Maharashtra Breaking News Updates, 17 February 2025 : संतोष देशमुख प्रकरणात सातत्याने बाजू मांडत असलेले भाजपाचे आमदार सुरश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदारांची येत्या २० फेब्रुवारीला तर आमदारांची २५ तारखेला बैठक होणार आहे. यासह महाराष्ट्रातील राजकारण आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Update Today, 17 February 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
गोंदिया: टोमॅटो दर पाच रुपये प्रति किलो! उत्पादकांच्या डोळ्यात पाणी
नागपूर : स्फोटानंतर एशियन फायर वर्क्स कंपनीत स्मशान शांतता, पोलिसांनी अखेर…
सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मृतांचे आणि जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली.
उद्या परळी आणि मास्साजोग येथे जाणार, सुप्रिया सुळेंची माहिती
मी उद्या परळी आणि मास्साजोग येथे जाणार आहे. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे कुटुंब यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणार आहोत. अंजली दमानिया यांनी सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहेत. पारदर्शक चौकशी होऊन सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुळशी धरणात पिंपरीतील महाविद्यालयीन युवक बुडाले, पोलिसांकडून शोध सुरू
अनिश राऊत (वय १८, रा. पिंपरी), विशाल राठोड (वय १७, रा. चिंचवड) अशी मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
“कुणबी-मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू, गरिबांच्या लेकरांसाठी…”, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
जरांगे पाटील यांनी सामाजिक ऐक्यावर भर दिला. मराठा आणि कुणबी एकच असून जो लढाया करतो तो क्षत्रिय मराठा आणि जो शेती करतो तो कुणबी, असे ते म्हणाले.
ठाणे जिल्ह्यात भाजप – शिवसेनेत दरी वाढली ?
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे.
उंबर्डेतील हळदीमध्ये नाचणाऱ्या शरद लोखंडेंकडे शस्त्र परवाना नसल्याचे उघड
कल्याण : उंबर्डे येथील हळदी समारंभाच्या कार्यक्रमात पिस्तुल दाखवत नाचणाऱ्या शरद लोखंडे यांच्या नावे शस्त्र परवाना नसल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : मलकापूर हादरले! अल्पवयीन मुलीवर कॅफेत बलात्कार!
प्राप्त माहितीनुसार गेल्या वर्षभरापूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी आणि दुधलगावचा समीर देशमुख यांच्यात कथित मैत्री झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणात, कॉमेडियन समय रैना याने तो परदेशात असल्याने महाराष्ट्र सायबर सेलने त्याचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात यावा अशी विनंती केली आहे.मात्र महाराष्ट्र सायबरने त्याची विनंती फेटाळली असून त्याला १८ फेब्रुवारी रोजी त्याचे म्हणणे मांडण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावेच लागेल असे सांगितले आहे.
#BREAKING: In the 'India's Got Latent' case, Comedian Samay Raina, requested Maharashtra Cyber to record his statement via video conferencing, as he is currently abroad. Maharashtra Cyber denied his request, insisting that he must appear in person on February 18 to give his… pic.twitter.com/wsAAYm03WO
— IANS (@ians_india) February 17, 2025
दिल्लीत साहित्य संमेलन, पण दिल्लीशी नाते असणारी ‘ही’ भाषा मात्र बेदखल ?
मराठी भाषेस अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर होत असलेले हे पहिलेच संमेलन असल्याने उत्सुकता दिसून येते. पण संमेलन आणि वाद नाही, असे कधी झाले नाही.
कल्याणमध्ये तीन महिन्याच्या बालकाला पालकांनी बेवारस स्थितीत सोडले
कल्याण पश्चिमेतील जोशीबाग भागात एका घराच्या समोर मोकळ्या जागेत एक तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या आई, वडिलांनी शनिवारी सकाळी बेवारस स्थितीत सोडून दिले आहे.
कुत्र्याला हाकलले म्हणून अंगठा कापला, जुहू चौपाटीवर घडला प्रकार
मुंबई : जुहू चौपाटी येथे अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून २६ वर्षीय तरूणाचा अंगठा कापल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने तक्रारदावर चाकूने वार केले असून जुहू पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
परीक्षा एकाची अन् पेपरला बसवले दुसऱ्यालाच, वडिलांचे नाव विचारताच…
सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
नागपूर: दारूगोळा कंपनीत स्फोट, सखोल चौकशीचे आदेश
एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला.
समृद्धीवर मृत्यूतांडव! खासगी बसचा भीषण अपघात… झोपेच्या डुलकीने एका क्षणात…
चालकाला झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून, पाच ते सहा गंभीर जखमी झाले आहेत.
रणजी चषक : विदर्भ देणार मुंबईला जोरदार टक्कर…
नागपूर : मुंबईकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारखे स्टार खेळाडू आहेत, मात्र विदर्भाचा संघही जोमात आहे. त्यामुळे सोमवारपासून नागपूरच्या जामठा मैदानावर रणजी चषक मधील उपांत्य फेरी सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कल्याणमधील महिलेची एम.बी.बी.एस. प्रवेशाच्या नावाने पाच लाखाची फसवणूक
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा गंधारनगर भागातील दोन इसमांनी एम. बी. बी. एस. प्रवेशाच्या नावाखाली येथील एका महिलेची पाच लाख १० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली.
चार विद्यापीठांच्या पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रतिबंध; नियम उल्लंघनामुळे यूजीसीची कारवाई
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएच.डी. नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी चार विद्यापीठांना पाच वर्षांसाठी पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यास प्रतिबंधित केले आहे. विशेष म्हणजे, प्रतिबंधित करण्यात आलेली संबंधित चारही विद्यापीठे राजस्थानातील खासगी विद्यापीठे असून, या कारवाईमुळे एकूणच पीएच.डी. प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बँकेची फसवणूक! बनावट सोने गहाण ठेऊन ७३ लाखांचे कर्ज काढले…
बँकेत ठेवण्यात आलेल्या सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने ग्राहकांशी हातमिळवणी करुन बनावट दागिणे बँकेत ठेवले.
पुणे : शहरात साखळी चोरट्यांचा धुमाकूळ, ज्येष्ठ महिला ‘लक्ष्य’
ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना रविवारी (१६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास घडली.
फेब्रुवारी महिन्यातच रायगडातील धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर, उन्हाळ्यात टंचाईचे संकट ?
धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडे पर्यंतच धरणामधील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे.
कोकणात ठाकरे गटाला फुटीचे ग्रहण
भाजप नेते नारायण राणे यांच्यापासून सुरु झालेली शिवसेना ठाकरे पक्षातील गळती माजी आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत येऊन सध्या थांबली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गट अजूनही आग्रही
जवळपास महिनाभराचा कालावधी उलटूनही नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये हे पद शिंदे गटाकडे होते.
तब्बल ३५० मांजरी एकाच फ्लॅटमध्ये, पुण्यातील हडपसरच्या सोसायटीतील घटना, पशू संवर्धन विभागाची नोटीस
सोसायटीमधील नागरिकांनी सदनिका धारकांकडे तक्रार केली. रहिवाशांच्या तक्रारीकडे त्यांनी काही लक्ष दिले नाही.
एका आमदाराची अशीही ‘पूर्व’ तयारी, रोज सलग सात तास मॅरेथॉन…
आर्वी मतदारसंघातील आर्वी, कारंजा व आष्टी या तालुक्यातील विविध समस्या ते जाणून घेत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वतंत्र लढणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्यांना स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य लढण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर बोलताना भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा आम्ही असू….आपापल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे. शेवटी आम्ही महायुतीत लढणार आहोत. आमची महायुती मजबूत आहे. पण आपापला पक्ष वाढवणे, जिथे स्पेस आहे ती घेणं सुरू आहे.”
भाजपा निवडणूक स्वतंत लढणार का? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “आम्ही महायुतीमध्येच जाणार आहोत. विधानसभा, लोकसभा देखील महायुतीतच लढली आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीत लढण्याचा आमचा विचार आहे,”
“संतोष देशमुख खूनाचा भाजपाने वापर केला”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मराठा समाजाचा मोहरा पुढे आणला, त्यासाठी त्यांनी संतोष देशमुख खूनाचा त्यांनी वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी… हे पाहावे लागेल. अशा प्रकारची लढाई तुम्ही सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात का करायला लावली नाही? कारण का तो दलित होता? सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी पोलीस लॉकअपमध्ये मारला गेला. त्यावर कोणी आंदोलन केलं नाही. भाजपाने करायला लावलं नाही. संतोष देशमुख प्रकरणात वापर केला गेला, हे भाजपाच्या राजकारणाचं स्वरूप आहे,” असा आरोप शिवसेना(ठाकरे) पक्षाचे नते संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra News Live Update Today, 17 February 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स