Maharashtra Breaking News Updates, 17 February 2025 : संतोष देशमुख प्रकरणात सातत्याने बाजू मांडत असलेले भाजपाचे आमदार सुरश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदारांची येत्या २० फेब्रुवारीला तर आमदारांची २५ तारखेला बैठक होणार आहे. यासह महाराष्ट्रातील राजकारण आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

Live Updates

Maharashtra News Live Update Today, 17 February 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

19:49 (IST) 17 Feb 2025

ठाणे जिल्ह्यात उत्पन्नाचे दाखले देण्याचे काम सुरू; नागरीक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठींचे आंदोलन मागे

ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे गेल्या २० दिवसांपासून उत्पन्न दाखला मिळत नसल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेने अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे.

वाचा सविस्तर...

19:46 (IST) 17 Feb 2025

दोन जिवलग मैत्रिणीची झाली मुंबई पोलिस दलात निवड; शेतकऱ्यांच्या मुलींनी घेतली उत्तुंग भरारी

नारायणगाव : लहान वया पासून ते शालेय शिक्षण असो कि महाविद्यालयीन शिक्षण एकत्र वाढलेल्या दोन जिवलग मैत्रिणी कु. वृषिता प्रितम गोरडे आणि कु. समिक्षा मारुती वाबळे यांची मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई या पदावर निवड झाली आहे. या मैत्रणीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे झाले आहे .

सविस्तर वाचा

19:46 (IST) 17 Feb 2025

न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला संघर्ष करावा लागू नये; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे

नारायणगाव : शिवकालीन न्यायव्यवस्थे मध्ये सामंजस्याने वाद कसे मिटवीले  जातील याला प्राधान्य दिले जात असे तथापि सद्यस्थितीत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू नये. नागरिकांना तालुकास्तरीय कनिष्ठ न्यायालया मध्येच  न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा  मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांनी व्यक्त  केली.

सविस्तर वाचा

19:37 (IST) 17 Feb 2025

उद्धव ठाकरे गटाला विदर्भात खिंडार? ॲड. आशिष जयस्वाल म्हणतात,‘मोठी रांग…’

नागपूर : शिवसेना पक्षात फुटीनंतर लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला आणि विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला मोठे यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे गटात पुन्हा फुटीची चर्चा आहे. विदर्भात एकनाथ शिंदे लवकरच मोठ्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडण्याचे संकेत आहे.

सविस्तर वाचा

19:31 (IST) 17 Feb 2025

घरामध्ये ९० गोण्या भरून गुटखा, घरामधूनच सुरू होता पान टपऱ्यांवर सप्लाय

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

वाचा सविस्तर...

19:21 (IST) 17 Feb 2025

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, भरदिवसा सराफ दुकानावर दरोडा, अंबडमधील घटना

नाशिक : कायदा व सुव्यवस्थेचा डंका पोलिसांकडून पिटला जात असताना गुन्हेगारांकडून आव्हान देणे सुरुच आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तीन संशयितांनी अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स दुकानात सशस्त्र लूट केली.

वाचा सविस्तर...

19:19 (IST) 17 Feb 2025

किरकोळ कारण अन् एकाच समाजाचे दोन गट आपसात भिडले; वाहनाची जाळपोळ, दगडफेक…

अकोला : जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावामध्ये एकाच समाजाच्या दोन गटात मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या वादातून एका चारचाकी वाहनाची जाळपोळ करून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. लाठीकाठीने परस्पर हल्ला देखील करून हाणामारी झाली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

सविस्तर वाचा

19:11 (IST) 17 Feb 2025

उल्हासनगरमध्ये इलेक्ट्रोपॅथी डाॅक्टरकडून रुग्णांना ॲलोपॅथीची औषधे, डाॅक्टर दीपक सजनानी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल

उल्हासनगर पाचमधील नेताजी चौकातील श्रेयस दवाखान्याचे डाॅक्टर दीपक सजनानी यांच्याकडे इलेक्ट्रोपॅथीची पदवी असताना ते ॲलोपॅथीचे औषधे रुग्णांना देत आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वैद्यकीय सेवा नोंदणीचे प्रमाणपत्र नसताना ते रूग्ण सेवा देत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

19:06 (IST) 17 Feb 2025

बुलढाणा: हे काय? धरणाच्या भिंतीवर चक्क उगवली झाडे…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यातही जिल्ह्याचे कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे.पावसाच्या, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशी परिस्थिती असल्याने शेती आता अतिशय जोखमीचा व्यवसाय झाला आहे. त्यातच सिंचन करणाऱ्या धरणाची स्थिति नियमित डागडुजीअभावी बिकट झाली आहे.

सविस्तर वाचा

19:01 (IST) 17 Feb 2025

शिवजयंतीनिमित्त झेंडे लावताना मालमोटारीच्या धडकेने क्रेन उलटली… दोघांचा मृत्यू, चार जखमी

मनमाड : शिवजयंतीनिमित्त मनमाड – नांदगाव मार्गावरील पथदीपांना क्रेनवर उभे राहून झेंडे लावण्याची कसरत युवकांच्या जीवावर बेतली. मालमोटारीची धडक बसल्याने क्रेन रस्त्यावर उलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.

वाचा सविस्तर...

18:57 (IST) 17 Feb 2025

जात पात धर्माच्या पलीकडे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे काम केले पाहिजे ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सावंतवाडी: राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे.

सविस्तर वाचा

18:39 (IST) 17 Feb 2025

शिक्षिकेच्या मृत्युमुळे रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय ऐरणीवर

नाशिक : शहरातील रस्त्यांना अतिक्रमणांचा पडलेला विळखा आता नाशिककरांच्या जीवावर बेतत आहे. इंदिरानगर बोगद्याजवळून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी झालेल्या अपघातात मोटारीची धडक बसून शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तरी महापालिकेला जाग येणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा सविस्तर...

18:20 (IST) 17 Feb 2025

पाणीपुरवठा टाकीचे बांधकाम कोसळले! बाजूलाच आहे रुग्णालय, आंगणवाडी, सुदैवाने टळला मोठा अनर्थ

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज गावात पाणीपुरवठा योजनेतून बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचा 'स्लॅब' पत्त्याच्या ढिगा सारखा अचानक कोसळला! निर्माणाधीन जलकुंभाला लागूनच अंगणवाडी आणि शासकीय रुग्णालय असला तरी सुदैवाने संभाव्य भीषण अनर्थ (प्राणहानी) टळला आहे.

सविस्तर वाचा

18:03 (IST) 17 Feb 2025

बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांना लुटले, शिर्डी लासलगाव रस्त्यावरील वेळापूर शिवारातील घटना

राहाता : साई भक्तांचे चारचाकी वाहन अज्ञात ७ ते ८ तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. ही लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वाचा

17:57 (IST) 17 Feb 2025

शेअर बाजाराच्या नावाखाली पाच जणांची ६० लाखांना फसवणूक

ठाणे : शेअर बाजारात जादा परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून पाच जणांची ६० लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा सविस्तर...

17:37 (IST) 17 Feb 2025

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

सावंतवाडी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणाने पक्षाच्या रूपात मोठ्या प्रमाणात ताकद दिली होती. परंतु सध्या काहींनी ठाकरे शिवसेनेला धक्का दिला असतांनाच आज माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी साथ सोडणार नाही असे म्हटले आहे.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 17 Feb 2025

सावंतवाडी: विजेच्या बल्ब मध्ये साकारले छत्रपती शिवरायांचे चित्र

सावंतवाडी: शिवजयंतीचे औचित्य साधून मालवण येथील वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्ब मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्तवेधक चित्र साकारले आहे. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हे चित्र साकारण्यात श्री चांदरकर हे यशस्वी झाले आहेत

सविस्तर वाचा

17:06 (IST) 17 Feb 2025
२४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहा, 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी रणवीर अलाहबादिया सायबर सेलचे निर्देश

'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याला २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. याच प्रकरणात कॉमेडियन समय रैना याने तो परदेशात असल्याने महाराष्ट्र सायबर सेलने त्याचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवावा अशी विनंती केली होती. मात्र त्याची ही विनंती फेटाळण्यात आली असून त्याला १८ फेब्रुवारी रोजी त्याचे म्हणणे मांडण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावेच लागेल असे सायबर सेलने सांगितले आहे.

16:36 (IST) 17 Feb 2025

सर्वांना शिक्षण हक्क अंतर्गत पाच हजार तीन विद्यार्थ्यांची निवड

नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातून यासाठी तीन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिली प्रवेश यादी जाहीर झाली असून नाशिक जिल्ह्यात पाच हजार तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ या वर्षासाठी निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश प्राप्त होतील. परंतु, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती पाहून खात्री करावी. राज्यातून तीन लाख पाच हजार १५२ अर्ज भरण्यात आले. यातील एक लाख एक हजार ९१६ विद्यार्थ्यांची निवड झाली. ८५,४०६ जण अद्याप प्रतिक्षा यादीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या ४०७ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात पाच हजार २९६ जागा उपलब्ध असून १७,३८५ अर्ज प्राप्त झाले. यातील पाच हजार तीन जणांची निवड झाली असून सात विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.

16:34 (IST) 17 Feb 2025

छत्रपती संभाजीनगर : खंडपीठ चौकात डिजेचे वाहन पेटले

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठ चौकात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एका डिजेच्या वाहनाने पेट घेतला. सिडको अग्निशमन विभागाचा बंब तातडीने रवाना करण्यात आला. नितीन घोडके यांच्या मालकीचे डीजेचे वाहन होते आणि त्यांनी ३० ते ३५ लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तवल्याची माहिती सिडको अग्निशमन विभागाचे अधिकारी गोरख जाधव यांनी दिली.

दरम्यान, पदमपुरा भागातील प्रगती पेट्रोल पंप परिसरातही रविवारी रात्री १० च्या सुमारास एका कारने पेट घेतला. पदमपुरा अग्निशमन विभाग जवळ असतानाही एकही बंब कारची आग विझवण्यासाठी मिळू शकला नाही. कारण पदमपुरा विभागाचे चार बंब पडेगावातील कचरा डेपोच्या ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी गेलेले होते. अखेर पंपाजवळच्या कारची आग विझवण्यासाठी खासगी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी लागल्याचे सांगितले जात आहे.

16:26 (IST) 17 Feb 2025

गिर्यारोहणातही करिअर होऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सुरू झालेल्या संस्थेच्या दशकपूर्तीची गोष्ट

‘आता कुठली नवीन मोहीम?’ किंवा ‘आज कुठल्या डोंगरावर?’ गेल्या अनेक वर्षांत हे प्रश्न मित्रमंडळी आणि आप्तांकडून ऐकणे सरावाचे झालंय. पूर्वी या प्रश्नांत कुतूहल, काळजी आणि चौकशी असायची, पण अलीकडे त्यात आपुलकीही जाणवते.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 17 Feb 2025

गणेश नाईकांचा ठाण्यातील जनता दरबारचा मुहूर्त ठरला, एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात फेब्रुवारी महिन्यातील…

नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) शीतयुद्ध सुरू झाले आहे. या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु असतानाच, गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहुर्त अखेर ठरला आहे.

वाचा सविस्तर...

16:15 (IST) 17 Feb 2025

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित, जुन्नर येथे भव्य महोत्सवाचे आयोजन

सर्व शिवभक्तांना विनापास किल्ल्यावर प्रवेश देण्यात येईल , अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 17 Feb 2025

डोंबिवलीतील मराठी माणसाशी अरेरावीने बोलणाऱ्या टपाल विभागातील कर्मचाऱ्याला बदलीची शिक्षा

मराठी भाषेच्या मुद्दावरुन डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाशी अरेरावीची भाषा करणाऱ्या टपाल साहाय्यक कर्मचाऱ्याची तिकीट संग्रहालय विभागातून अन्य विभागात बदली करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

15:36 (IST) 17 Feb 2025

कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू, धायरीतील घटना; चुलतभाऊ अटकेत

पत्नीबद्दल अपशब्द उच्चारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमर हा चुलतभाऊ राजूच्या अंगावर धावून गेला.

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 17 Feb 2025

प्रशासनाने सर्वसामान्यांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नये – आमदार कटके

शिरुर नगरपालिकेतील मंगल कार्यालयात 'शासन आपल्या दारी व लोकशाही दिवसाचे आयोजन ' करण्यात आले होते .

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 17 Feb 2025

पिंपरी : पुन्हा वाहनांची तोडफोड; दापोडीत कोयत्याने आठ वाहनांची तोडफोड

आरोपींनी कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा...

14:53 (IST) 17 Feb 2025

अर्थमंत्री महोदय नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात? रोहित पवारांचा सवाल

"अर्थमंत्री महोदय नेमके काय चालले आहे आपल्या राज्यात? हा प्रश्न आज आवर्जून विचारावासा वाटतो. एकीकडे निधी नाही म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत, लाडकी बहीण योजनेत कपात, युवा प्रशिक्षण योजनेतील युवांना पगार नाहीत तर दुसरीकडे जाहिराती करण्यासाठी शंभर कोटींच्या होर्डिंग उभारणीला मान्यता दिली जाते. हा निर्णयानुसार शासनाने शासकीय जागांवर स्वतः १०० कोटी खर्च करून डिजिटल होर्डिंग उभारायचे, या होर्डिंगचे परिचालन आणि देखभाल करण्यासाठी खाजगी कंपनी नेमायची, त्याबदल्यात सरकारला १५% सरकारी जाहिराती देता येतील आणि ८५ % जाहिराती खाजगी असतील. शासनाचा हा निर्णय म्हणजे ‘सरकारने स्वतःच्या जागेवर स्वतः खर्च करून घर बांधायचे, घराच्या एका कोपऱ्यात शासनाने राहायचे, घराची साफसफाई देखभाल खाजगी कंपनीने करायची, त्याबदल्यात उर्वरित संपूर्ण घर खाजगी कंपनीने भाड्याने द्यायचे’ असाच हा प्रकार आहे. हा निर्णय अर्थखात्याचा नसला तरी शेवटी जबाबदारी अर्थमंत्र्यांचीच आहे. अर्थमंत्री शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे अर्थमंत्री या निर्णयात लक्ष घालून आवश्यक ते बदल करून घेतील, ही अपेक्षा," अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

14:50 (IST) 17 Feb 2025

डोंबिवलीतील ५१ बेकायदा इमारतींवर हातोडा ? आयरेतील साई गॅलेक्सी संकुलाचे प्रकरण उच्च न्यायालयाने फेटाळले

याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तीन वर्षापूर्वी एक याचिका न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी डोंबिवलीत पालिकेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या, महारेरेचा नोंदणी क्रमांक मिळविलेल्या या बेकायदा इमारती १९ फेब्रुवारीपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते.

वाचा सविस्तर...

14:50 (IST) 17 Feb 2025

६२ टक्के गृहनिर्माण प्रकल्पांकडून बांधकाम प्रगती अहवाल सादर, महारेराच्या कठोर कारवाईचा परिणाम

राज्यात सध्या ६२ टक्के गृहनिर्माण प्रकल्प महारेराच्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करीत आहेत.

सविस्तर वाचा...

Maharashtra News Live Update Today, 17 February 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader