Latest News Today: कर्नाटक निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमवीर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नुकतेच मुंबईत येऊन गेले. यावेळी भाजपाच्या सर्वच नेत्यांनी मुंबई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याशिवाय नड्डांनी भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही एकत्र निवडणुका लढण्याचा सूर दिसतोय. या पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुका राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींच्या ठरणार, हे चित्र सध्या दिसत आहे.

Live Updates

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:58 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: हा न्यायव्यवस्थेचा विजय आहे – संजय राऊत

कायदामंत्रीपदावर बसू शकेल आणि न्यायव्यवस्था, कायदा स्वतंत्रपणे हाताळू शकेल, अशी व्यक्तीच केंद्रीय मंत्रीमंडळात नाही. मग ते याला काढून त्याला ठेवा. सध्या ज्याला काढलाय किरेन रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण न्यायवृंद कायदामंत्र्यांच्या विरोधात होतं. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. हा आपल्या न्यायव्यवस्थेचा विजय आहे. न्यायव्यवस्थेत राजकारण आणि
दबाव आणण्याचा प्रयत्न रिजिजू करत होते – संजय राऊत

10:52 (IST) 18 May 2023
वर्धा : ‘समान काम समान वेतन अन्यथा राज्यव्यापी कामबंद आंदोलन’; नर्सेस संघटनेचा इशारा

वर्धा : राज्यभर आंदोलन करणाऱ्या नर्सेस संघटनेने आता निर्वाणीचा इशारा राज्य शासनास दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची ही संघटना आहे.

सविस्तर वाचा..

10:44 (IST) 18 May 2023
वाहनांच्या लिलावातून पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत करोडो रुपये

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने १४ वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वापरात नसलेल्या आणि जुन्या अशा एकूण १२० वाहनांचा लिलाव होणार असून या द्वारे महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी नऊ लाख रुपये जमा होणार आहेत.

वाचा सविस्तर…

10:36 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: “मुंबईत लुडबुड करू नका”

तुम्ही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. मुंबईत येऊन लुडबुड करू नका. मुंबई ताब्यात घेण्यासाठी तुम्ही प्रचंड प्रयत्न सुरू आहेत बेकायदेशीर मार्गाने. कर्नाटक तुम्ही का हरलात, यावर तुम्ही बोलायला हवं. कर्नाटक हे भाजपाच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं. मिस्टर ४० परसेंट असं तिथल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना म्हणत होते. यावर त्यांनी बोलायला हवं. संरक्षण खात्यात हेरगिरीची प्रकरणं वाढली आहेत. यावर नड्डांनी बोलावं. शिंदे-फडणवीस सरकारनं किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला याची प्रकरणं मी त्यांना पाठवून देईन. त्यावर त्यांनी बोलावं – संजय राऊत

10:35 (IST) 18 May 2023
नागपूर : अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू; रिक्त जागांसह नोंदणीबाबत जाणून घ्या सविस्तर

नागपूर : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्य शिक्षण मंडळाचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

10:23 (IST) 18 May 2023
नागपूर : भरधाव ट्रकची ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला धडक; तिघे ठार

नागपूर : भरधाव ट्रकने ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह दुचाकीचालक युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कोंढाळीजवळ घडला. रोशन निळकंठ सहारे (२५), सुषमा उमेश वाघाडे (२८) आणि प्रतीक्षा राजेंद्र वाघाडे (२२) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा..

10:18 (IST) 18 May 2023
ऐन उन्हाळ्यात पुन्हा जल संकट, शनिवारी शहरात पुरवठा बंद

नाशिक: गोंदे येथील वीज दुरुस्तीची कामे आणि शहरातील जलशुध्दीकरण केंद्र तसेच जलकुंभ दरम्यानच्या वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती यामुळे अवघ्या काही दिवसांत पुन्हा शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २९ एप्रिल रोजी वीज दुरुस्तीच्या कामामुळे मुकणे आणि गंगापूर धरणातील उपसा केंद्र बंद राहिले होते. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा त्या दिवशी बंद ठेवण्यात आला होता.

वाचा सविस्तर…

10:15 (IST) 18 May 2023
नवी मुंबई : कामोठे येथे बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई; आरोपींमध्ये चार महिलांचाही समावेश

नवी मुंबई : कामोठे येथील एका चाळीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ते २२ ते ४८ वयोगटातील आरोपी आहेत. सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे.

सविस्तर वाचा…  

10:13 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: समीर वानखेडे प्रकरणावरून नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्र

समीर वानखेडेच्या प्रकरणात महाराष्ट्र भाजपाचे नेते ओरडायला लागलेत. एका अधिकाऱ्याला सीबीआय त्रास देते हे चुकीचं आहे असं ते बोलत आहेत. या व्यवस्थेचा कसा वापर केला जात आहे याचं चित्र आपण पाहात आहोत. यांच्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत असेल तर हे सगळेच ओरडायला लागतात – नाना पटोले

10:11 (IST) 18 May 2023
Maharashtra News Updates: माणुसकी संपवण्याचा प्रयत्न जर पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल… – नाना पटोले

माणुसकी संपवण्याचा प्रयत्न जर पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल तर काँग्रेस ते सहन करणार नाही. लोकांनी संयमाने पुढे जावं असं आवाहन करण्यासाठी मी अकोल्याला जात आहे – नाना पटोले

10:02 (IST) 18 May 2023
नागपूर : बार्टी, महाज्योती, सारथीच्या स्वायत्ततेवर गदा?

नागपूर : बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काम करत असलेल्या बार्टी, महाज्योती, सारथी आणि ‘टीआरटीआय’ या सर्व संस्थांची स्वायत्तता मोडीत काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा…

09:48 (IST) 18 May 2023
नागपूर : मेडिकलला अजनीतील १८ एकर जागेच्या मोबदल्यात ८०० गाळे!

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अजनीत प्रस्तावित मल्टी माॅडल बसस्थानकाचा आढावा घेतला होता. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी प्रस्तावित मेडिकलसह इतर विभागांच्या जागेची पाहणी केली. यावेळी मेडिकलला १८ एकर जागेच्या बदल्यात ८०० गाळे तयार करून देण्याचे संकेत दिले गेले.

सविस्तर वाचा..

09:48 (IST) 18 May 2023
नागपूर : ‘आरे, बारसू’नंतर आता कोराडी वीज प्रकल्पावरून वाद! विविध स्वयंसेवी संस्थांचा प्रकल्पाला विरोध

नागपूर : सत्तापरिवर्तनानंतर राज्यात मुंबईतील आरे कारशेड, कोकणमधील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून वाद झाला. आता या क्रमात नागपुरातील ‘कोराडी’मध्ये प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रदूषणाच्या कारणावरून हा प्रकल्प इतरत्र हलवण्याची विनंती केली आहे.

सविस्तर वाचा..

09:47 (IST) 18 May 2023
“एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

शिंदे गटाच्या आमदाराने एकनाथ शिंदेबाबत मोठा खुलासा केला आहे.

वाचा सविस्तर

09:47 (IST) 18 May 2023
Video: “मला वाटतंय उद्धवजींना कुणीतरी सांगावं की…”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, “राजे-महाराजांपेक्षा…!”

फडणवीस म्हणतात, “ते सांगतात आम्हीच जिंकलो. म्हटलं तुम्ही जिंकले तर बडवा. पण आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत!”

वाचा सविस्तर

09:46 (IST) 18 May 2023
भाजपाच्या कार्यक्रमात जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीसांसमोरच बत्ती गुल; आशिष शेलारांनी अंधारातच केली भाषणाला सुरुवात!

लाईट गेल्यानंतर दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस पूर्णवेळ फोनवर बोलत होते. लाईट येताच दुसऱ्याच क्षणी त्यांनी फोन ठेवला!

वाचा सविस्तर

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर