Marathi News Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या सगळ्यांनीच त्यांना असं करु नका म्हणून आवाहन केलं. मात्र शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही. दोन ते तीन दिवसात विचार करुन निर्णय कळवतो असं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर संजय राऊत यांनी आपण लवकरच शरद पवारांची भेट घेऊ असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याचं समर्थन केलं आहे. आता या सगळ्या घडामोडींसोबत महाराष्ट्रात काय काय घडणार आहे? हे आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News Update Today | शरद पवार राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार का?

19:29 (IST) 3 May 2023
वाहन बंद पडल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडी

ठाणे: तीन हात नाका उड्डाणपूलावर बुधवारी सांयकाळी वाहन बंद पडल्याने तीन हात नाका उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

सविस्तर वाचा...

18:45 (IST) 3 May 2023
पुणे: पत्नीला हिटरने चटके देऊन बलात्कार; कोंढवा पोलिसांकडून पतीला अटक

पुणे: पत्नीला हिटरने चटके देऊन पतीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:12 (IST) 3 May 2023
कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती; उसाच्या रसाच्या विक्रीत तिप्पटीने वाढ

मुंबई: मुंबईत उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली असून रखरखत्या उन्हाने हैराण झालेले नागरिक कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती देत आहेत.

सविसेतर वाचा...

18:07 (IST) 3 May 2023
सांगली : सुदान गृहयुद्धामुळे अडकलेले ९५ नागरिक सुरक्षित मायदेशी

सांगली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे केनान शुगर कंपनीत अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील ९५ नागरिकांची ऑपरेशन कावेरीअंतर्गत सुटका करण्यात आली असून, हे नागरिक बुधवारी मुंबईत पोहोचले.

सविस्तर वाचा..

17:11 (IST) 3 May 2023
नाशिक: बागलाण तालुक्यात दोन बालमजुरांची सुटका; दोन संशयितांविरुध्द गुन्हा

नाशिक: जिल्ह्यातील काही भागात बालमजुरी समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याने बालमजुरीच्या विळख्यात अडकलेल्या बालकांच्या सुटकेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 3 May 2023
नागपूर : नापास झाल्यामुळे नैराश्य; अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

नागपूर : अभियांत्रिकीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी सुनील भावेकर (२०, रा. प्रियदर्शनी मुलींचे वसतिगृह, हिंगणा टी-पॉईंट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली.

सविस्तर वाचा..

16:53 (IST) 3 May 2023
ठाण्यात नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात; एका महिन्यात कामे उरकण्याचे पालिका आणि ठेकेदारांपुढे आव्हान

ठाणे: पावसाळ्यापुर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याच्या मुद्द्यावरून सर्वत्र टिका होऊ लागल्यानंतर पालिका प्रशासनाने अखेर नालेसफाईची कामे सुरु केली आहेत.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 3 May 2023
भंडारा : लग्न समारंभात फटाक्यांची आतिषबाजी तीन वऱ्हाडींना भोवली

भंडारा : लग्न समारंभात अनुचित घटना घडण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. काहीच दिवसांपूर्वी लग्नात नाचणाऱ्या एका तरुणाला डीजेच्या आवाजाने कायमचा बहिरेपणा आल्याची ताजी घटना असताना आणखी एक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे.

सविस्तर वाचा..

16:35 (IST) 3 May 2023
चंद्रपूर : “येथील भूमिपुत्रांना इथेच नोकरी द्या, अन्यथा कोळसा खाणी…”, खासदार बाळू धानोरकर यांचा वेकोलि प्रशासनाला इशारा

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. येथील शेतकऱ्यांनी आपल्या अनेक पिढ्यातील शेतजमिनी कोळसा खाणी करीता दिल्या. जमीन हस्तांतरित करून त्वरित प्रकल्प सुरू करण्यात येतो. परंतु नोकरी देताना मात्र अनेक वर्षे लागतात. अनेकदा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पगस्तांना उमरेड किंवा अन्य भागात नोकरी देण्यात येते. ही येथील प्रकल्पग्रस्तांची थट्टा आहे. आता येथील भूमिपुत्रांना इथेच नोकरी द्या, अन्यथा कोळसा खाणी बंद पडू, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 3 May 2023
अमरावती : दोन तरुण देशी कट्ट्यासह दुचाकीवर फिरून..

अमरावती : देशी कट्टा बाळगून दुचाकीने फिरणाऱ्या दोघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यापीठ चौक परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. संघर्ष रवींद्र फुले (२९) रा. वडाळी व यशकुमार भाऊराव गोसावी (३४) रा. बडनेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा..

16:12 (IST) 3 May 2023
धुळ्यात करोना केंद्रासाठी युवा सेनेचे आंदोलन

धुळे: जिल्ह्यात करोना पुन्हा पसरु लागल्याने शहरात दोन दिवसात करोना केंद्र उभारावे, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:06 (IST) 3 May 2023
ठाणे: कोरोनाकाळातील अखर्चित निधी पुन्हा ग्रामपंचायतींकडे वर्ग, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मागणीला यश

कोरोना आपत्तीच्या काळात अनेक अडचणींमुळे विकासकामांवर खर्च न झालेला कोटी २१ लाख रुपयांचा निधी मुरबाडमधील २० ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून परत मिळाला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निर्देशानंतर, राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने कार्यवाही करुन शासन निर्णय जाहीर केला.

सविस्तर वाचा

15:58 (IST) 3 May 2023
डोंबिवली, कल्याणमध्ये मोबाईल चोरांचा विद्यार्थ्यांना फटका

कल्याण, डोंबिवलीत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने पायी चाललेल्या पादचाऱ्यांच्या हातामधील मोबाईल दुचाकीवरुन येणारे दोन भुरटे चोर हिसकावून पळून जात आहेत. सोमवारी दिवसभरात शहराच्या विविध भागात अशाप्रकारच्या तीन घटना घडल्या.

सविस्तर वाचा

15:56 (IST) 3 May 2023
मुंबई: माथाडी कामगारांसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त!

कांदिवली चारकोप येथे माथाडी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी दिलेल्या सुमारे २८ एकरपैकी ८ एकर इतक्या खुल्या शासकीय भूखंडावर राजरोसपणे होत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध अखेर कारवाई करण्यात आली. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यास आली आहेत.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 3 May 2023
वसंतदादांचा राजकीय संन्यास अन पुन्हा सक्रिय

सांगली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने निर्माण झालेल्या राजकीय स्थितीची तुलना ४७ वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी घेतलेल्या राजकीय संन्यासाच्या घोषणेसोबत केली जात आहे.

सविस्तर वाचा..

15:20 (IST) 3 May 2023
वाटाघाटी फिस्कटल्याच; राज्यभरातील गटविकास अधिकारी संपावर असल्याने कामकाज विस्कळीत

वर्धा : शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची जबाबदारी ग्रामसेवकांकडून काढत ती गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविली. तरीही त्यांना असक्षम असे म्हटल्याने गटविकास अधिकारी संपावर गेलेत. हा निर्णय रद्द करावा म्हणून राज्यातील साडेतीनशेवर गट विकास अधिकारी यांनी दहा एप्रिलपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. सतत वाटाघाटी सुरू आहेत, पण मार्ग निघाला नासल्याचे संघटनेचे नेते शिंदे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

14:54 (IST) 3 May 2023
बुलढाणा : आमदार राजेंद्र शिंगणेंनी घेतली शरद पवारांची भेट, निर्णय मागे घेण्यासाठी साकडे; जिल्ह्याध्यक्षांकडे राजीनाम्यांचा ओघ

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनाम्याच्या वादळी पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे जिल्ह्यातच असलेले जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्याकडे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा ओघ सुरूच असल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वाचा..

14:28 (IST) 3 May 2023
वाशीम : उन्हाळा की पावसाळा? मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

वाशीम : सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. २ एप्रिल रोजी रात्री जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत.

सविस्तर वाचा..

14:17 (IST) 3 May 2023
उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णा नदी मुसळधारेमुळे तुडुंब! ग्रामस्थ सुखावले

बुलढाणा : अमरावती, अकोलासह बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा नदी काठोकाठ भरून वाहत आहे. एरवी उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णामाय पुरासारखी भरून वाहत असल्याने काठावरील विविध गावातील नागरिक सुखावले आहे.

सविस्तर वाचा..

14:15 (IST) 3 May 2023
मुंबई: कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी महिन्याभरात निविदा मागविणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर - विक्रोळी मेट्रो ६’ प्रकल्पातील कांजूरमार्ग कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतर तिच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. महिन्याभरात कांजूरमधील कारशेडसाठी निविदा जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

14:14 (IST) 3 May 2023
मुंबई: ‘अनलॉक जिंदगी’ ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी

करोनाकाळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 3 May 2023
पुणे: आभासी चलन गुंतवणुकीत परतावा न मिळाल्याने तरुणाचे जंगली महाराज रस्त्यावरुन अपहरण

आभासी चलनात केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळत नसल्याच्या वादातून तरुणाचे जंगली महाराज रस्ता परिसरातून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणाला फलटणमधील एका हॉटेलमध्ये रात्रभर डांबून ठेवण्यात आले.

सविस्तर वाचा

13:26 (IST) 3 May 2023
फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेची २ कोटींची वसुली

पुणे: रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८ हजार १६७ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सविस्तर वाचा...

13:24 (IST) 3 May 2023
वैद्यकीय विभागातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई: करोनाकाळात वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळे वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 3 May 2023
डोंबिवली- शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या १६७ वाहन चालकांवर कारवाई

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अनेक बेजबाबदार वाहन चालक वळसा टाळण्यासाठी, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उलट मार्गिकेतून वाहने चालवून सुरळीत असलेल्या मार्गिकेत वाहन कोंडी करतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कोळसेवाडी, मुंब्रा वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 3 May 2023
कोल्हापूर: राष्ट्रवादीची भाजपबरोबर बोलणी सुरू; पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी येथे केला आहे.

सविस्तर वाचा

13:17 (IST) 3 May 2023
डोंबिवली: भोपर-घारिवली रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावर रुणवाल गृहसंकुलाच्या प्रवेशव्दारावर चुकीच्या मार्गिकेतून आलेल्या एका दुचाकी स्वाराने मोटार सायकलवरुन चाललेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 3 May 2023
अकोल्यात बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती होणार; शहरातील ओल्या कचऱ्यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया, २० टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित

अकोला : महापालिकेद्वारे भोड येथे ‘स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्‍यवस्‍थापन’ अंतर्गत २० टन प्रतिदिवस क्षमतेचा बायोगॅस प्रकल्‍प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे महाराष्‍ट्रदिनी आ. रणधीर सावरकर यांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील ओला कचऱ्यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करून बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती केली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 3 May 2023
शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाविरोधात नवी मुंबईत निदर्शने

नवी मुंबई : मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादीअंतर्गत पवार यांच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. नवी मुंबईतही पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी नवी मुंबई अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले होते.

सविस्तर वाचा..

12:39 (IST) 3 May 2023
पुणे : रिक्षाचालकाने शरद पवारांना रक्ताने लिहिले पत्र; निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी

पुणे : पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षाचालक संदीप काळे यांनी शरद पवार यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. साहेब आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

सविस्तर वाचा..

sharad pawar resignation

शरद पवार

शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत, पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात हाच विषय चर्चेत असणार आहे.