Mumbai News Updates: राज्यात सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा १९ बंगल्यांचा मुद्दा काढला असून त्याची फाईल सापडल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत आगपाखड केली असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांबाबतच्या चर्चा अद्याप शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.

Live Updates

Maharashtra Live News Update Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

12:35 (IST) 28 Apr 2023
अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता!

पुरेशा पुराव्यांअभावी जिया खान आत्महत्या प्रकरणात आरोपी सूरज पांचोलीची विशेष सीबीआय कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

12:34 (IST) 28 Apr 2023
ताडोबा प्रकल्पात ‘मचान स्टे’; प्रगननेत सहभाग नोंदविण्यासाठी दाेन पर्यटकांना ४५०० रुपये शुल्क; ऑनलाइन नोंदणी आवश्यक

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्रात चंद्राच्या प्रकाशात बुद्धपोर्णिमाच्या दिवशी शुक्रवार ५ मे रोजी प्राणीगणना होणार आहे. ‘मचान स्टे’ या गोंडस नावाने प्राणीगणना कार्यक्रमात सहभागाला दोन प्रगणकांसाठी ४ हजार ५०० रुपये शुल्क आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 28 Apr 2023
“बबली” बदमाश! आता बछडेही त्याच वाटेवर; ताडोबातील पाणवठ्यावर मस्ती

नागपूर: उन्हाचा दाह कुणालाही सोसवेना होतो, मग तो माणूस असो वा प्राणी. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी ताडोबातील बबली आणि तिच्या बछड्यांचा असाच एक पाण्यात मस्ती करत असतानाचा विडिओ शूट केला आहे.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 28 Apr 2023
मुंबई: मालवणीमध्ये पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत विवाहितेचे मृत्यू; दोघांना अटक

मुंबई: मालाड येथे पैशाच्या वादातून पतीची आजी व आत्याने केलेल्या मारहाणीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 28 Apr 2023
बारसू रिफायनरीविरोधात स्थानिकांचा मोर्चा…

बारसू रिफायनरीविरोधात स्थानिकांनी माळरानावरून मोर्चाला सुरुवात केली आहे.

10:56 (IST) 28 Apr 2023
पुणे : ग्रामीण भागातील बेकायदा जाहिरात फलक काढा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : रावेत येथील जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांनी बेकायदा होर्डिंग विरोधात मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिले.

सविस्तर वाचा..

10:55 (IST) 28 Apr 2023
आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन् पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला, पाहा व्हिडीओ

चंद्रपूर : जंगल सफारी करताना आक्रमक झालेला पट्टेदार वाघ पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावल्याने पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. डरकाळी फोडत पर्यटकांच्या जिप्सीवर धावून गेलेल्या वाघाचा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.

सविस्तर वाचा..

10:54 (IST) 28 Apr 2023
रायगड जिल्ह्यात रस्त्यांवरील २२ ठिकाणं धोक्याची; अतिधोकादायक ठिकाणांवर दिर्घकालीन उपाययोजनांसाठी हालचाली

अलिबाग – रायगड जिल्ह्यात २२ अपघात प्रवणक्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. यात महामार्गांवरील १८ राज्यमार्गांवरील २ तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील २ अपघात प्रवणक्षेत्रांचा समावेश आहे. या अपघात प्रवणक्षेत्रांवरील अपघात कमी करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा..

10:54 (IST) 28 Apr 2023
पुणे : मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला महापालिकेचा ‘खो’?

पुणे : महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. याचवेळी महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याची तयारी केली आहे. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा महापालिकेला सहा महिन्यांपूर्वी सादर केला. महापालिकेकडून यासंदर्भात महामेट्रोसोबत आतापर्यंत तीन ते चार बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

सविस्तर वाचा..

10:53 (IST) 28 Apr 2023
देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी होतेय एक प्रसूती

पुणे : देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी सरासरी एका महिलेची प्रसूती होत आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वे गाड्यांमध्ये १५८ प्रसूती झाल्या असून, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे. याचवेळी रेल्वेच्या आवारात झालेल्या प्रसूतींची संख्या २२० आहे.

सविस्तर वाचा..

10:51 (IST) 28 Apr 2023
एनएमएमएस शिष्यवृत्तीची निवड यादी जाहीर

पुणे : राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेअंतर्गत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. जिल्हा, शाळा आणि विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निवड यादी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक शाळेच्या ऑनलाइन खात्यात उपलब्ध करून देण्यात येईल.

सविस्तर वाचा..

10:51 (IST) 28 Apr 2023
“…त्याशिवाय कोकणातलं वातावरण शांत होणार नाही”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना इशारा!

संजय राऊत म्हणतात, “सगळ्यात आधी बारसूच्या आसपास ज्या राजकारण्यांनी, परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केलेल्यांची यादी सरकारने जाहीर करावी, नाहीतर…!”

वाचा सविस्तर

10:46 (IST) 28 Apr 2023
१ मे रोजीची सभा मविआची शेवटची सभा असेल – नितेश राणे

मविआवर उद्धव ठाकरेंचं ओझं झालं आहे. माझ्या माहितीनुसार १ मेची सभा ही मविआची शेवटची सभा असेल. यापुढे वज्रमूठ सभा होणार नाहीत. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण द्यावं – नितेश राणे

10:43 (IST) 28 Apr 2023
…त्याचीही तयारी सुरू ठेवावी – नितेश राणे

जर विनायक राऊत किंवा संजय राऊतांना नावं जाहीर करायचीच असतील, पुन्हा आपल्या मालकाला अडचणीत आणायचंच असेल, तर त्यांनी जाहीर करावं. मग आम्हीही बारसू किंवा आसपासच्या भागात ठाकरेंच्या निगडित लोकांच्या जमिनी कशा आहेत, हे नाव आणि सातबाऱ्यासकट आम्ही जाहीर करणार. त्याचीही तयारी सुरू ठेवावी – नितेश राणे

10:41 (IST) 28 Apr 2023
…मग काही याद्या आम्हीही जाहीर करतो – नितेश राणे

बारसूचा विषय त्यांनी काढलाय. आजपर्यंत शरद पवार म्हणायचे की मी शरद पवारांचा माणूस आहे. पण आज ते शरद पवारांच्या भूमिकेला उत्तर देताना दिसले. मग हे नेमके कुणाचे? हा प्रश्न मला विचारायचा आहे. बारसूच्या आसपास जमिनी घेतलेल्यांच्या याद्या जाहीर करणार म्हणालेत. मग काही याद्या आम्हीही जाहीर करतो – नितेश राणे

10:40 (IST) 28 Apr 2023
नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मी राऊतांना सांगेन की इतकंही मला हलक्यात घेऊ नका. जरा अजून लढण्यात मजा आली पाहिजे. जरा अजून आव आणा, टीका करा. जेणेकरून तुमच्या मालकांनाही कळेल की हा आमचा नाही तर अजून कुणाचा आहे. – नितेश राणे

10:09 (IST) 28 Apr 2023
जोडे पुसायची लायकी नाही? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण!

जोडे पुसायची लायकी नाही. त्यांना जनता जोडे मारणार आहे. त्या वक्तव्याबद्दल खेद वाटण्याचं अजिबात कारण नाही. शिवसेनेनं सामान्यांतल्या सामान्य माणसाला जात-पात धर्म न पाहाता सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्तेही दिल्लीपर्यंत पोहोचले. आम्ही कधी दिल्लीला येऊ असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण फक्त ठाकरे कुटुंब आणि शिवसेना ही चार अक्षरं यामुळे आमच्यासारखी असंख्य लोकं विविध पदांवर गेली. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली चीड योग्य आहे. जोडे पुसणं हे त्या अर्थाने घेऊ नका. तुम्हाला जनता जोडे पुसायला ठेवणारच आहे. जनता जोडेही मारणार आहे हेही तितकंच खरं आहे. हे कुणीही व्यक्तीगत घेऊ नये. निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल.

09:48 (IST) 28 Apr 2023
आज १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान!

महाराष्ट्रातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल ३० तारखेला लागणार आहे.

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Live News Update Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!