Today’s Breaking News : संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जे मदत करतील त्यांना महाराष्ट्र द्रोही म्हटलं जाईल असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Live News Updates 19 March 2024| राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणि महत्त्वाच्या घडामोडी

12:25 (IST) 19 Mar 2024
सरसेनाध्यक्ष अनिल चौहान म्हणाले, ‘देशापुढे आव्हान…’

पुणे : देशाच्या विवादित सीमा आणि चीनचा उदय हे देशापुढील, लष्करापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शांततेच्या काळात विवादित सीमांबाबत सशस्त्र दलांनी भारताच्या कायदेशीर भूमिकेचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी सोमवारी मांडले.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 19 Mar 2024
कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडी तगड्या उमेदवारांच्या शोधात, दिग्गजांची नावे चर्चेला, स्थानिक उमदेवाराला प्राधान्य देण्याच्या हालचाली

शिवसेनेतून फारकत घेऊन बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभेवर महाविकास आघडीचाच (शिवसेनेचा) उमेदवार निवडून येईल. सविस्तर वाचा…

12:14 (IST) 19 Mar 2024
डोंबिवली जवळील कोळे गावात गावठी दारूचा साठा जप्त; दारूसाठी काळ्या गुळाला बाजारात मागणी

डोंबिवली जवळील कोळे गाव हद्दीत मानपाडा पोलिसांच्या गु्न्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी संध्याकाळी छापा मारून दीड लाखाहून अधिक किमतीचा गावठी दारूचा साठा जप्त केला. हा साठा जागीच नष्ट करण्यात आला. सविस्तर वाचा…

12:13 (IST) 19 Mar 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची उभारणी; एक ते पाच क्रमांक फलाटांना जोडणार पादचारी पूल

डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकांना जोडणारा एक पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. या जिन्यामुळे दिवा बाजुच्या दिशेने डोंबिवलीतील प्रवाशांना दोन पादचारी पूल उपलब्ध होणार आहेत. सविस्तर वाचा…

12:12 (IST) 19 Mar 2024
आयुक्त,अतिरिक्त आयुक्तांची बदली; उपायुक्तांना राज्य सरकारचे अभय, उल्हास महाले पहिले कंत्राटी उपायुक्त ठरणार

तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे एका बाजुला मुंबई महापालिकेत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या निश्चित असताना दुसरीकडे पालिकेतील माजी उपायुक्त उल्हास महाले यांना मात्र सेवानिवृत्तीनंतरही पालिकेत एक वर्षांसाठी उपायुक्तपदी (पायाभूत सुविधा) मुदतवाढ मिळाली आहे.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 19 Mar 2024
सायबरगुन्हे हेल्पलाइनद्वारे ५० कोटी वाचवण्यात यश

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर मदतवाहिनीच्या (हेल्पलाइन) माध्यमातून आतापर्यंत फसवणूकीतील ५० कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. सविस्तर वाचा…

12:10 (IST) 19 Mar 2024
प्रवाहाच्या विरोधात जाणारा लोकसभा मतदारसंघ ही रायगडची ओळख !

अलिबाग- ज्या मतदारसंघात कुठलीही लाट, प्रवाह चालत नाही असा मतदारसंघ म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. अगदी १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत देशभर काँग्रेसला यश मिळाले असताना रायगडने विरोधात कौल दिला होता. सविस्तर वाचा…

12:09 (IST) 19 Mar 2024
भाजपला ‘ ठाकरें ‘ ची राजकीय गरज?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचा विचारविनिमय व अटीशर्ती निश्चित केल्या जात आहेत. महाराष्ट्रात भाजपची ताकद कितीही वाढली तरी एकहाती सत्ता मिळूच शकत नाही, हे ओळखलेल्या भाजपला आता ‘ ठाकरे ‘ हे आडनाव असलेल्या नेत्याची गरजही भासत असल्याने राज ठाकरे यांच्याबरोबर राजकीय वाटाघाटी होत आहेत. सविस्तर वाचा…

12:01 (IST) 19 Mar 2024
“उमेदवारी आपलीच आहे, विजय आपलाच आहे,” आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत

चंद्रपूर: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात एकीकडे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात जंगी स्वागत व आशीर्वाद सभेने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेस पक्षात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारी वरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष असताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमावर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये “उमेदवारी आपलीच आहे, विजय आपलाच आहे”. थोड धीरान वागा….

वाचा सविस्तर…

12:00 (IST) 19 Mar 2024
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार शक्य; लवकरच निर्णय होणार

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सार्वजनिक – खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू आहे. आता या मार्गाचा विस्तार शिवाजीनगरपासून लोणी काळभोरपर्यंत पीपीपी तत्वावर करण्याचा विचार सुरू आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 19 Mar 2024
नाशिक : प्रौढ साक्षरता परीक्षेपासून स्थलांतरामुळे अनेक जण वंचित

नाशिक : नागरिकांना लिहिता वाचता यावे, खऱ्या अर्थाने लोक साक्षर व्हावेत, यासाठी राज्य शासनाने प्रौढ साक्षरता अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 19 Mar 2024
पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ८५ जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 19 Mar 2024
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यात “ऑरेंज अलर्ट”

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आजही विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

वाचा सविस्तर…

11:21 (IST) 19 Mar 2024
“अयोध्येतील राम मंदिराचे काम १९८९ पासूनच सुरू,” डॉ. प्रवीण तोगडिया यांचा दावा; म्हणाले…

नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी १९८९ पासूनच दगडांची खरेदीसह इतर काही कामे सुरू केली होती, असा दावा आंतराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला.

वाचा सविस्तर…

11:21 (IST) 19 Mar 2024
साई रिसॉर्टच्या बांधकामाचे प्रकरण : सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यात स्वारस्य

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांनी मालकीच्या खेड येथील साई रिसॉर्टचे अतिरिक्त आणि अनधिकृत भाग एका महिन्याच्या आत स्वखर्चाने पाडू, अशी हमी प्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी उच्च न्यायालयात दिली. दुसरीकडे, आदेश देऊनही इतर अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबतचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडून दाखल न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यात स्वारस्य असल्याची टिप्पणी केली.

वाचा सविस्तर…

11:07 (IST) 19 Mar 2024
आचारसंहितेमुळे विद्रुपीकरणातून मुक्तता; २० हजारहून अधिक राजकीय फलक, भित्तीपत्रके, झेंडे हटवले

नाशिक : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागात राजकीय पक्षांची भित्तीपत्रके, फलक व झेंडे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी विद्रुपीकरणास कारक ठरलेले १७ हजार ५०७ राजकीय फलक, भित्तीपत्रक, झेंडे हटवले गेले.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 19 Mar 2024
गुंतवणुकीत पुणे १ नंबर! पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना टाकले मागे

पुणे : उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले. लहान-मोठ्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परिषद प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आली. पुणे विभागात या परिषदेच्या माध्यमातून एकूण २१ हजार ७३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 19 Mar 2024
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना शिंदे गटाकडून तो हिरावून घेण्यासाठी धडपड चालवली आहे.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 19 Mar 2024
‘या’ पदासाठी मीच पात्र! अधिकारीच जेव्हा थेट मंत्र्यांना पत्र लिहितो तेव्हा…

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदावरून सुरू असलेला गोंधळ आणखी वाढला आहे. आता एका सहयोगी प्राध्यापकाने थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्र लिहून पदाची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 19 Mar 2024
आचारसंहितेमुळे म्हाडाचा लोकशाही दिन तात्पुरता स्थगित

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने म्हाडा लोकशाही दिन तात्पुरता स्थगित केला आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे.

म्हाडा रहिवासी, लाभार्थी आणि नागरिकांची अनेक कामे म्हाडामध्ये असतात. या कामाच्या संबंधाने अनेक तक्रारी, समस्याही असतात. या तक्रारी, समस्यांचे निराकरण योग्य प्रकारे वा वेळेत होत नसल्याने म्हाडा रहिवासी, लाभार्थी, नागरिकांच्या समस्या वाढतात. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनाची अंमलबजावणी म्हाडाच्या पातळीवर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारीपासून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा लोकशाही दिन पार पडतो. यावेळी लोकशाही दिनाच्या अनुषंगाने संगणकीय पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची सुनावणी जयस्वाल यांच्या समोर घेतली जाते. अर्जदारांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण यावेळी केले जाते. त्यामुळे हा लोकशाही दिन नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकशाही दिन तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत लोकशाही दिन होणार नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच थेट १० जूनला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल, असे म्हाडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंची दिल्लीत उतरताच पहिली प्रतिक्रिया (फोटो-फेसबुक )

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा हा महत्त्वाचा मानला जातो आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरफोडे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. आता काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या आणि अशा इतर घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत.