Mumbai News Updates: राज्यात सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा १९ बंगल्यांचा मुद्दा काढला असून त्याची फाईल सापडल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत आगपाखड केली असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांबाबतच्या चर्चा अद्याप शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.
Maharashtra Live News Update Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली, बारावे आणि टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांचे काम करायचे असल्याने येत्या मंगळवारी या तिन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत बंद राहणार आहे.
गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी आदी छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत तसेच मधुमेह व रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये गेल्या सहा महिन्यात तब्बल सात लाख रुग्णांवर उपचार व आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई: बांधकाम क्षेत्रातील नामांकित निर्मल लाईफ स्टाईल समुहाचे धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. घर देण्याच्या नावाखाली ३३ ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी लाठीचार्ज करण्यात आला. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रचंड संताप व्यक्त केला. जो काय प्रकार सुरू आहे. तो महाराष्ट्र बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही.
अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्याविरूद्ध अंबरनाथ शहरात कॉंग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणाबाजी करत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदान सुद्धा केले.
पुणे: पुणे कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार तासात पाच हजार ७१५ मतदारांनी मतदान केले. मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन तासात साधारणपणे ३२ टक्के मतदान झाले.
बुलढाणा: बुलढाणा बाजार समितीचे मतदान रंगात आले असताना आज दुपारी झालेल्या निसर्गाच्या तांडवाने केंद्रावरील सुविधांचे तीनतेरा वाजले.
बारसूतील रिफानरी प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज त्यांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प पुढे नेणार नसल्याचं ते म्हणाले. तसेच प्रकल्पाला ७० टक्के पेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाणे : येत्या १ मे रोजी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपखाडी मतदारसंघासह संपूर्ण ठाणे शहरभर लावलेल्या बॅनरवर पालिकेने कारवाई केली आहे. या बॅनरबाजीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
बुलढाणा: जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सुरू असलेल्या मतदानात संमिश्र मतदानाचा ‘ट्रेंड’ दिसून येत आहे. मलकापूर व मेहकर मध्ये मतदानाने ‘फिफ्टी’ चा आकडा पार केला असताना उर्वरित तीन ठिकाणी मात्र मतदारांची उदासीनता दिसून येत आहे.
चंद्रपूर: चंद्रपूर – मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम बोपचे (४०) हा इसम ठार झाला.
सांगली : दिग्गज नेते प्रचारासाठी उतरल्याने चुरशीची ठरलेल्या सांगली, इस्लामपूर बाजार समितीसाठी सकाळी मतदान सुरू झाले. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह एक खासदार, चार आमदार, तीन माजी आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवरात (काळा तलाव) प्रवेशासाठी पहाटे चारची वेळ ठेवण्यात यावी. आणि रात्री १० वाजता सरोवर बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे नियमित पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वाचा..
बुलढाणा : एका वाढदिवसाच्या ‘पार्टी’त यूपी बिहार स्टाईलमध्ये हाती बंदूक घेऊन नाचणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २६ एप्रिल रोजी सोशल मीडियावर हा ‘डान्स’ वेगाने सार्वत्रिक झाला आणि प्रचंड गाजला.
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली, तरी या मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी झाली आहे.
पुणे: राज्यभरातील शाळांची शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य शासनाकडे थकली असताना शालेय शिक्षण विभागाने लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज माती सर्वेक्षण थांबवण्याचा प्रतत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं बघायला मिळालं.
बुलढाणा: चुरशीने पार पडलेल्या व वादळी ठरलेल्या बुलढाणा बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पिंपरी: सराईत गुन्हेगाराचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश सोहळा झाला. गुन्हेगाराला प्रवेश दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होताच शिवसेनेने हात झटकले.
मविआच्या १ मे च्या वज्रमूठ सभेचा टीझर लाँच!
चंद्रपूर : कोरपना – वणी राज्य महामार्गावरील कोरपना जवळील हेटी येथील जय सरस्वती जिनींग येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाच्या गंजीला शुक्रवार २८ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
अकोला : बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सहा वन्यजीव विभागांत ५ मे रोजी ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम घेण्यात येणार आहे. एकूण १६५ मचाणांवरून प्राणीगणना करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आज, २८ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे.
पुणे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आधार कार्डांचे अद्ययावतीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ३० लाख नागरिकांचे आधार अद्ययावत करण्याचे बाकी होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या आधार अद्ययावतीकरणाच्या खास मोहिमेंतगर्त १५ हजार नागरिकांचे आधार अद्ययावत करण्यात आले आहे.
राज्यात १०० हून अधिक जागांवर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उमेदवार निवडणून यावे, अशा प्रकारची रणनीती आखली जात असून उमेदवारांचाही शोध सुरू केला असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.
नागपूर : काटोल आणि कन्हान पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील बनावट रस्ते नस्ती घोटाळा उघडकीला आल्यानंतर प्रशासनाने नस्तींचा हाताने होणारा प्रवास कायमचा थांबविण्यासाठी ई ऑफिस प्रणाली अंमलबजावणीच्या जोरदार हालचाली केल्या. या प्रणालीच्या माध्यमातून चार विभागांमध्ये ऑनलाइन नस्ती पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाला. येत्या आठवडाभरात पालिकेतील २५ कार्यालये ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून जोडून नस्ती शिपाई, कर्मचारी, ठेकेदारांच्या माध्यमातून फिरविण्याचा प्रवास कायमचा बंद होणार आहे.
वर्धा : जिल्ह्यातील चारही आमदारांनी बाजार समिती निवडणुकीत थेट उड्या घेतल्याने निवडणुका रंगतदार झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी देवळी व वर्धेत सहकार गट, तर हिंगणघाट येथे भाजपाचे आमदार समीर कुणावार यांना सोबत घेत उडी घेतली. त्यांना वर्धा, देवळी या बाजार समित्या ताब्यात येण्याची खात्री वाटते. हिंगणघाट येथे सहकार नेते सुधीर कोठारी बाजी मारतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
सांगली : दिग्गज नेते प्रचारासाठी उतरल्याने चुरशीची ठरलेल्या सांगली, इस्लामपूर बाजार समितीसाठी सकाळी मतदान सुरू झाले. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह एक खासदार, चार आमदार, तीन माजी आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवरात (काळा तलाव) प्रवेशासाठी पहाटे चारची वेळ ठेवण्यात यावी. आणि रात्री १० वाजता सरोवर बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे नियमित पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
पुणे: सिंहगड किल्ला परिसरात एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या खामगाव मावळ येथे ही घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Maharashtra Live News Update Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!