Maharashtra Politics LIVE Updates : अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत. तर वर्षा पाडणार, वर्षा बंगल्याच्या आवारात मंतरलेली शिंग या चर्चा म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून असणार आहे.
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंचं काय होणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला.
शीळफाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी मंगळवार रात्री बारा वाजल्यापासून शिळफाटा रस्त्याचा पलावा चौक भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने रात्रीपासून शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व कोंडीला सुरूवात झाली. बुधवारी सकाळी शिळफाटा रस्त्यावर ३० मिनिटाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत. काही प्रवाशांनी पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते अरूंद असल्याने या रस्त्यावर वाहनांचा लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पुण्यातील खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर! आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल
नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून एक महिन्याचा कालावधी सुधारणा करण्यासाठी देण्यात आला आहे.
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध
मुंबई : झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक झोपड्यांवर मालमत्ता कर आकारण्याच्या आणि घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी कडाडून विरोध केला आहे.
वाचा सविस्तर…
पुणे: ग्राहकाकडून भाजी विक्रेत्यावर चाकूने वार, खडकी भाजी मंडईतील घटना
शौकत बाबामियाँ यांचा खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत भाजी विक्री व्यवसाय आहे. आरोपी मनोज स्वामी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाजी खरेदीसाठी आला होता.
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
सद्यस्थितीतील सेवा रस्त्यांची दयनीय अवस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या आणि यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत अनेक प्रवासी आणि व्यवसायिकांनी वेळोवेळी तक्रारी येत होत्या.
पुण्यातील ‘जीबीएस’ रुग्णांच्या घरातील पाण्याच्या तपासणीतून धक्कादायक निष्कर्ष
आतापर्यंत जीबीएसमुळे राज्यभरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे ५२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
Shilphata Traffic : शिळफाटा रस्त्यावर ३० मिनिटांच्या प्रवासाला २ तास
निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी मंगळवार रात्री बारा वाजल्यापासून शिळफाटा रस्त्याचा पलावा चौक भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने रात्रीपासून शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व कोंडीला सुरूवात झाली.
ठाण्यात पीओपी गणेश मुर्तींना बंदी, ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून यामध्ये पालिका क्षेत्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मुर्तींच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी प्रभावी लोकशिक्षणासाठी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी येथे झालेल्या अंनिसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांना समुपदेशकांकडून ताणतणाव व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन घेता येणार आहे.
रास्ता पेठेच्या पुनर्विकासाच्या अभ्यास प्रकल्पाचा गौरव… राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार!
पुणे : वास्तुरचना शास्त्रात देशातील शिखर संस्था असणाऱ्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या अर्बन स्टुडिओ रीसर्च प्रोजेक्ट (यूएसआरपी) या स्पर्धेत डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींना तातडीच्या मदतीची मागणी
सांगली : शिराळा तालुक्यातील सागाव येथील नथुराम पाटील बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने करण्यात आली.
सागाव येथील वराळकीचा ओढा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी वन विभागाने तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच वराळकीचा ओढा परिसरात बिबट्याचा वावर असून अनेक वेळा पाळीव प्राण्यावर त्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अंजली दमानिया,धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत.