Mumbai Breaking News Updates, 14 February 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात काल माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. याचबरोबर विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षेनेतेपदी निवड करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ते महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.

Live Updates
19:43 (IST) 14 Feb 2025

‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादात रणवीर अलाहबादियाचे मुंबई पोलिसांच्या दुसऱ्या समन्सकडेही दुर्लक्ष

कॉमेडी शो दरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे टीका होत असलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादियाने मुंबईतील खार पोलिसांनी जारी केलेले दुसरे समन्सही टाळले आहे. कॉमेडियन समय रैनाच्या कॉमेडी शो, इंडियाज गॉट लेटेंटच्या एका एपिसोडवरील त्याच्या वादग्रस्त टिप्पण्यांची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

19:08 (IST) 14 Feb 2025
मुख्यमंत्री फडणवीसांचे आपल्या कुटुंबासह प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

https://platform.twitter.com/widgets.js

18:32 (IST) 14 Feb 2025
“सरकारचं आश्वासन ही केवळ बनवाबनवीच होती का?” संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोहित पवारांचा सवाल

“सामान्य माणसावर अन्याय झाला तर तो दूर करण्याचा शब्द सरकार देतं खरं पण शेवटी त्या व्यक्तीला न्याय मिळतो का? हा खरा प्रश्न आहे. मग सरकारचं आश्वासन ही केवळ बनवाबनवीच होती का? आणि यात काही डील तर झाली नाही ना? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही… पब्लिक मेमरी ही शॉर्ट असते याचा तर सरकार गैरफायदा घेत नाही ना? पण यातून नुकसान मात्र सामान्य माणसाचंच होतं.” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पचे नेते रोहीत पवार यांनी केली आहे . या पोस्टमध्ये त्यांनी संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, मस्साजोग आणि परभणी हे शब्द हॅशटॅग म्हणून वापरले आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

16:48 (IST) 14 Feb 2025

महाव्यवस्थापकाच्या घरावर एअर पिस्तुलने गोळ्या झाडल्या, समोरच्या इमारतीमधील चौघे ताब्यात, गुन्हा दाखल

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या खासगी कंपनीच्या महाव्यवस्थापकाच्या खिडकीत शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला. यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता समोरच्या खिडकीतून एअर पिस्तुलने गोळ्या झाडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सविस्तर वाचा…

16:41 (IST) 14 Feb 2025

समुद्रातील दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास बंदी, मच्छीमारांची सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक

रत्नागिरी : शासनाने समुद्रातील दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास घातलेल्या बंदीविरोधात रत्नागिरीतील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली.

वाचा सविस्तर…

16:41 (IST) 14 Feb 2025

मुरबाडच्या धसईत पिसाळलेल्या श्वानाचा चिमुकलीवर हल्ला

उल्हासनगर : भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही भटक्या श्वानांमुळे नागरिक भितीच्या छायेत आहेत. मुरबाड तालुक्यातील धसई गावात एका सहा वर्षाच्या मुलीवर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला.

वाचा सविस्तर…

16:40 (IST) 14 Feb 2025

‘धर्मवीर आनंद दिघे’ चित्रपटातील बालकलाकार म्हणाला, “‘छावा’ चित्रपट….”

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती ‘धर्मवीर आनंद दिघे, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बालपणाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने राज्य सरकारकडे केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही डोळ्यात पाणी घेऊनच बाहेर पडाल असेही तो म्हणाला.

वाचा सविस्तर…

16:18 (IST) 14 Feb 2025

New India Cooperative Bank: “आता आम्ही EMI कसे भरायचे?”, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांचा संताप

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारावर आरबीआयने बंदी घातल्यानंतर, बँकेच्या ग्राहक सीमा वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही कालच पैसे जमा केले, पण त्यांनी याबाबत काहीही सांगितले नाही. त्यांनी आम्हाला या प्रकाराबद्दल सांगायला हवे होते. आता ते म्हणत आहेत की, आम्हाला आमचे पैसे ३ महिन्यांत मिळतील. आम्हाला ईएमआय भरायचे आहेत, आता त्याची सोय कशी करायची अशा प्रश्न आम्हाला पडला आहे.”

https://twitter.com/ANI/status/1890287090602254358

15:45 (IST) 14 Feb 2025

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चैाक, पुुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

वाचा सविस्तर…

15:40 (IST) 14 Feb 2025

“महाराष्ट्रातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करा”, अमित शहा यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत अमित शाह यांनी हे निर्देश दिले आहेत.

15:31 (IST) 14 Feb 2025

ठाण्यातील माजी नगरसेवक संजय भोईर यांचा मोबाईल हॅक; मोबाईल क्रमांकावरून ४५ हजार रूपयांची मागणी

ठाण्यातील बाळकुम भागातील प्रभावी राजकीय नेते माजी नगरसेवक संजय भोईर यांचा मोबाईल हॅक करून व्हॉट्सॲप खात्याद्वारे अनेकांकडे ४५ हजार रूपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.  सविस्तर वाचा…

14:36 (IST) 14 Feb 2025

डोंबिवलीतील निळजे आरोग्य केंद्रातील पाच कर्मचारी निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची कारवाई

डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यालगतच्या निळजे गाव हद्दीत ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातील पाच कर्मचारी विना परवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 14 Feb 2025

अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक संपन्न, नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा शाह यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसद भवन परिसरातील नॉर्थ ब्लॉक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवीन फौजदारी कायद्यांची महाराष्ट्रात कशा पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे याचा आढावा घेतला.

14:13 (IST) 14 Feb 2025

डोंबिवली अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा दुकानदार अटकेत

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील एका किराणा दुकानात चाॅकलेट खरेदीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीबरोबर ३८ वर्षाच्या दुकानदाराने अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी तात्काळ दुकानदाराला अटक केली.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 14 Feb 2025

कुलगुरूंचे व्हाॅट्सॲप खाते हॅक करून पैशांची मागणी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनवणे यांचे व्हॉट्सअप खाते हॅक झाले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्यासह विद्यापीठातील एका अधिकाऱ्यांचेही व्हॉट्सअप खाते हॅक झाले.

सविस्तर वाचा…

13:38 (IST) 14 Feb 2025

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर एकही प्रेमपट नाही

मुंबई : फेब्रुवारी महिना हा एकंदरीतच व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे अशा वेगवेगळ्या प्रेमाच्या संकल्पनांनी भारलेल्या दिवसांचा असतो. त्यामुळे एरव्ही प्रेमपटांमध्येच रमलेल्या बॉलिवूडसाठी हा खास महिना असतो. यंदा मात्र प्रेमीजनांना प्रेपपट पाहण्याऐवजी ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट किंवा ‘कॅप्टन अमेरिका : ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ हा सुपरहिरोपट पाहून व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार आहे.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 14 Feb 2025

डोंबिवलीत नैराश्यातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या

डोंबिवली : गरोदरपणात चार वेळा मुल मयत झाल्याने आलेल्या नैराश्यातून एका २९ वर्षाच्या महिलेने मंगळवारी आपल्या दावडी भागातील घरात छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 14 Feb 2025
New India Co-operative Bank: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त, खातेधारकांची गर्दी

कर्ज वाटपाच्या पद्धतींमध्ये अनियमितता असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मीरा रोड पूर्वेतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांची व्यवहार बंदी घातली आहे. RBI ने काल रात्री दिलेल्या या आदेशानंतर, शेकडो खातेदारांनी त्यांच्या खात्यांमधील पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेत गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने अधिकाऱ्यांना बँकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला.

https://twitter.com/ians_india/status/1890300453268984283

13:01 (IST) 14 Feb 2025

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘जिओहॉटस्टार’ची सुरुवात, नव्या वाहिनीवरील मनोरंजन प्रेक्षकांना विनाशुल्क उपलब्ध

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील समीकरणे पूर्णत: बदलून टाकणाऱ्या ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ या दोन मनोरंजन समूहांचे विलीनीकरण गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाले. मात्र या दोन्ही समूहांची एकत्रित मनोरंजन वा ओटीटी वाहिनी सुरू करण्यात आली नव्हती.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 14 Feb 2025

आरएसएसचे भय्याजी जोशी आणि छगन भुजबळ यांची एकमेकांवर स्तुतिसुमने

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) घुसमट होत असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यातच नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे राम मंदिराच्या जीर्णोध्दार सोहळ्यानिमित्त एकत्र आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जौशी आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.नांदूरमध्यमेश्वरचे राममंदिर पुरातन आहे.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 14 Feb 2025

मुलांना कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेचालकाचा विरोधात गुन्हा

कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या शहरातील रेव्हन्यू कॉलनीतील ‘द स्टीम रुम कॅफे’  चालकावर पोलीसांनी कारवाई करत ऋषीकेश रामदास ढवळे वय २३ वर्ष रा. ढवळगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर याचे विरूद गुन्हा दाखल केला आहे .

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 14 Feb 2025

‘ड्युप्लेक्स किडनी’ दुर्मीळ विकारावर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुरडीची मात!

ड्युप्लेक्स किडनी हा मूत्रपिंडाचा दुर्मीळ जन्मजात विकार असलेल्या आठ महिन्यांच्या मुलीवर आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 14 Feb 2025

चाकूने वार करून मित्राची हत्या

मुंबई : शेजारीच राहणाऱ्या मित्राने किरकोळ वादातून चाकूने वार करून ४१ वर्षीय व्यक्तीची निर्घूण हत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 14 Feb 2025

‘जीबीएस’ उद्रेकानंतर पिण्याच्या शुद्ध पाण्याबाबत सरकारला जाग! अखेर उचललं मोठं पाऊल

राज्यात पुण्यासह काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे अतिसाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

12:34 (IST) 14 Feb 2025

समाजमाध्यमांवर रेटींग, काॅमेंटच्या मोबदल्यात पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजांआड

ठाणे : एखादे हाॅटेल, रेस्टाॅरंटच्या सेवे विषयी गुगलवर चांगले रिव्ह्यू आणि काॅमेंट दिल्यास त्याबदल्यात पैसे देतो असे सांगून नागरिकांकडूनच पैसे उकळणाऱ्या एका टोळीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील कुर्ला भागात ही टोळी एका घरामधून हे फसवणूकीचे रॅकेट चालवित होती

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 14 Feb 2025

‘एपीके फाईल’ उघडताच ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चार लाख लंपास; सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांकडून गुन्हा

सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सविस्तर वाचा…

12:14 (IST) 14 Feb 2025

एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये आभार सभा

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानिमित्त राज्यभरात आभार दौरा करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी सहा वाजता त्यांची हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानावर आभार सभा होणार आहे. या निमित्ताने शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेशकर्त्यांचा ओघ आणखी वाढण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 14 Feb 2025
“घरगडी असते तर त्यांना आमदार, मंत्री केलं असतं का?” शिंदेंच्या टिकेला राऊतांचे प्रत्युत्तर

माजी आमदार राजन साळवी यांनी काल उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी एकनाथ शिंदें यांनी बाळासाहेबांनंतर सहकार्यांना घरगड्यांसारखी वागणूक देण्यात आली अशी टीका केली होती. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केलेल्या टीकेला, “ते घरगडी असते तर त्यांना आमदार, मंत्री केलं असतं का?”, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

12:00 (IST) 14 Feb 2025

बेकायदा रिक्षा चालकांविरूद्ध रिक्षा संघटनाच रस्त्यावर, वाहतूक पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात स्थानक परिसरात रिक्षांची संख्या वेगाने वाढत असून त्यात बेकायदा रिक्षाचालकांची भर पडते आहे. सर्वसामान्य प्रवाशांना याबाबत अधिक माहिती नसली तरी आता अधिकृत रिक्षाचालकांनीच बेकायदा फेरिवाल्यांविरूद्ध आंदोलनाचे हत्या उपसले आहे. रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांना जबाबदार धरत अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 14 Feb 2025

गोरेगावमधून पाच वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण, २४ तासांत कल्याणहून आरोपीला अटक

मुंबई : गोरेगाव येथून ५ वर्षांच्या चिमुरड्याचे अहरण करणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. आरोपीच्या ताब्यातून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून मुलाला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मूल नसल्यामुळे अपहरण केल्याचे आरोपीने सांगितले.

सविस्तर वाचा…