Maharashtra News Live Updates : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर झालं. खातेवाटप करण्यास उशीर झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, अखेर खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदाचं वाटप कधी होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. यातच खातेवाटप जाहीर होताच महायुतीत पालकमंत्री पदावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्‍यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळतं? हे पाहणंही महत्वाचं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे ते आता काय भूमिका घेतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, परभणी हिंसाचार प्रकरणानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच पुण्यात वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत डंपरने तिघांना चिरडलं आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहूयात.

Live Updates

Maharashtra Political News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व घडामोडी एका क्लिकवर…

15:03 (IST) 23 Dec 2024

राहुल गांधी परभणीत दाखल, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेट घेतली

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे राज्यातील नेते देखील उपस्थित आहेत.

14:55 (IST) 23 Dec 2024

मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”

मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

14:45 (IST) 23 Dec 2024

समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…

गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 23 Dec 2024

मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा

पुणे : शहरात पादचाऱ्यांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. हडपसर भागात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने चोरट्यांना विरोध केला. तेव्हा दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 23 Dec 2024

रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष

अलिबाग : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा महायुतीत सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जावे यासाठी भाजपच्या आमदारांनाही विश्वासात घेण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

13:56 (IST) 23 Dec 2024

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…

नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात.

सविस्तर वाचा

13:47 (IST) 23 Dec 2024

भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यावर प्रतिक्रिया काय? असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचा हा पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू”, अशी एका वाक्यात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

12:36 (IST) 23 Dec 2024

डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

डोंबिवली : डोंबिवलीतील रिक्षांची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कल्याणमधील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तपासणी केली. या तपासणीत १२५ रिक्षा आरटीओच्या पथकाने तपासल्या. यामधील ४० हून रिक्षा चालकांवर नियमभंग प्रकरणी पाच हजारापासून ते वीस हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 23 Dec 2024

चुकीची पूररेषा हे त्यांचेच पाप, शिवसेनेच्या वामन म्हात्रेंचा आमदार किसन कथोरेंवर हल्लाबोल

बदलापूर : बदलापूर शहरातील चुकीच्या पूररेषेचे पाप त्यांचे आहे. त्यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला नसता तर चुकीची पूररेषा पडली नसती, असे सांगत आपण चष्मा खाली करणाऱ्या कोणालाही घाबरत नाही असा हल्लाबोल शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यावर केला.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 23 Dec 2024
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…

छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले, “मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर आमची चर्चा झाली. सामाजिक आणि राजकीय मुद्यांवरही चर्चा झाली. ते मला म्हणाले की, जो महायुतीला विजय मिळलेला आहे, त्यामध्ये ओबीसींचा देखील मोठा वाटा आहे. ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी असून ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं आहे”, असं भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले.

12:03 (IST) 23 Dec 2024

मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

मालेगाव-मनमाड रोडवरील घोडेगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्याचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 23 Dec 2024

चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी झाली. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 23 Dec 2024

भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. आम्हाला विश्वास आहे की ही कुठलीही राजकीय भेट नसावी. ही भेट फक्त राज्याच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर असेल. आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काय चर्चा केली? हे ते स्वत: थोड्यावेळाने पत्रकार परिषद घेऊन सांगतील असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे. मात्र, मला तरी असं वाटतं की छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट ही फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणीही भेटू शकतं. त्या अनुषंगानेच ही भेट असावी. पण या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? हे छगन भुजबळ हेच सांगू शकतील”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली.

12:02 (IST) 23 Dec 2024

Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

अवघ्या पाच वर्षांचा ‘छोटा दडीयल’ अतिशय देखणा आहे, त्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या दाढीसारख्या दिसणाऱ्या केसांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 23 Dec 2024

मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर

‘मीच पालकमंत्री’, असा दावा करत समजाकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पुढील काही दिवसात जमीन हडप करण्याचे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 23 Dec 2024

महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम

दर बारा वर्षाने प्रयागला पूर्ण कुंभ होत असतो. १२ पूर्णकुंभ म्हणजे ( दर १४४ वर्षांनी ) एक महाकुंभ ठरतो.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 23 Dec 2024

दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग)च्या अहवालामध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे नमूद करत अनेक गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 23 Dec 2024

मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले

पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रीकरण ताब्यात घेतले असून या चित्रीकरणाची पाहणी करून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 23 Dec 2024

दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची भिवंडीत कारवाई, भिवंडीतून आठ बांगलादेशी अटकेत

ठाणे : भिवंडी शहरात बांगलादेशींचे प्रमाण अधिक असून त्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. रविवारी दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ बांगलादेशींना ताब्यात घेऊन अटक केली. अटकेत असलेल्या बांगलादेशींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 23 Dec 2024

कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली

कल्याण : येथील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने शनिवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना कटघऱ्यामधील आरोपीने किरकोळ कारणावरून पायातील चप्पल भिरकावली.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 23 Dec 2024
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; भेटीत काय चर्चा होणार?

Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. यातच छगन भुजबळ यांनी अजित पवारांवरही नाराजी व्यक्त केली होती. तसेच जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. दरम्यान, आपण आपली पुढील भूमिका लवकरच घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

यानंतर आज छगन भुजबळ हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीत नेमकं काय ठरलं? याची माहिती समोर आलेली नाही.

10:43 (IST) 23 Dec 2024

उद्धव ठाकरे- राज ठाकरे एका लग्न सोहळ्यात एकत्र, संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र आले होते. त्यांवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत. ते कौटुंबिक समारंभासाठी एकत्र आले होते. याचे स्वागत करायला हवे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

https://platform.twitter.com/widgets.js
10:35 (IST) 23 Dec 2024

राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती घेतली आहे.