Maharashtra Politics Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकले. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून घेणार आहोत.
Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
चिकनच्या दुर्गंधीयुक्त अवशेषांमुळे पुणे जिल्ह्यात गुइलेन बॅरेचा धोका?
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चिकन सेंटर मधील कचरा, मृत कोंबड्यांचे पंख, पाय, आतड्याचा भाग असे घाण ,सडलेले , दुर्गंधीयुक्त अवशेषांच्या मोठ्या पिशव्या राजरोसपणे राष्ट्रीय महामार्गावरच टाकल्या जात आहेत .
अहिल्यानगरः केंद्र व राज्य सरकारच्या पूरातत्व विभागाने संरक्षित केलेले १०९ गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्यातील ११ गड किल्ले अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मेपर्यंत हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.
…अन्यथा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणून ठेवणार , वडेट्टीवारांचा सरकारला इशार
हमीभावाने सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही मुदत वाढवा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना कोटा वाढवण्यासा सांगणार आहेत. जोपर्यंत सोयबीन शेतकर्यांच्या घरात आहे, तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे. जर झालं नाही या महिन्याच्या अखेरीस तर यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यात सोयाबीन शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. सोयाबीन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणून ठेवणार आहोत, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.
सिमेंट मिक्सरने १० वर्षांच्या विद्यार्थिनीला चिरडले, अपघातात भाऊही जखमी
मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात सिमेंट मिक्सरने दिलेल्या जोरदार धडकेत १० वर्षीय विद्यार्थिनीचीचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा सहा वर्षांचा भाऊही जखमी झाला आहे. दोन्ही भावंडांना शाळेतून ने-आण करण्याची जबाबदारी एका रिक्षाचालकावर सोपविण्यात आली होती. पण रिक्षाचालक त्यांना रिक्षाऐवजी दुचाकीवरून घरी आणत असताना हा अपघात झाला.
Shilphata Traffic : निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीच्या कामाला प्रारंभ
Shilphata Road Traffic Updates : समर्पित जलदगती रेल्वे मार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून बुधवारी मध्यरात्रीपासून शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीचे काम अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने सुरू करण्यात आले.
वाचा सविस्तर…
पुणे : लोखंडी वस्तूने डोक्यात घाव घातल्याने तरुण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विमाननगर परिसरातील यशोदानंदन सोसायटी येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतो आणि तेथेच राहायला आहे.
जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक घेण्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आश्वासन, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे
गेल्या काही वर्षांपासून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेला डीपीआर केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता.
पुणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले
पुणे : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा जप्त केला. नितीन भाऊसाहेब गोपाळ (२०, रा. दत्त दिगंबर सोसायटी, साखरी रस्ता, धुळे) आणि लकी छोटू पवार (१९, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, साखरी रस्ता, धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रस्त्यावरील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी प्रवेशद्वारासमोर दोघे संशयास्पद थांबलेले आढळून आले. त्यांना पकडून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे ९६ हजार २० रुपये किमतीचा ४ किलो ८०१ ग्रॅम गांजा आणि २ मोबाईल असा १ लाख १६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दोघेही मुळचे धुळे जिल्ह्यातील असून त्यांनी हा गांजा कुठून आणला याचा तपास पोलीस करत आहेत.
अभिनेते प्रसाद ओक, सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार
बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभिनेते प्रसाद ओक आणि पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’वर कधी जायचं याच्याशी याचं काय देणं-घेणं? अजित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्री त्यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानी जात नसल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाष्य केलं होतं. यावर अजित पवारांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. “एकनाथ शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री वर्षावर जात नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कधी जायचं कधी नाही यांना काय देणं घेणं? आणि वर ते पाडून तिथं नवीन इमारत बांधायची असं म्हणाले…मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. ती एकुलती एक असल्याने असली कामं ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं…. कोणतरी सकाळी भोंगा वाजतो… आणि मग ते सांगतात आता असं होणार आणि तसं होणार… अरे राज्याचं हित कसात आहे ते बघा…”, असे अजित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड: चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं म्हणा; अजित पवारांचे महेश लांडगेंना शाब्दिक टोले
ज्यानं चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका, असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.
बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी कोणी मजूर, कोणी निरीक्षक
नाशिक : आडगाव शिवारात बांधकामाधीन प्रकल्पात कार्यरत शेकडो मजुरांमधून बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेशांतर केले. सलग चार दिवस या प्रकल्पांत मजूर, निरीक्षक (सुपरवायझर) म्हणून कार्यरत राहिले. भाषेतील फरक ओळखून अखेरीस आठ बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात यश मिळवले
निवासी डॉक्टरांना आवश्यक सेवा-सुविधा द्या : मुश्रीफ
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय होणे महत्वाचे आहे. यासाठी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये त्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
फडणवीसांचे लहानपणीचे ‘गोड’ स्वप्न अखेर पूर्ण झाले!
तळेगाव औद्योगिक क्षेत्रात लोट्टे इंडियाच्या हॅवमोर आईसक्रीम उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.
‘एसटी’च्या आजी- माजी कर्मचाऱ्यांना भेट… प्रवासासाठी मोफत पासच्या…
नागपूर : एसटी महामंडळाने त्यांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. त्यानुसार सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना २ महिन्याऐवजी ४ महिने, तर माजी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या सहा महिन्याऐवजी नऊ महिने एसटी प्रवासाचा पास मोफत मिळणार आहे. ही सवलत साध्या बससाठीच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे.
किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.
नववर्षात सोन्याचे दर सूसाट…सराफा व्यवसायिक आणि ग्राहकांमध्ये…
नागपूर : नागपूरसह देशभरात सोन्याचे दर नियंत्रण येत नाही. नववर्षात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून प्रत्येक दोन- तीन दिवसांत नवीन उच्चांकीवर दर आलेले दिसतात. सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराने दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतांनाच दरवाढीने विक्रीवर परिणामाचा धोका असल्याने सराफा व्यवसायिकांना चिंता लागली आहे.
अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार
नागपूर : राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची १५१ तर मदतनीसची ४१६ पदे रिक्त आहेत.
अक्षय शिंदेप्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी.
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांच्या पालकांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने शिंदे याच्या पालकांच्या मागणीची दखल घेतली.
दहावी व बारावीच्या परीक्षांमधील कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली
अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून अनेक काॅपी बहद्दर हे परीक्षा केंद्रावर येत असल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे.
ठाणे जिल्हापरिषदेची ‘स्मार्ट’ वाटचाल, विविध योजना आणि कामांसाठी ॲप्लिकेशनची निर्मिती
ठाणे जिल्हा परिषदेने ‘आदर्श आपले सरकार केंद्र’ असे घरपोच दाखल्यांची सुविधा देणारे ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
एलआयसीच्या ६८ इमारती अतिधोकादायक, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या संरचनात्मक तपासणी अहवालातून स्पष्ट
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात आलेल्या स्थापत्यविषयक लेखापरीक्षण अहवालातून स्पष्ट झाले.
सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक; गुन्हा दाखल न करण्यासाठी…
नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
“वाल्मीक कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो” म्हणत तरुणाला मारहाण, बीडच्या धारूरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराड व धनंजय मुंडेंविरोधातील बातम्या, चित्रफिती का पाहतो, असे विचारत एका तरुणाला दोघांनी कोयता व लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण अशोक शंकर मोहिते याला सुरुवातीला अंबाजोगाई व त्यानंतर लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पिंपरी : कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले.
वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला परस्पर वळवला; आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फसवणूक, गुन्हा दाखल
दहा जणांचे एकूण ७४ लाख ५० हजार रूपये वळवण्यात आले असून याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shilphata Traffic : शिळफाट्याचा सर्वांनीच घेतला आहे धसका, प्रवाशांची पर्यायी रस्त्याला पसंती, नोकरदार वर्गाचे WFH
शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा धसका घेऊन डोंबिवलीतील प्रवाशांनी माणकोली पूल मार्गे, कल्याणमधील प्रवाशांनी दुर्गाडी पूल, भिवंडी बाह्यवळण रस्तामार्गे इच्छित स्थळी जाणे पसंत केले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं?”, असा थेट सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं ? pic.twitter.com/h4MMSuawFq
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2025
पुणे : धनकवडीत तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण शिवतरे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास धनकवडीत मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता.
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाची सीमा वाढल्यामुळे शहरात गरोबा मैदान या नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील ३६ वे पोलीस ठाणे असून लकडगंज आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीला विभागून नवीन पोलीस ठाण्याची सीमा ठरविण्यात येणार आहे.
Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स