Today’s Breaking News : संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जे मदत करतील त्यांना महाराष्ट्र द्रोही म्हटलं जाईल असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.

Live Updates

Maharashtra Live News Updates 19 March 2024| राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणि महत्त्वाच्या घडामोडी

16:13 (IST) 19 Mar 2024
प्रवाहाच्या विरोधात जाणारा लोकसभा मतदारसंघ ही रायगडची ओळख !

अलिबाग- ज्या मतदारसंघात कुठलीही लाट, प्रवाह चालत नाही असा मतदारसंघ म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. अगदी १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत देशभर काँग्रेसला यश मिळाले असताना रायगडने विरोधात कौल दिला होता. सविस्तर वाचा…

16:12 (IST) 19 Mar 2024
सोलापुरात भाजपच्या उमेदवारीवरून चुरस वाढली; आजी-माजी खासदारांसह अनेक इच्छूक

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःची उमेदवारी गृहीत धरून जोमाने प्रचार सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता अद्यापि कायम आहे.

सविस्तर वाचा…

16:11 (IST) 19 Mar 2024
साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील उमेदवारांची नावे वाढतच चालली आहेत. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले जिवलग मित्र शरद पवार यांची सोबत कायम ठेवली आहे. सविस्तर वाचा…

16:08 (IST) 19 Mar 2024
खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सहा वर्षांनी सापडले; रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

रसायनी येथे २०१८ मध्ये झालेल्या एका हत्याकांडातील आरोपींना सहा वर्षांनंतर जेरबंद करण्यात रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. सविस्तर वाचा…

16:07 (IST) 19 Mar 2024
अनंत गीते मंत्रीपदे उपभोगली पण जनतेची कामे केली नाहीत, खासदार सुनील तटकरे यांचा गितेंना टोला…

सहा वेळला अनंत गिते लोकसभेवर निवडून गेले. चार वेळा मंत्री झाले. तीस वर्ष संसदेत होते. पण त्यांनी मतदारसंघासाठी काम केले नाही. जनतेचा विश्वासघात केला. अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुरूड येथे केली.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 19 Mar 2024
पुण्यातील चाकणमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार, एकाला अटक

पुण्याच्या चाकणमध्ये ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर दोघांनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे अस गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सुदैवाने यात तो थोडक्यात बचावला आहे. सविस्तर वाचा…

15:55 (IST) 19 Mar 2024
मुंबई : निकालांपासून विद्यार्थी दूरच, वर्षभरानंतरही दूरस्थ; ऑनलाइन शिक्षण केंद्राचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

मुंबई विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका विद्यार्थ्यांना सातत्याने बसत असून चुकीची प्रश्नपत्रिका हाती आल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाचे सत्र वर्षभरानंतरही कायम आहे.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 19 Mar 2024
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत टीडीआर लागू होणार, ३० दिवसांत नागरिकांना हरकतींची मुभा

आचारसंहितेपूर्वी १५ मार्चला राज्य सरकारने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत हस्तांतरणीय विकास हक्काचा (टीडीआर) प्रश्न मार्गी लावल्याने विकासकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सविस्तर वाचा…

15:39 (IST) 19 Mar 2024
धुळे : बालिकेच्या मृत्युनंतर नाल्यात प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

धुळे : मालमोटार मागेपुढे करतांना चाकाखाली चार वर्षाची बालिका सापडून तिचा मृत्यू झाल्यानंतर शेजारच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात प्रेत टाकून ते मातीने बुजून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांविरुध्द धुळ्यातील मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा…

15:36 (IST) 19 Mar 2024
पनवेल : रेल्वे प्रवासादरम्यान पावणेदोन लाखांची सोनसाखळी चोरली

वंदे भारत या रेल्वेने जालना ते ठाणे या पल्यावर प्रवास करुन ते बेलापूरला कार्यालयात कामावर गेले. मात्र घरी सायंकाळी पाच वाजता आल्यावर त्यांना गळ्यात सोनसाखळी नसल्याचे समजले.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 19 Mar 2024
पनवेल : धरणावरुन दुचाकी चोरी

पनवेल : धरणावर फीरण्यासाठी गेलेल्या तरुणांची दुचाकी चोरी गेल्याची घटना देवळोली धरणावर रविवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेची नोंद सोमवारी सायंकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. रसायनी सावळे गावातील एका व्यवसायिकाच्या मालकीची दुचाकी त्यांचा मुलगा व त्याचे मित्र देवळोली धरणावर घेऊन गेले होते. सायंकाळी साडेचार वाजता मरीआई मंदीराच्या जवळ दुचाकी उभी करुन धरणावर गेले. परंतु, दोन तासांनी परत आल्यावर दुचाकी नसल्याने मुलांनी पोलीसांत धाव घेतली.

15:29 (IST) 19 Mar 2024
पनवेल : अभियंता अपघातामध्ये ठार

दापोली गावातील ३२ वर्षीय इलेक्ट्रोनिक्स अभियंता सोमवारी पहाटे पाच वाजता कळंबोली टी पॉईंट ते कळंबोली सर्कलकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील अपघातामध्ये ठार झाला.

सविस्तर वाचा…

15:22 (IST) 19 Mar 2024
नाशिक : बसमधून मद्य तस्करी; गुजरातच्या वाहक, चालकास अटक

नाशिक : गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात ही कारवाई केली.

सविस्तर वाचा…

15:16 (IST) 19 Mar 2024
इंदापूर हत्या प्रकरण: मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार अविनाश बाळू धनवे याची पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून तीन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली.

सविस्तर वाचा…

15:12 (IST) 19 Mar 2024
जावई बापूंचा पेच पवार सोडविणार की लेकीस पुढे करणार…

वर्धा : शरद पवार गटाने विदर्भात मागितलेली एकमेव जागा म्हणजे वर्धा होय. उशीरा जाग आलेल्या काँग्रेसने मग आम्हीच लढणार म्हणून निकराची लढाई सुरू करीत अमर काळे यांचे नाव पुढे केले. त्यावर राष्ट्रवादीने आमच्यातर्फेच लढा असा पेच टाकला.

वाचा सविस्तर…

15:02 (IST) 19 Mar 2024
जळगाव जिल्ह्यात भाजप – शरद पवार गटात वाक्युद्ध

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला जिल्ह्यात कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी राजकारणात भाजपचे जिल्ह्यात बळकटीकरण केले, या भाष्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 19 Mar 2024
कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस

खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम ठेवली आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 19 Mar 2024
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना शिंदे गटाकडून तो हिरावून घेण्यासाठी धडपड चालवली आहे.

सविस्तर वाचा…

14:45 (IST) 19 Mar 2024
पक्षाअंतर्गत विरोधकांशी संवाद साधण्याची विखे-पाटील यांना गरज का भासली ?

लागोपाठ घडलेल्या या घटना योगायोग निश्चितच नाही. ही चर्चा केवळ नगर मतदारसंघापूरतीच होती की विखे यांच्या कार्यपद्धतीचा फटका बसलेल्या इतर विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा होती, या प्रश्नाचे उत्तर अद्याप उघड झालेले नाही.

सविस्तर वाचा…

14:34 (IST) 19 Mar 2024
नवी मुंबई : चिटफंड घोटाळ्यात २६ कोटींची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक

नवी मुंबई : शेती उत्पादनात गुंतवणूक करा आणि महिना ५ टक्के नफा व ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत अशी आकर्षक जाहिरात करीत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 19 Mar 2024
उत्तर महाराष्ट्रात मविआ उमेदवारांच्या शोधात; सहाही मतदारसंघात अनिश्चितता

नाशिक : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा न झाल्याने आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 19 Mar 2024
वसंत मोरे म्हणतात “मी थोडासा वेळ घेतोय, पण माझी वेळ… “

पुणे लोकसभा वसंत मोरे हे कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून लढणार हे चित्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. दरम्यान वसंत मोरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली.

वाचा सविस्तर…

14:00 (IST) 19 Mar 2024
आचारसंहितेमुळे म्हाडाचा लोकशाही दिन तात्पुरता स्थगित

मंगल हनवते, मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने म्हाडा लोकशाही दिन तात्पुरता स्थगित केला आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे.

म्हाडा रहिवासी, लाभार्थी आणि नागरिकांची अनेक कामे म्हाडामध्ये असतात. या कामाच्या संबंधाने अनेक तक्रारी, समस्याही असतात. या तक्रारी, समस्यांचे निराकरण योग्य प्रकारे वा वेळेत होत नसल्याने म्हाडा रहिवासी, लाभार्थी, नागरिकांच्या समस्या वाढतात. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनाची अंमलबजावणी म्हाडाच्या पातळीवर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारीपासून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा लोकशाही दिन पार पडतो. यावेळी लोकशाही दिनाच्या अनुषंगाने संगणकीय पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची सुनावणी जयस्वाल यांच्या समोर घेतली जाते. अर्जदारांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण यावेळी केले जाते. त्यामुळे हा लोकशाही दिन नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकशाही दिन तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत लोकशाही दिन होणार नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच थेट १० जूनला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल, असे म्हाडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

13:59 (IST) 19 Mar 2024
खळबळजनक : मुलीची हत्या करत पित्याने घेतला गळफास, पिंपरीतील थेरगाव परिसरातील घटना

पोटच्या मुलीची हत्या करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी- चिंचवडच्या थेरगाव परिसरात उघडकीस आली आहे. सात वर्षीय मुलगी मृतावस्थेत आणि वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

वाचा सविस्तर…

13:33 (IST) 19 Mar 2024
उरण : भूखंड ताबा देण्याचा मुहूर्त हुकणार? जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा सिडको आणि बंदर प्रशासनाविरोधात संताप

उरण : भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांनी लढून मिळविलेल्या जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा ताबा मार्च २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र मार्च महिन्याच्या मध्यावरही भूखंडावर मातीचा भराव आणि रस्ते गटारांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भूखंड ताब्याची मार्चची तारीखही हुकणार असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

13:25 (IST) 19 Mar 2024
खबरदार! खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले तर, कोणी दिला इशारा?

नागपूर : निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय कामाच्यादृष्टीने बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे कर्तव्यनिष्ठेने आपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करतात. तथापि काही अधिकारी-कर्मचारी हे जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन प्रशासकीय नियोजनात अडथळे निर्माण करतात. निवडणुकी सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामे टाळण्यासाठी जर कोणी खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला आणि पडताळणीत ही बाब उघड झाली तर अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करु असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

वाचा सविस्तर…

13:07 (IST) 19 Mar 2024
२८५ कोटींचा मालमत्ता कर वसूल, मार्चअखेरपर्यंत थकीत करवसुलीचे पनवेल महापालिकेचे ध्येय

पनवेल : काही मालमत्ताधारकांना वॉरंट नोटिसीनंतर मालमत्ता अटकावणीच्या प्रक्रियेसाठी नोटीस बजावण्यात आली. जप्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने अनेक करदात्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात २८५ कोटी रुपयांचा कर भरल्याची माहिती पालिकेने रविवारी दिली. मार्च अखेरपर्यंत सर्वाधिक थकीत करवसुलीचे ध्येय पालिकेने ठेवले आहे.

रविवारी खारघरमध्ये तीन मालमत्तांवर अटकावणीची कारवाई पालिकेने केली आहे. पालिका मालमत्ता कर विभागाचे सहायक आयुक्त स्वरूप खार्गे, कर विभागाचे अधीक्षक सुनील भोईर आणि महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत रविवारी कळंबोली येथील सेक्टर २३ मधील मार्बल मार्केटमधील भूखंड क्रमांक ४०,४१, ९०, ९१ याचे मालक सी. वि. रेड्डी यांनी २४ लाख रुपये थकीत करापोटी पालिकेकडे जमा केल्याची माहिती पालिकेने दिली.

12:44 (IST) 19 Mar 2024
सीपीएस अभ्यासक्रमांना पुन्हा मान्यता; कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्सचे अभ्यासक्रम पुन्हा सुरू

विनायक डिगे

मुंबई : कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, मुंबईद्वारे (सीपीएस) शिकविण्यात येणारे आणि एनएमसी मान्यता प्राप्त १० अभ्यासक्रमांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसोबत चर्चा करून वैद्यकीय शिक्षण आणि मान्यता या क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कायदा १९६५ मध्ये सुधारणा केली आहे.

सीपीएसमार्फत शिकविण्यात येणाऱ्या काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता १४ जुलै २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने रद्द केली होती. त्यामुळे राज्यामध्ये सीपीएस अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय संस्थांची तपासणी केल्यानंतर मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यासंदर्भात सीपीएसने हा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका घेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार निर्धारित मानकांशी संबंधित असलेल्या कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्सच्या अभ्यासक्रमांचा सर्वसमावेशक यादीमध्ये समावेश करण्याचा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने निर्णय घेतला आहे. यामध्ये फेलोशिप तसेच पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. वैद्यकशास्त्र, रोगनिदानशास्त्र, शल्यचिकित्सा, त्वचाविज्ञान, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग, नेत्ररोग आणि बाल आरोग्य यांसारख्या विविध वैद्यकीय उच्चशिक्षणाचा समावेश आहे. या निर्णयामुळे जवळपास १२०० विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सीपीएसद्वारे दोन वर्षांचा पदविका आणि तीन वर्षांचा फेलोशिप अभ्यासक्रमांचा कार्यकाळ रितसर पूर्ण केल्यावर आणि एक्झिट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच्या संबंधित डॉक्टरला विशेषज्ञ म्हणून नोंदणी करण्यास मान्यता देण्यात येते.

सीपीएस अभ्यासक्रमांची मान्यता रद्द करणे हे राज्याच्या आणि देशाच्या आरोग्य सेवेच्या हिताचे नव्हते. सीपीएसचे १० अभ्यासक्रम हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अधिनियम २०१९ च्या अनुसूची अंतर्गत नोंदणी करण्यायोग्य असल्याने त्यांना राज्य सरकारद्वारे पुन्हा मान्यता मिळाली आहे. या अधिसूचनेमुळे केवळ सीपीएसच नाही तर सीपीएसचे माजी विद्यार्थी आणि भविष्यात एमबीबीएस उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. आरोग्य व्यवस्थेलाही याचा फायदा होईल, अशी माहिती सीपीएसचे अध्यक्ष डॉ. अजय सांबरे यांनी दिली.

12:29 (IST) 19 Mar 2024
२०२३ सालातले ‘ते’ राजकीय संकटच पोटनिवडणुकीच्या पथ्यावर… वाचा नियम काय सांगतो…?

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीवरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली तरी राजकीय संकटामुळे सरकार स्थापनेत दिरंगाई झाली. ‘ते’च ‘अकोला पश्चिम’ पोटनिवडणुकीच्या पथ्यावर पडले.

वाचा सविस्तर…

12:28 (IST) 19 Mar 2024
रोहित पवार यांची अखेरची विचारणा अन् प्रा. सुरेश देशमुख यांचा स्पष्ट नकार

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास मिळणार, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वप्रथम तयारीस लागलेले समीर देशमुख यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून रोहित पवार प्रयत्नशील होते. म्हणून त्यांनी शरद पवार यांच्याशी बोलणे केले होते. सोमवारी त्यांनी समीर देशमुख यांना विचारणा केली. पण नकार आला.

वाचा सविस्तर…

राज ठाकरेंची दिल्लीत उतरताच पहिली प्रतिक्रिया (फोटो-फेसबुक )

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.