Maharashtra News Today: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर आज तारखेनुसार राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते विधिवत पूजा केली जात असताना दुसरीकडे पुण्यात लाल किल्ल्यामध्येही विविध संघटनांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
ठाणे: शहरातील बहुचर्चित समुह पुनर्विकास योजनाचा (क्लस्टर) शुभारंभापाठोपाठ आता शहराच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
वाचा पूर्ण पोस्ट...
मन सुन्न झालंय...
तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड... ातूर रेणापूर : अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली. तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला. दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली. राज्यात दलित सुरक्षीत नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?
वाशिम: वाशिम वरून थेट मुंबई जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच नव्याने सुरू झालेली नांदेड पूर्णा – वाशीम – अकोला – नाशिक – मुंबई लोकमान्य टिळक एक्सप्रेस सोईची होईल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, अल्पावधीतच या रेल्वेची सेवा विस्कळित होत चालली असून रात्री तब्बल दोन तास विलंबाने ती धावली.
भंडारा : मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे - फडणवीस सरकारला दिला आहे.
अमरावती: सध्या बाजारात कापसाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच हे संकट उद्भवले असून सरकारने कापसाला तेरा हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात कापूस फेकला.
शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. मोठ्या नेत्यांनी पदं भूषवली. पण जेव्हा शरद पवारांवर असा कुठला नेता खालच्या पातळीवर बोलतो, तेव्हा फक्त कार्यकर्तेच लढतात. हे बघितल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भूषवली, ते नेते यावर काहीच बोलत नाहीत. अजित पवारच यावर बोलले, पण बाकीचे शांत राहिले. आम्ही बोलत राहू, पण नेते गप्प का बसतात हे काही कळत नाही - रोहित पवार
काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहेत. खालच्या पातळीवर बोलून पदाची अपेक्षा त्यांच्या नेत्याकडून ते करत असावेत. भाजपाचे नवीन स्वघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात आणि वरचे नेते जेव्हा यावर गप्प बसतात तेव्हा त्याचा अर्थ या खालच्या पातळीवरच्या राजकारणाला मोठ्या नेत्यांचं पाठबळ आहे. मुनगंटीवारांकडून ही अपेक्षा नव्हती - रोहित पवार
बदलापूरः बदलापूर स्थानक परिसरात वाहतुकीचे कोणतेही फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर नुकतीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथः अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शिवमंदिराच्या परिसर सुशोभीकरणात प्रवेशद्वारापासून नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर, भक्त निवास ते स्वच्छतागृहापर्यंतच्या विविध कामांसाठी नुकतीच निविदा जाहीर केली आहे.
डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा गावा जवळील रुणवाल माय सिटी गृहप्रकल्पाच्या समुह विकास प्रकल्पातील पाच क्रमांकाच्या संकुलातील उद्वाहन चालकाचा तेराव्या माळ्यावरुन उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून गुरुवारी मृत्यू झाला.
नाशिक: सुरगाणा तालुक्यातील उंबरठा वनपरीक्षेत्रात खैराची तस्करी करणाऱ्यांना वन कर्मचाऱ्यांनी हटकले असता धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दोन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले.
मुंबई: अरबी समुद्रात खोलवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून गेल्या तीन तासांत चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असून.
पुणे: शिक्रापूर परिसरात संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका महिलेने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पुणे : लाच प्रकरणात अडकलेले शिक्षक, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, ९ जून रोजीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलला!
नागपूर: पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली जाते. पूर नियंत्रण आणि तत्सम बाबींचे नियोजन केले जाते. त्याची माहिती लोकांपर्यत पोहचवली जाते.
डीआयपीपीनं आकडेवारी जाहीर केली आहे. FDIमध्ये महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला पुन्हा आपण पहिल्या क्रमांकावर आणलंय. त्यामुळे जे लोक आत्तापर्यंत उद्योग इकडे गेले, तिकडे गेले म्हणत होते, आता तरी त्यांनी त्यांची तोंंडं बंद केली पाहिजेत. ते जे करू शकले नाहीत, ते आम्ही करून दाखवलं आहे - देवेंद्र फडणवीस
डोंबिवली- सात दिवसाच्या कालावधीनंतर डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर पुन्हा वाहन तपासणी मोहीम राबवली. वाहतूक नियम, मोटार वाहन कायद्यातील नियम न पाळणाऱ्या ६२ बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवर कारवाई करुन पथकाने एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल केला.
ठाकरे गट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडणार भूमिका, प्रश्न आणि मुद्दे...!
भंडारा: सध्या शहरात चोरांची एक टोळी सक्रिय झाली आहे. चादर विक्री करण्याच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन पाळत ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करून पसार होतात.
पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ७ ते १२ जून दरम्यान आळंदीत औद्योगिक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.
पुणे: कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात पदव्युत्तर पदवी, पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी परदेशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने सांगून दाखवावं की मी कामं करण्यासाठी पैसे घेत होतो, तर मी राजकारण सोडेन. कृपाल तुमानेंनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, नाहीतर उद्यापासून घरी बसावं - अजित पवारांचं आरोपांवर कृपाल तुमानेंवर टीकास्र. अजित पवार कामं करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री असताना पैसे घ्यायचे असा आरोप कृपाल तुमानेंनी केला होता.
शहरातील नगर परिषदेच्या क्रीडा मैदानावर भिक्षेकऱ्यांची एक टोळी मागील तीन महिन्यांपासून तळ ठोकून आहे. मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर या टोळीने अतिक्रमण केले आहे. हे भिक्षेकरी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून किंवा धमकी देत भिक्षा मागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
पुणे: कात्रज परिसरात परराज्याातील प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.
पुणे : या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांनी घराण्याच्या नावाने राज्य केले. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले. सत्ता कोणासाठी आणि कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श वस्तुपाठ आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी काढले.
वर्धा : राज्य शासनाच्या महसूल विभागाने तब्बल ४ हजार ६२५ पदांची एकाचवेळी भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी छत्तीस जिल्हा केंद्रातून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे.सरळ सेवा भरती पद्धतीने १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान या पदासाठी परीक्षा होणार आहे.
डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसी मधील एका नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव लोटून नाल्याची एक बाजू बांधकामासाठी बंद करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या महिन्यापासून हे काम सुरू असुनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना नाल्यातील भराव दिसत नाही का, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : विविध कारणांमुळे कधीही पूर्ण न होऊ शकणाऱ्या आणि अव्यव्हार्य अशा राज्यातील ८८ गृहप्रकल्पांची महारेरा नोंदणी आता रद्द होणार आहे. या प्रकल्पांची यादी महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
मुंबई: पायधुनी येथील व्यापाऱ्यांची फसवणूक करून ७६ लाख रूपये चोरणाऱ्या त्रिकुटाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. इंदरा कुमार उकाराम चैहान (२४), भैरवसिंग जब्बारसिंग जोधा (२६), नरेंद्र सिंग मनोहर सिंग सोलंकी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून ते भाईंदर, कांदिवलीतील रहिवासी आहेत.
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर