीत लुटमार केली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली.

सविस्तर वाचा..

11:43 (IST) 18 May 2023
नाशिक: लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यासह तिघे ताब्यात

नाशिक: आजारपणातून बरे झालेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 18 May 2023
नागपूर : काही वादग्रस्त वाहतूक पोलिसांच्या बदल्या

नागपूर : शहरातील काही पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील काही वादग्रस्त आणि बहुचर्चित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा पोलीस आयुक्तांनी लावला आहे.

सविस्तर वाचा..

11:27 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1659074839439904768

11:20 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: तिसऱ्या आघाडीत फूट पडेल – दानवे

त्यांच्या बैठका होऊ द्या, त्यांचे दौरे होऊ द्या. पण २०२४ मध्ये राज्यात आणि देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार होणार आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न याआधी दोन वेळा झालाय. दोन्ही वेळा अपयशी ठरलाय. निवडणुकीपर्यंत एक राहतील, निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावरून पुन्हा फूट पडेल. हे कुणी एकत्र येत नाहीत. आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही – रावसाहेब दानवे

11:16 (IST) 18 May 2023
नियोजनबद्ध महामुंबईसुद्धा जलसंपन्नच; सिडको, नवी मुंबई, पनवेल पालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ठाम विश्वास

नवी मुंबई – मुंबई विस्तारली व नव्याने नवी मुंबई शहर निर्मितीस आले. आता नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आकारास येतय. त्यामुळे वाढत्या शहरासाठी पनवेल पालिकेची स्थापना झाली. पण याच विमातळामुळे महामुंबईचा विस्तार रायगड जिल्हापर्यंत पोहोचलाय. वाढणाऱ्या व विकसित होणाऱ्या शहराची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. याच पाण्याबाबत नियोजनबद्ध महामुंबईसुद्धा जलसंपन्न ठरणार असल्याचा विश्वास याच ठिकाणी काम करणाऱ्या शासनाच्याच आस्थापनांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर