Maharashtra Politics Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकले. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून घेणार आहोत.

Live Updates

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:49 (IST) 6 Feb 2025

अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू

सांगली : अपघातात ठार झालेल्या महिला पोलिसाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून घरी परतत असताना एका पोलिसाचा मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हा पोलीस कर्मचारी कार्यरत होता.

वाचा सविस्तर…

12:49 (IST) 6 Feb 2025

कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके

अमरावती : यंदा देखील उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागणार आहे. जिल्हापरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सध्या टंचाई निर्मुलन आराखड्याची तयारी सुरू असून यंदा मेळघाटातील जवळपास ६० गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. अद्यापही काही तालुक्यांची मागणी येणे बाकी आहे.

वाचा सविस्तर…

12:39 (IST) 6 Feb 2025

पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९९७ ते २००० पर्यंत ३५३ कामगारांची सफाई कामासाठी नियुक्ती केली. मात्र या सर्वच कामगारांना महापालिकेने कामगार म्हणून नियुक्ती न देता ठेकेदार म्हणून नियुक्ती दिली.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 6 Feb 2025

पुणे : खर्च महापालिकेचा, नियंत्रण पोलिसांना का हवे? नक्की काय आहे प्रकार

स्मार्ट सिटी मोहिमेंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत सिग्नल नियंत्रणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 6 Feb 2025

सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…

गेल्या काही वर्षांत पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे दिसून येत आहे. पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असल्याने घरांना मागणी वाढली आहे. याचवेळी सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका संपूर्ण गृहनिर्माण क्षेत्राला बसल्याची बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

12:15 (IST) 6 Feb 2025

दुय्यम निबंधक कार्यालयांचा कायापालट, काय होती कारणे?

दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री, बक्षीसपत्र आणि अन्य व्यवहारांसाठी नागरिकांना हजर राहावे लागते.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 6 Feb 2025

कर्जत – भिवपुरी येथील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत, कर्जतहून येणाऱ्या काही लोकल रद्द

मुंबईकडे जाण्यासाठी कर्जतहून अनेक जलद रेल्वे गाड्या धावतात. कर्जत पासून बदलापूर पर्यंत अनेक प्रवासी या रेल्वे गाड्यांवर अवलंबून असतात.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 6 Feb 2025

“महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा” – संजय राऊत

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापलेले असताना, संजय राऊत यांनी आरएसएसवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, “…हा संघाचा अजेंडा आहे. महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा आहे. कधी सावरकर कधी गांधींवर घसरतील. आतातर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर घसरत आहेत. सरकार काय करतंय? या सरकारने खरंतर चिरडून मरावं अशी परिस्थिती आहे”.

11:54 (IST) 6 Feb 2025

पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच! आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १६२ रुग्ण आहेत. पुणे महापालिकेने ५४ हजार ३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९ हजार २३२ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार ८९ अशा एकूण ७७ हजार ३५५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

11:43 (IST) 6 Feb 2025

ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा

ठाणे : पावसाळा सुरू होण्याच्या चार महिने आधीपासूनच ठाणे महापालिकेने विशेष खबरदारी घेत शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पाऊले उचलली असून यासाठी शहरातील ९६ अतिधोकादायकपैकी नागरिक राहत असलेल्या २६ अतिधोकादायक इमारतींना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे.

वाचा सविस्तर…

11:41 (IST) 6 Feb 2025

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 6 Feb 2025

नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा

ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 6 Feb 2025

मंडळाच्या परीक्षेवेळी झेरॉक्स दुकानास ठोकणार कुलूप, आता शासकीय स्टाफ पण दिमतीस

वर्धा : यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षण मंडळ व शासन विशेष सतर्क झाले आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा चंग आहे. म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सूरू आहे. परीक्षा केंद्रावरील केंद्राचालक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचारी यांची अदालबदल करण्याचा निर्णय शिक्षक संघटनानी विरोध केल्याने मागे घेण्यात आला.

वाचा सविस्तर…

11:15 (IST) 6 Feb 2025

पिस्तुल आणि मेफेड्रोनसह गोरेगाव येथून संशयीताला अटक

मुंबईः पिस्तुल, जिवंत काडतुसे व मेफेड्रोन या अमलीपदार्थासह २७ वर्षीय संशयिताला अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे.

वाचा सविस्तर…

11:14 (IST) 6 Feb 2025

पिंपरी :…तर २२१ कोटी रुपयांच्या ४३ मालमत्ता महापालिकेकडे जमा होणार, वाचा काय आहे प्रकरण?

तिसऱ्या लिलावात मालक अथवा मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क न साधल्यास या मालमत्ता नाममात्र बाेलीवर महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 6 Feb 2025
दूषित चंद्रभागेमुळे पंढरीत भाविकांचे हाल; शेवाळ, घाणीचे साम्राज्य

इथे येणारा भाविक स्नानाला आला की नदीची पूजा करून नारळ, फूल, ओटी भरतो. फाटके कपडे पाण्यात टाकून जातो.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 6 Feb 2025

“देशातील ११ कोटी जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाहीत”, डॉ. अभय बंग यांची खंत

डॉ. माशेलकर म्हणाले. आजच्या काळात सर्वांनीच समाजकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी तरूणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 6 Feb 2025

पैठणच्या अर्थकारणाला ज्ञानेश्वर उद्यानामुळे संजीवनी, दररोज हजार पर्यटक

१४७ कोटी रुपये विशेष निधीचा प्रस्ताव असून, त्याअंतर्गत सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून २७ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 6 Feb 2025

पुणे : अवजड वाहनांना शहरात २४ तास बंदी

गंभीर अपघात रोखणे, तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 6 Feb 2025

मागेल त्याला सौर कृषी पंप; ‘महावितरण’चे १०० दिवसांचे उद्दिष्ट ६० दिवसांत पूर्ण

‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 6 Feb 2025

आठवड्याची मुलाखत : ‘सूर्यनमस्कार हे व्रतासारखे; त्यात सातत्य महत्त्वाचे’

स्वत: आयुष्यभर सातत्याने सूर्यनमस्कार घालणारे आणि त्यासाठी इतरांना प्रोत्साहित करणारे डाॅ. अरुण दातार यांच्याशी या दिनानिमित्त श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 6 Feb 2025

पिंपरी-चिंचवडसाठी महायुतीत चुरस

आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याकडे आहे. पवार यांनी पुन्हा शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 6 Feb 2025

पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्पावर नियंत्रण कोणाचे? अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेने जबाबदारी नाकारली

पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आहेत. एकाचा मृत्यूही झाला आहे. हा आजार दूषित पाण्याने हाेत असल्याची शक्यता गृहीत धरून शुद्ध आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 6 Feb 2025

महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 6 Feb 2025

मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई

हा रस्ता सिताराम मिल महापालिका शाळेकडे जात असल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना आणि पादचाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 6 Feb 2025

लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा

पुण्यातील लवासाप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार कुटुंबियाविरोधात सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेतून जाधव यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 6 Feb 2025

मजुराच्या खांद्यातून सळई आरपार, एरंडवणे भागात दुर्घटना; अग्निशमन दलाकडून तातडीने मदतकार्य

एरंडवणे भागातील शारदा सेंटर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी २० ते २५ फूट उंचीवरून एक मजूर खड्ड्यात पडला.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 6 Feb 2025

मुंबई : जय भीमनगर येथील झोपड्यांवरील कारवाईचे प्रकरण, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही

मुंबई : ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगरमधील सुमारे ८०० झोपड्यांवर तोडकामाची कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाई प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला. तोडकाम कारवाईविरोधात झोपडपट्टीतील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून संबंधित महापालिका आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे विशेष सुनावणी झाली.

11:05 (IST) 6 Feb 2025

कैद्यांना कुटुंबियांची घेता येईल ‘ई-भेट’, वेळेची होणार बचत, त्रासही होईल कमी

नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस अधीक्षक वैभव आगे आणि त्यांच्या पथकाने कारागृहात कैद्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना या ‘ई-भेट’ प्रणालीबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 6 Feb 2025

कारागृहातून सुटल्यानंतर गोंधळ; साताऱ्यात नऊ जणांवर गुन्हा

सातारा : सातारा कारागृहातून संशयित आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जमावाने कारागृहासमोर व शहरात घोषणा देत गोंधळ केला. त्याची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात कोरेगाव येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स