Mumbai Maharashtra News Updates, 13 September 2024: विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. इच्छुकांकडून तिकिटासाठी वरीष्ठांकडे विचारणा केली जाऊ लागली आहे. त्याचवेळी जागावाटपाच्या चर्चांसाठीही महायुती व महाविकास आघाडी यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधील फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक प्रचंड चुरशीची होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 13 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी…

12:05 (IST) 13 Sep 2024
गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईः चौकशीसाठी थांबविल्याचा राग आल्यामुळे  गस्तीवर असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना गोवंडी परिसरात गुरुवारी घडली. आरोपींनी पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:04 (IST) 13 Sep 2024
वसई येथील पाच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण: आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

मुंबई : एकाच गावात राहणाऱ्या ८ ते १३ वर्षे वयोगटातील पाच अल्पवयीन मुलींवर दोन वर्षांच्या कालावधीत अनेकदा लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५० वर्षांच्या आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरूवारी कायम केली. वसई येथील सत्र न्यायालयाने २९ मार्च २०१४ रोजी आरोपीला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या मुली आरोपीला मामा म्हणत.

सविस्तर वाचा

11:48 (IST) 13 Sep 2024
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी

बदलापूरः उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटींना मंजूरी दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 13 Sep 2024
अजित पवारांच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तूलातून गंमतीत गोळीबार; माजी नगरसेवकासह दोघांना अटक

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. विनोद जयवंत नढे असे माजी नगरसेवकाचे नाव असून त्यांच्यासह सचिन नढे याला देखील अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे हे पिस्तूल वापरतात.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 13 Sep 2024
Sharad Pawar on Arvind Kejriwal Bail: अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली – शरद पवारांची प्रतिक्रिया

https://x.com/PawarSpeaks/status/1834464795808149936

11:05 (IST) 13 Sep 2024
Yamini Jadhav on Burkha Distribution: यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माझी विधानसभा कॉसमोपॉलिटन आहे. सर्व धर्माचे लोक इथे राहतात. लोकप्रतिनिधीनं त्याच्या विभागातल्या लोकांना त्यांचा धर्म न पाहता काय हवं याचा विचार करायला हवा. लोकप्रतिनिधीनं स्वत:चा धर्म पुढे न करता माझ्या लोकांना काय हवं, याचा विचार करायला हवा. दिवाळीत आपण त्यांना भेटवस्तू देतो. मग त्या बहि‍णींना भेटवस्तू जाते आणि मुस्लीम भगिनींना काहीच भेट दिली जात नाही. याचा विचार आम्ही वर्षभर केला. सगळ्यांची माहिती घेतली आणि त्यानंतर हा बुरखावाटप केला आहे. मुस्लीम महिलांना नेहमी वापरात असणारी आणि जास्तीत जास्त प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बुरखा आहे. तो सन्मान आहे त्यांचा – यामिनी जाधव यांचं बुरखा वाटपावर स्पष्टीकरण

10:46 (IST) 13 Sep 2024
डोंबिवलीत विकासकाकडून जुनाट झाडांची कत्तल; उद्यान विभागाला लेखी खुलाशातून कबुली

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील श्री गजानन महाराज मंदिराजवळील एका मोकळ्या जागेतील जुनाट झाडे तोडल्याची कबुली लेखी खुलाशाद्वारे विघ्नहर्ता पार्कचे विकासक आशीष मुंडे यांनी उद्यान विभागाला दिली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानगीविना ही झाडे तोडली असून यामुळे उद्यान विभागाने विघ्नहर्ता पार्कचे विकासक मुंडे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

10:41 (IST) 13 Sep 2024
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…

वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०सप्टेंबर रोजी वर्धा दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सुक्ष्म व लघु मंत्रालयाच्या विश्वकर्मा योजनेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम होत आहे. यावेळी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश व साहित्याचे वाटप होईल. तशी पाहणी खात्याचे केंद्रीय सचिव करून गेले. योजनेतील २० हजार लाभार्थी देशभरातून यात सहभागी होणार.

सविस्तर वाचा

10:30 (IST) 13 Sep 2024
Shambhuraj Desai – Ambadas Danve Meet: ‘ती’ भेट अपघाताने झाली – शंभूराज देसाई

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अंबादास दानवेंशी झालेली भेट पूर्वनियोजित नसून अपघातानेच झाली, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी माध्यमांना दिली आहे. “अंबादास दानवे माझे जुने मित्र आहेत. आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं आहे. आज आमची भेट झाली. नेहमीप्रमाणे विचारपूस झाली. एवढंच झालं. बाकी काही नाही. आम्हाला दोघांनाही तिथे भेट होईल याची कल्पना नव्हती. आम्ही देवाच्या दर्शनाला आलो होतो. देवाच्या दारात राजकारण करू नये. त्यासाठी वेगवेगळी ठिकाणं आहेत”, असं ते म्हणाले.

10:29 (IST) 13 Sep 2024
Shambhuraj Desai – Ambadas Danve Meet: दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या नेत्यांची गळाभेट!

आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई व विधानपरिषद विरोधी पक्षनेते व ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची गळाभेट झाली. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

'लोकपोल'नं सर्व्हेच्या निष्कर्षांचे आकडे केले जाहीर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra News Live Today, 13 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर