Maharashtra Breaking News : राज्यात दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या जातील असे संकेत निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिले असले तरीही प्रत्यक्षात डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये या सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्या असल्याचंही बोललं जातंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. मात्र, या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाखो बहिणींच्या खात्यावर पैसेही जमा करण्यात आले आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडी एका क्लिकवर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकासात मिळणारी घरे नातेवाईकाच्या नावे वा विहित मुदतीनंतर विक्री केल्यानंतर हस्तांतरणासाठी आता रहिवाशांना प्राधिकरणात खेटे घालण्याची वा दलालांची मदत घेण्याची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया प्राधिकरणाने ॲानलाईन उपलब्ध करून दिली आहे. सर्व कागदपत्रे सादर झाल्यानंतर हस्तांतरणही ॲानलाईनच होणार आहे.
बदलापूर: बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे.
पुणे : कृषि विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १ हजार १८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
“भारतीय जनता पक्षाचेच पदाधिकारी माझ्यापाशी येऊन सांगत आहेत की आमचीच फसगत झाली आहे. आम्ही समाजाचेही राहिलो नाहीत आणि पक्षाचेही राहिलो नाहीत, असं सांगत आहेत. ते तुमच्याबरोबर नाईलाजाने राहिले आहेत. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा फटका तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत बसणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांची १३ लाख ७४ हजार फसवणूक केली.याबाबत कोथरुड भागात राहणाऱ्या एका ५३ वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वसई- रक्षाबंधनासाठी भावाला भेटायला निघालेल्या महिला आणि तिच्या पतीचे दुचाकीच्या अपघातात निधन झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. नंतर त्याला मांडवी पोलिसांनी अटक केली.
मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) विविध 66अभ्यासक्रमासह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यापाठोपाठ आता पाच पदव्युत्तर वैद्यकीयय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचेय वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी १ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठी २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे.
पुणे : सदाशिव पेठेतील एका सोसायटीतील दोन सदनिकांमधून चोरट्यांनी १८ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.याबत दीपक ज्ञानेंद्र शहा (वय ४३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी बांधली धनंजय मुंडे यांना राखी
आज मुंबईत माझ्या भगिनी आ.पंकजाताई, डॉ.प्रीतमताई, ऍड.येशूताई यांनी राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. तिघींनाही रक्षाबंधनच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या…@Pankajamunde @DrPritamMunde pic.twitter.com/UbT3nZCM6I
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2024
अजित दादा आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हजारो बहिणी त्यांच्या स्वागताची वाट पाहत आहेत. मी स्थानिक आमदार असून उपमुख्यमंत्री आहेत. आणि मला गर्व आहे की ते माझ्या मतदारसंघात येत आहेत. मला काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलावलं नव्हतं. पण आज अजितदादा आले आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.
#WATCH | Congress MLA Zeeshan Siddique says, "Ajit Dada is our Deputy CM and thousands of sisters are waiting to tie Rakhi to him…I am very happy that he has come to my electoral constituency…" pic.twitter.com/1ITYykk1DA
— ANI (@ANI) August 19, 2024
चंद्रपूर : राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणजे, आमच्या बाजूचा म्हणजे विरोधकांचा मुख्यमंत्री असतो. विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार धाडसी आहेत, त्यांना सर्वांना घेऊन चालण्याची कला अवगत आहे या शब्दात, खासदार प्रणिती शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली.
नागपूर : परिवहन खात्यात २३ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा वाद सुरू आहे. आता अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर (बागडी) यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी बनावट कागदपत्राचा वापर केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे वर्धेकरांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले आहे.
नागपूर: अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीनंतर प्रथम सोने- चांदीच्या दरात मोठी घट झाली. परंतु त्यानंतर दर वाढले, परंतु त्यानंतर पुन्हा दर घसरले. दरम्यान हल्ली सातत्याने सोने- चांदीच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यानंतर प्रथमच सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७२ हजारावर पोहचले आहे.
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी भागात घडली. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
जनतेची दिशाभूल करून महिलांचा सरकारवरील विश्वास उडाला पाहिजे, हे एक षडयंत्र असल्याचे सांगत पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.
Mahabaleshwar : महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेला एकजण पाय घसरून सावित्री नदीत पडला. त्याला वाचविताना अन्य दोघे पाण्यात पडले. तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमधील सख्खे भाऊ विवाहित होते.
Ramdas Kadam criticizes BJP : दापोलीमधील भाजपची मंडळी राक्षसी महत्त्वकांक्षा घेऊन पुढे येत आहेत. २०१९ मध्ये युती असतानाही योगेश कदम यांना त्यांनी मतदान केले नाही. प्रत्येकवेळी योगेश कदम यांना बदनाम करून अडचणीत आणण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला.
पुणे : सासरच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली भागात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नागपूर: दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे दिलासा मिळाला. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि तितकाच दमदार पाऊस यामुळे काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांर वर्गाची चांगलीच गैरसोय झाली.
कोल्हापूर : नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या तापत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने दिला आहे. अजित पवार यांनी या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. तशी निःसंदिग्ध स्पष्टोक्ती मुख्यमंत्री शिंदे यांनीही द्यावी, असा आंदोलकांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या भूमिकांमध्ये फरक असल्याचेही निदर्शक निदर्शनास आणून देत आहेत.
Ramdas Kadam : मुंबई गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजिनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्षाची अद्याप स्थापना झाली नसून लवकरच पक्षाची नोंदणी करून पक्षांतर्गत १० जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. पक्षाच्या माध्यमातून ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडणार आहेत, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना रुग्णालयापर्यंत पाेहचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी १०८ रुग्णवाहिका नागरिकांसाठी वरदान ठरली आहे. या रुग्णवाहिकेची सेवा अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुढील वर्षात ‘१०८ हवाई रुग्णवाहिका सेवा’ सुरू करण्याचे नियोजन आहे.
rickshaw driver beaten with stone : रस्त्यामधून चालणाऱ्या पादचाऱ्यांना दूर करण्यासाठी शनिवारी रात्री साडे बारा वाजता ठाकुर्ली भागात राहत असलेल्या एका रिक्षा चालकाने ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाच्या भागातील रस्त्यावरून जात असताना भोंगा वाजविला. त्याचा राग एका पादचाऱ्याला आला. त्याने रिक्षा चालकाला भोंगा का वाजविला, असा प्रश्न करून बाजूला पडलेला एक मोठा दगड रिक्षा चाकाच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.
Sanjay Raut : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.
चंद्रपूर : मुल शहराला लागून असलेल्या जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला असता गुराखी मूनिम गुरलावर (४५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचे हल्ले वाढले असल्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागपूर : करण अपार्टमेंट नवाबपुरा येथे शेंडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. घरी दत्तात्रय हे त्यांचा मोठा मुलगा प्रणव (३५), लहान मुलगा कुशल ऊर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य ऊर्फ गणू अनिल शेंडे (२३) यांच्यासोबत राहतात.
नागपूर : पवार गट, ठाकरे गट राज्यातील विविध मतदार संघातील जागांवर दावा करत असेल तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालाही अनेक जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. जिसके घर शीशे के होते है, वह दुसरोंके घरोपर पत्थर नही फेका करते, अशी टीका करत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले.
पुणे : जगभरात मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. आफ्रिकेतील देशांसह पाकिस्तानमध्येही हा संसर्ग पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. देशात अनेक राज्यांत आफ्रिकेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे काही राज्यांनी आपापल्या आरोग्य यंत्रणांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राने मात्र केंद्राकडून मार्गदर्शक सूचना नसल्याने त्या काढता येत नसल्याचे तांत्रिक कारण समोर केले आहे.
kalyan crime news : कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या इमारतीत एका महिलेच्या आठ वर्षाच्या मुलीचा दोन वेळा विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पीडित मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यानंतर आरोपी व्यक्तीला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.