Maharashtra Politics Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकले. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून घेणार आहोत.
Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
मुंब्र्यात रस्त्यावरच अनधिकृत इमारत, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली महापालिकेची पोलखोल
मुंब्रा स्थानकलगत असलेल्या खाडीमध्ये सुरू असलेल्या एका बेकायदा बांधकामाची चित्रफीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर चार दिवसांपूर्वी प्रसारित केली होती.
आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात राज्य महिला आयोगाच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीन फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस ठाण्यात आढावा बैठक घेतली.
वडगाव शेरीत पाणीप्रश्न पेटणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार पठारे करणार तक्रार !
वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या जात नाहीत.
Guillain Barre Syndrome: ‘जीबीएस’ वाढीचे कारण सापडले, एनआयव्हीचा अहवाल आला !
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या ६२ रुग्णांपैकी २६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण शून्य आढळले.
खो-खो विश्वविजेत्या रेश्मा राठोडचे बदलापुरात जंगी स्वागत
बदलापूर : नुकत्याच पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने अद्वितीय कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बदलापूरच्या रेश्मा राठोड हिचाही मोठा वाटा होता.
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
गुरुवारी सकाळी साडे सहा वाजल्यानंतर कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल विहित वेळेत न आल्याने या लोकलवर अवलंबून असणाऱ्या बदलापूर ते कल्याण, डोंबिवली आणि पुढील रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
GBS UPDATE | पुण्यात आत्तापर्यंत आढळलेल्या ‘जीबीएस’च्या संशयित रुग्णांची संख्या १७० वर; कोणत्या भागात किती रुग्ण?
पुण्यात आतापर्यंत जीबीएसचे १७० संशयित रुग्ण आढळले असून ५ संशयितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापैकी १३२ रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिकेतील ३३ रुग्ण, पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ८६, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील २२, पुणे ग्रामीणमधील २१ आणि इतर जिल्ह्यांतील ०८ रुग्ण आहेत. यापैकी ६२ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, ६१ आयसीयूमध्ये आहेत आणि २० व्हेंटिलेटरवर आहेत.
GBS (Guillain-Barré Syndrome) UPDATE | 170 suspected patients and 5 suspected deaths of GBS have been found until now. Of these 132 are diagnosed as confirmed GBS cases. 33 patients from Pune MC, 86 from newly added villages in PMC area, 22 from Pimpri Chinchwad MC, 21 from Pune… pic.twitter.com/J4n0OkARe7
— ANI (@ANI) February 6, 2025
Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स