Maharashtra Politics LIVE Updates : अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत. तर वर्षा पाडणार, वर्षा बंगल्याच्या आवारात मंतरलेली शिंग या चर्चा म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून असणार आहे.
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंचं काय होणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम ताबडतोब सुरू करा; महसूल मंत्र्यांचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विशाळगडावरील व विशाळगडाच्या पायथ्याशी असणारे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.
पुस्तकांचे गाव’ उपक्रम आजपासून ३ दिवस बंद
सातारा : पुस्तकांचं गाव, भिलार (ता. महाबळेश्वर) येथे गावची जत्रा असल्याने ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत येथील ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम तात्पुरता बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली.
या काळात भिलारगावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (पुस्तक दालने) वाचक, पर्यटक आणि शालेय-महाविद्यालयीन सहलींना वाचनसेवा आणि पर्यटनविषयक सेवा देऊ शकणार नाहीत. ८ फेब्रुवारीपासून सर्व संबंधित सेवा पूर्ववत होतील. पुस्तकांच्या गावाला दररोज अनेक शालेय सहली, अभ्यासक, विद्यार्थी, लेखक भेट देत असतात. तरी या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून भिलार ग्रामपंचायत आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबईचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांच्याकडून हे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत आजपासून माणदेशी महोत्सव
सातारा : म्हसवड (ता. माण) येथील माणदेशी फाउंडेशनच्या वतीने मुंबई येथे माणदेशी महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू विक्रीसह अस्सल माणदेशी संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या माणदेशी महोत्सवाचे बुधवार ते रविवार (दि. ५ ते ९) आयोजन करण्यात आले आहे.
परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नरे पार्क येथे हा माणदेशी महोत्सव भरणार आहे. बुधवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याची माहिती येथील माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला बँकेच्या संस्थापक-अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.
साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
पोलिसांनी पीडितेच्या पायात कुलूपबंद साखळदंड आढळून आल्याचे सांगितले.
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आणि बारवी गुरूत्व वाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम गुरूवारी मध्यरात्रीपासून हाती घेतले जाणार आहे.
सविस्तर वाचा…
कृषी योजनांसाठी आता एकच ‘ॲप’, संकेतस्थळ; शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ सुलभपणे मिळतील
‘एक खिडकी योजने’च्या धर्तीवरील हे ‘ॲप’ आणि संकेतस्थळ शेतकऱ्यांना या विषयातील सर्व माहिती आणि उपयोग एकाच ठिकाणी मिळवून देण्याचे काम करेल.
मुंबई महानगरपालिका वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करणार
मुंबई : मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन वर्षांमध्ये विविध भागांमध्ये २५० ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आले आहेत. आता २०२५ मध्ये आणखी २५ ‘आपला दवाखाना’ आणि तीन फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
कोल्हापूर हद्दवाढीबद्दल दोन दिवसांत अहवाल द्या, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी नगरवासीय संघर्ष करीत असताना महापालिका प्रशासनाला त्याचे गांभीर्य उरलेले नाही. हद्द न वाढल्याने नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. महापालिका पायाभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे. यामुळे कोल्हापूर शहर हद्दवाढीचा अहवाल महापालिकेने दोन दिवसांत द्यावा; अन्यथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासमोर जबाब दो आंदोलन करू, असा इशारा शहर कृती समितीने महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी दिला.
कोल्हापूर शहर हद्दवाढ विषयावर महापालिकेत सहायक नगर रचनाकार विनय झगडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार, भाजपचे महेश जाधव, वकील बाबा इंदुलकर, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण आदींनी हद्दवाढ झाली नसल्याने महापालिका प्रशासन मूलभूत सुविधा देण्यास अकार्यक्षम ठरल्याचे निदर्शनास आणले. हद्दवाढ होणार नसेल तर नागरिकांनी महापालिकेचे कोणतेही कर भरू नका; अशी मोहीम राबवावी लागेल, असा इशाराही देण्यात आला.
जितेंद्र आव्हाडांची लेक खाडी परिसर बचावासाठी मैदानात, कचरा साफ करून खारफुटी पुनर्जिवित करण्याची मागणी
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडीकिनारी परिसरात अनधिकृत कचरा आगारामुळे खारफुटी नष्ट होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जिवित करण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
एका बंद बंगल्यामध्ये घरफोडी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गावकऱ्यांमुळे फसला. चोरी करण्यासाठी जीपमधून आलेल्या या टोळीला स्थानिक नागरिकांनी मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
सांगलीत हळदीला क्विंटलला २१ हजारांचा दर
सांगली : सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला मंगळवारी झालेल्या सौद्यात क्विंटलला २१ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. नव्या हंगामातील ३ हजार ८१३ पोती हळदीची आवक झाली असून सरासरी १५ हजार २०० रुपये दर मिळाला.
वाचा सविस्तर…
शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांचा ३०७ कोटीचा मोबदला रखडवला
डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांची ३०७ कोटी १७ लाखाची भरपाई शासनाने रखडवल्याने शिळफाटा रस्त्याच्या मानपाडा, काटई ते खिडकाळीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमिनी देण्यास विरोध केला आहे.
शिवरायांची ‘वाघनखे’ बघायची असतील तर नागपूरला चला
नागपूर : नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात येत्या ७ फेब्रुवारीपासून शिवशस्त्र व शौर्य गाथा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय लंडन येथून भारतात आणलेली वाघनखे हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने अस्वस्थता
अमरावती : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरून याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका होत नसल्याने नागरिकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, यावर आवाज उठवायला लोकप्रतिनिधीच नाहीत. निवडणुका लांबल्याने इच्छूकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे.
वाचा सविस्तर…
सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे.
हत्येप्रकरणी धुळे जिल्ह्यातील सहा जणांना जन्मठेप
नाशिक : मागील भांडणाच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सहा जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. साक्री तालुक्यातील शिरवाडे (देश) येथे ही हत्या झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांच्या विरोधात सावंतवाडीत जोडे मारून निषेध
सावंतवाडी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद तळकोकणात देखील उमटले आहेत. सावंतवाडी येथे श्री. सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हिंदुस्तानात राहायचं असेल तर शिवरायांचा आदर राखावा लागेल. अन्यथा, त्यांनी पाकिस्तानात जावं. भले आता माफी मागितली असली तरी त्यांना सोडणार नाही. आज बॅनरवर तुडवलं, उद्या प्रत्यक्षही तुडवू असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला. उपस्थित शिवभक्तांनी श्री. सोलापूरकर यांच्या विधानाचा संतप्त प्रतिक्रिया देत निषेध नोंदविला. यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, तानाजी पाटील, बंटी माटेकर, अमित वेंगुर्लेकर, उमेश खटावकर, मनोज घाटकर, अवधूत सावंत, गणेश सूर्यवंशी, रामा वाडकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते.
‘मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा’ यंदाच्या स्वागत यात्रेची टॅगलाईन
ठाणे शहरात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने मराठी नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेला ‘मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा’अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. तसेच यंदाच्या यात्रेत लेझीम पथक आणि अहिल्यादेवी होळकर यांचा चरित्र रथ नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
दुचाकी-मोटार अपघातात विट्याजवळ पोलीस ठार
सांगली : दुचाकी व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात महिला पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना विट्याजवळ बलवडी फाटा येथे मंगळवारी सकाळी घडली.
तुरची (ता. तासगाव) पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रितंका पोटे (वय ३२ रा. देवराष्ट्रे) या महिला पोलीस प्रशिक्षक दुचाकीवरून देवराष्ट्रे येथून तुरचीला निघाल्या असता मोटारीने बलवडी फाटा येथे धडक दिली. अपघातात श्रीमती पोटे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानही झाले आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे.
शिळफाटा मार्गानंतर मुंब्रा बायपास ठरला नवी डोकेदुखी, तेलाचे बॅरेल फुटल्याने तीन तास झाली होती वाहतूक कोंडी
निळजे रेल्वेपूलाच्या कामामुळे शिळफाटा मार्गावर कोंडी झाली असल्याने कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावर बुधवारी सकाळी ट्रक उलटून या मार्गावर तेलाचे बॅरेल फुटले.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यासह महापालिकेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
Shilphata Traffic : शिळफाटा रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी, डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली
डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत.
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
चोरांनी दुकानाचे मालक महेंद्रसिंह संघवी यांना मारहाण करून दुकानातील सोने लुटून नेले होते. या दरोड्यात एकूण ९५० ग्रॅम सोने लुटण्यात आले होते अशी तक्रार फिर्यीद संघवी यांनी दिली होती.
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
२०२४ या वर्षात ववसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० प्रवाशांचा तर पालघरच्या हद्दीत २३ जणांचा ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. तर १२८ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण, सिडको एन-४ मधील रात्री नऊची घटना…
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या सातवर्षीय मुलाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले. ही घटना शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मध्ये घडली.
पिंपरीत २० फेब्रुवारीपासून नालेसफाई; महापालिका आयुक्तांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश
पिंपरी : शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे यंदा महापालिका प्रशासनाने नालेसफाईचे काम लवकर सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी २२ मार्चपासून नालेसफाई सुरू केली होती. यंदा २० फेब्रुवारीपासूनच नालेसफाईचे काम हाती घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
एमपीएससी प्रकरणातील फरार युवक कोतवाल भरती प्रकरणातील एजंट…
भंडारा : एमपीएससी पूर्व परीक्षेतील पेपरफूट अफवा प्रकरणातील वरठी ( जि. भंडारा )येथील योगेश वाघमारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले तर प्रदीप कुलपे आणि आशीष कुलपे हे दोघे भाऊ फरार आहेत. त्यापैकी एकाचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या कोतवाल भरती प्रकरणातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
Pune Crime Updates: मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने पिंपरीत युवकाचा खून, तिघेजण अटकेत
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
बदलापुरातील पथविक्रेत्यांची यादी अखेर जाहीर, पथविक्रेता समितीच्या निवडीनंतर फेरिवाला क्षेत्रही घोषीत होणार
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पथविक्रेत्यांची अधिकृत यादी अखेर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरातील अधिकृत ९९२ पथविक्रेत्यांचा या यादीत समावेश आहे.
अंजली दमानिया,धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत.