Today’s Breaking News : संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जे मदत करतील त्यांना महाराष्ट्र द्रोही म्हटलं जाईल असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Updates 19 March 2024| राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणि महत्त्वाच्या घडामोडी
विटा येथील जयवंत बागडे याच्यासोबत देवाची गाणी म्हणून कैलास उर्फ कल्याणी जाधव हा तृतियपंथी गुजराण करत होता.
भोईर म्हणाले, शिवतारे हे बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. हे चुकीचे आहे. अजित पवार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्याबाबत बोलले होते. शिवसेनेपेक्षा आमची जास्त ताकद आहे.
खासदार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
मंगळवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या विरार जवळ सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी दिवसभर धैर्यशील मोहिते-पाटील माढा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या करमाळा तालुक्यातून प्रचाराला प्रारंभ केला.
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सचे व्यवस्थापन करणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्ल्यूआयटीसी) आणि विलिंग्डन क्लबमध्ये ५० व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांना मोफत आजीव सदस्यत्व नामनिर्देशित करण्याचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली.
आपला भारत देश गांधी-नेहरूंच्या लोकशाहीवर निष्ठा ठेवणारा आहे. परंतु लोकशाहीवरचा विश्वास नसलेली शक्ती सत्तेवर आल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
पुणे : होळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सिडको मंडळाने जाहीर सूचनेद्वारे या तारा व भित्तीपत्रके न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
एकुलत्या मुलीवर वडिलाचे जिवापाड प्रेम…मुलीने वडिलांनी घरी येताता चिप्स आणि फ्रूटी घेऊन येण्याचा हट्ट धरला. त्यामुळे वडिलांनी चिप्स आणि फ्रूटी घेतली आणि दुचाकीने घराकडे निघाले.. फोनवरून मुलीला कळवल्याने चिमुकली वडिलांची वाट बघत दारात उभी होती. सविस्तर वाचा…
पहिलीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्या एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली.
आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? इतकाही अधिकार या देशात राहिला नाही का?, असे सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. सविस्तर वाचा…
नागपूर : बाजारातून खरेदी केलेले मटण सोबत घेऊन मेट्रोने जाण्यासाठी स्थानकावर आलेल्या प्रवाशाला सुरक्षारक्षकाने रोखल्याने संतापलेल्या प्रवाशाने मित्रांच्या मदतीने सुरक्षारक्षकालाच बेदम मारहाण केली. ही घटना अग्रसेन मेट्रो स्थानकावर घडली.
यवतमाळ : गेल्या दोन आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन सभा झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा)ने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात एक प्रकारे आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीतील उमेदवारीचा घोळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’ पद्धतीचे संवाद ऐकू येत आहे.
ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौंडेशनचे निरीक्षक डॉ. महेश कदम यांनी १० हजार ४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी नोंद केल्याचे सांगून चेन्नई शहरानंतर भारतात कोल्हापुरात असा उपक्रम नोंदविला गेल्याची घोषणा केली.
पुणे : निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पुणे प्राप्तिकर विभागाने २४x७ कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी किंवा फोन कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोंदवून या कक्षाला माहिती देऊ शकतात.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ‘भाडोत्री जनता पक्ष’ या शब्दांत टीका करून, भाजपला आपला नेता देशापेक्षा मोठा आहे, असे वाटत असेल तर ते चालणार नाही, असा इशारा दिला.
शिवसेनेतून फारकत घेऊन बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभेवर महाविकास आघडीचाच (शिवसेनेचा) उमेदवार निवडून येईल. सविस्तर वाचा…
दररोज सांगुनही सून गर्भपात करून घेत नाही म्हणून संतप्त झालेल्या सासुने, जावेने आपल्या पोटावर लाथा मारल्या, अशी तक्रार गर्भवती असलेल्या कल्याण पूर्वेतील एका महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण पूर्वेतील मलंग रस्ता भागातील व्दारली, दावडी गाव हद्दीत मूळ नागरी वस्तीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभारण्यात आलेल्या १० बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. सविस्तर वाचा…
कुलाबा परिसरातील समुद्रकिनारी अगदी जवळ असलेल्या जुन्या चाळी, इमारती आणि कोळीवाड्यांचा पुनर्विकास प्रश्न, पुरातन वारसा वास्तू यादीतील इमारती आदींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. सविस्तर वाचा…
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे एका बाजुला मुंबई महापालिकेत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या निश्चित असताना दुसरीकडे पालिकेतील माजी उपायुक्त उल्हास महाले यांना मात्र सेवानिवृत्तीनंतरही पालिकेत एक वर्षांसाठी उपायुक्तपदी (पायाभूत सुविधा) मुदतवाढ मिळाली आहे.
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर मदतवाहिनीच्या (हेल्पलाइन) माध्यमातून आतापर्यंत फसवणूकीतील ५० कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. सविस्तर वाचा…
गृहनिर्माण प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात शिस्त यावी, ग्राहकांचे हित जपले जावे आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व्हावेत यासाठी महारेराने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विकासकांना प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारासाठी तीन स्वतंत्र बँक खाती उघडावी लागणार आहेत. सविस्तर वाचा…
मुंबईमधील जी.टी., कामा आणि सेंट जॉर्जेस ही रुग्णालये जे. जे. रुग्णालयाशी संलग्न आहेत. मात्र राज्य सरकारने जी. टी. रुग्णालयाचे १०० विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा या निवासस्थानाशेजारी असलेल्या बंगल्याचा डॉइच बॅंकेने लिलाव जाहीर केला आहे. या लिलावासाठी बंगल्याची आरक्षित किंमत २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.