Maharashtra Politics LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकले. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून घेणार आहोत.

Live Updates

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

14:50 (IST) 6 Feb 2025

नववर्षात सोन्याचे दर सूसाट…सराफा व्यवसायिक आणि ग्राहकांमध्ये…

नागपूर : नागपूरसह देशभरात सोन्याचे दर नियंत्रण येत नाही. नववर्षात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून प्रत्येक दोन- तीन दिवसांत नवीन उच्चांकीवर दर आलेले दिसतात. सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराने दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतांनाच दरवाढीने विक्रीवर परिणामाचा धोका असल्याने सराफा व्यवसायिकांना चिंता लागली आहे.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 6 Feb 2025

अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार

नागपूर : राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची १५१ तर मदतनीसची ४१६ पदे रिक्त आहेत.

वाचा सविस्तर...

14:36 (IST) 6 Feb 2025

अक्षय शिंदेप्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी.

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांच्या पालकांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने शिंदे याच्या पालकांच्या मागणीची दखल घेतली.

सविस्तर वाचा...

14:30 (IST) 6 Feb 2025

दहावी व बारावीच्या परीक्षांमधील कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली

अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून अनेक काॅपी बहद्दर हे परीक्षा केंद्रावर येत असल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 6 Feb 2025

ठाणे जिल्हापरिषदेची ‘स्मार्ट’ वाटचाल, विविध योजना आणि कामांसाठी ॲप्लिकेशनची निर्मिती

ठाणे जिल्हा परिषदेने ‘आदर्श आपले सरकार केंद्र’ असे घरपोच दाखल्यांची सुविधा देणारे ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 6 Feb 2025

एलआयसीच्या ६८ इमारती अतिधोकादायक, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या संरचनात्मक तपासणी अहवालातून स्पष्ट

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात आलेल्या स्थापत्यविषयक लेखापरीक्षण अहवालातून स्पष्ट झाले.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 6 Feb 2025

सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक; गुन्हा दाखल न करण्यासाठी…

नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

वाचा सविस्तर...

13:29 (IST) 6 Feb 2025

“वाल्मीक कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो” म्हणत तरुणाला मारहाण, बीडच्या धारूरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराड व धनंजय मुंडेंविरोधातील बातम्या, चित्रफिती का पाहतो, असे विचारत एका तरुणाला दोघांनी कोयता व लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण अशोक शंकर मोहिते याला सुरुवातीला अंबाजोगाई व त्यानंतर लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

13:25 (IST) 6 Feb 2025
कार्यक्रम पोलिसांचा आहे, उचलायला लावेल; अजितदादांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम

पिंपरी : कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले.

वाचा सविस्तर...

13:09 (IST) 6 Feb 2025

वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला परस्पर वळवला; आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फसवणूक, गुन्हा दाखल

दहा जणांचे एकूण ७४ लाख ५० हजार रूपये वळवण्यात आले असून याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 6 Feb 2025

Shilphata Traffic : शिळफाट्याचा सर्वांनीच घेतला आहे धसका, प्रवाशांची पर्यायी रस्त्याला पसंती, नोकरदार वर्गाचे WFH

शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा धसका घेऊन डोंबिवलीतील प्रवाशांनी माणकोली पूल मार्गे, कल्याणमधील प्रवाशांनी दुर्गाडी पूल, भिवंडी बाह्यवळण रस्तामार्गे इच्छित स्थळी जाणे पसंत केले.

वाचा सविस्तर...

12:51 (IST) 6 Feb 2025
"मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं?" विजय वडेट्टीवारांचा सवाल

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं?", असा थेट सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
12:50 (IST) 6 Feb 2025

पुणे : धनकवडीत तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण शिवतरे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धनकवडीत मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता.

सविस्तर वाचा...

12:49 (IST) 6 Feb 2025

उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…

नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाची सीमा वाढल्यामुळे शहरात गरोबा मैदान या नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील ३६ वे पोलीस ठाणे असून लकडगंज आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीला विभागून नवीन पोलीस ठाण्याची सीमा ठरविण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

12:49 (IST) 6 Feb 2025

अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू

सांगली : अपघातात ठार झालेल्या महिला पोलिसाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून घरी परतत असताना एका पोलिसाचा मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हा पोलीस कर्मचारी कार्यरत होता.

वाचा सविस्तर...

12:49 (IST) 6 Feb 2025

कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके

अमरावती : यंदा देखील उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागणार आहे. जिल्हापरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सध्या टंचाई निर्मुलन आराखड्याची तयारी सुरू असून यंदा मेळघाटातील जवळपास ६० गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. अद्यापही काही तालुक्यांची मागणी येणे बाकी आहे.

वाचा सविस्तर...

12:39 (IST) 6 Feb 2025

पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९९७ ते २००० पर्यंत ३५३ कामगारांची सफाई कामासाठी नियुक्ती केली. मात्र या सर्वच कामगारांना महापालिकेने कामगार म्हणून नियुक्ती न देता ठेकेदार म्हणून नियुक्ती दिली.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 6 Feb 2025

पुणे : खर्च महापालिकेचा, नियंत्रण पोलिसांना का हवे? नक्की काय आहे प्रकार

स्मार्ट सिटी मोहिमेंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत सिग्नल नियंत्रणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 6 Feb 2025

सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…

गेल्या काही वर्षांत पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे दिसून येत आहे. पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असल्याने घरांना मागणी वाढली आहे. याचवेळी सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका संपूर्ण गृहनिर्माण क्षेत्राला बसल्याची बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर...

12:15 (IST) 6 Feb 2025

दुय्यम निबंधक कार्यालयांचा कायापालट, काय होती कारणे?

दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री, बक्षीसपत्र आणि अन्य व्यवहारांसाठी नागरिकांना हजर राहावे लागते.

सविस्तर वाचा...

12:01 (IST) 6 Feb 2025

कर्जत – भिवपुरी येथील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत, कर्जतहून येणाऱ्या काही लोकल रद्द

मुंबईकडे जाण्यासाठी कर्जतहून अनेक जलद रेल्वे गाड्या धावतात. कर्जत पासून बदलापूर पर्यंत अनेक प्रवासी या रेल्वे गाड्यांवर अवलंबून असतात.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 6 Feb 2025

"महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा" - संजय राऊत

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापलेले असताना, संजय राऊत यांनी आरएसएसवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, "...हा संघाचा अजेंडा आहे. महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा आहे. कधी सावरकर कधी गांधींवर घसरतील. आतातर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर घसरत आहेत. सरकार काय करतंय? या सरकारने खरंतर चिरडून मरावं अशी परिस्थिती आहे".

11:54 (IST) 6 Feb 2025

पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच! आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १६२ रुग्ण आहेत. पुणे महापालिकेने ५४ हजार ३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९ हजार २३२ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार ८९ अशा एकूण ७७ हजार ३५५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

11:43 (IST) 6 Feb 2025

ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा

ठाणे : पावसाळा सुरू होण्याच्या चार महिने आधीपासूनच ठाणे महापालिकेने विशेष खबरदारी घेत शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पाऊले उचलली असून यासाठी शहरातील ९६ अतिधोकादायकपैकी नागरिक राहत असलेल्या २६ अतिधोकादायक इमारतींना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे.

वाचा सविस्तर...

11:41 (IST) 6 Feb 2025

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

11:31 (IST) 6 Feb 2025

नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा

ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:18 (IST) 6 Feb 2025

मंडळाच्या परीक्षेवेळी झेरॉक्स दुकानास ठोकणार कुलूप, आता शासकीय स्टाफ पण दिमतीस

वर्धा : यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण मंडळ व शासन विशेष सतर्क झाले आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा चंग आहे. म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सूरू आहे. परीक्षा केंद्रावरील केंद्राचालक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचारी यांची अदालबदल करण्याचा निर्णय शिक्षक संघटनानी विरोध केल्याने मागे घेण्यात आला.

वाचा सविस्तर...

11:15 (IST) 6 Feb 2025

पिस्तुल आणि मेफेड्रोनसह गोरेगाव येथून संशयीताला अटक

मुंबईः पिस्तुल, जिवंत काडतुसे व मेफेड्रोन या अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे.

वाचा सविस्तर...

11:14 (IST) 6 Feb 2025

पिंपरी :…तर २२१ कोटी रुपयांच्या ४३ मालमत्ता महापालिकेकडे जमा होणार, वाचा काय आहे प्रकरण?

तिसऱ्या लिलावात मालक अथवा मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क न साधल्यास या मालमत्ता नाममात्र बाेलीवर महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:13 (IST) 6 Feb 2025
दूषित चंद्रभागेमुळे पंढरीत भाविकांचे हाल; शेवाळ, घाणीचे साम्राज्य

इथे येणारा भाविक स्नानाला आला की नदीची पूजा करून नारळ, फूल, ओटी भरतो. फाटके कपडे पाण्यात टाकून जातो.

सविस्तर वाचा...

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader