Maharashtra News Today, 22 March 2023 : यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा करोनाआधीच्या वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा उत्साहात काढल्या जात आहेत. ठाण्यातील शोभायात्रेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. तसेच नागपूरमध्ये अनेक ठिकाणी शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या शोभायात्रेत हजेरी लावली. याशिवाय आज रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यासंबंधित बातम्यांवरही आपली नजर असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Updates : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त CM शिंदेंनी दिल्या राज्यातील जनतेला शुभेच्छा, म्हणाले…
पेट्रोल व धावणाऱ्या वाहनामुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने त्याला पर्यावरणपूरक इंधनाचा (ग्रीन फ्युअल) पर्याय देत २०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणार, असा संकल्प केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सी-२०’ परिषदेच्या समारोप प्रसंगी केला व हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘सी-२०’ परिषदेतील मंथनाचा उपयोग होईल, असे गडकरी म्हणाले.
पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर त्यांचा पाहिलाच गुढीपाडवा हा सण आहे.हा सण त्यांनी कुटुंबीयासोबत आज साजरा केला असून त्यानंतर रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणारे निकाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधरच्या निवडणुकीत लागले आहेत.
जाती धर्माचे बंधन झुगारून देत होणाऱ्या विवाहाला कुटुंबाचा क्रोध व समाजाचा रोष सहन करावा लागण्याच्या घटना नेहमीच्याच. मात्र, अशा युगुलास हिंमत देत त्यांचा ‘सत्यशोधकी’ विवाह लावून देण्याचा उपक्रम स्तूत्य ठरत आहे.सेवाग्राम येथील सागर चौधरी व नागपूर जिल्ह्यातल्या जामठा येथील श्वेता ढगे यांचे प्रेम जुळले.
गेल्या दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणेच गुढी पाडव्यावर आणि मुंबई-उपनगरांत निघणाऱ्या शोभायात्रांवर करोनाचं सावट होतं. त्यामुळे सण साजरे करण्यावर मर्यादा होत्या. गेल्या वर्षी करोनाचं संकट ओसरल्यानंतर निर्बंध काढून टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा करोनाआधीच्या वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा उत्साहात काढल्या जात आहेत. ठाण्यातील शोभायात्रेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा आनंद दुणावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. सविस्तर वाचा
मी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो, असा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिल्या.