Marathi News Live Today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया येत असून मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडीही पाहुयात.

दरम्यान, काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केलाआहे. ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर पर्यटक किंवा त्यांचे नातेवाईक मदतीसाठी संपर्क साधू शकतात.

तसंच, तिथे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याकरता इंडिगोच्या अतिरिक्त विमानाची सोय करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांशी समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन श्रीनगर येथे रवाना झाले असून मुंबई-पुण्यामध्ये आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 23 April 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

16:31 (IST) 23 Apr 2025

पहलगाममधून भारतात परतणाऱ्या पर्यटकांना तिकिटात सवलत द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

जम्मू काश्मीरमधून आपल्या घरी परतणाऱ्या पर्यटकांना तिकिट दरांत सवलत द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी भारत सरकारकडे केली आहे.

16:17 (IST) 23 Apr 2025

काश्मीरमध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७ पर्यटक अडकले

काश्मिरमधील पहेलगाममध्ये मंगळवारी दहशदवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. …अधिक वाचा
15:57 (IST) 23 Apr 2025

पहलगाम हल्ल्यासंदर्भातील मदतीसाठी प्रकाश आंबेडकरांनी साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संपर्क

15:08 (IST) 23 Apr 2025

पर्यटक डोंबिवलीकरांच्या मृत्युने डोंबिवलीत शोकाकुल वातावरण, मृत पर्यटकांच्या निवासस्थानांबाहेर शोकाकुल नागरिकांचे जथ्थे

दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांच्या राहत्या घरांच्या परिसरात, सोसायटी आवारात सकाळपासून महिला, पुरूष शोक व्यक्त करण्यासाठी जमा झाले होते. …सविस्तर वाचा
14:21 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत कसं आणणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नियोजन!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : “डोंबिवलीतील तीन मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ कोऑर्डिनेशन पाहत आहेत”, अशी महिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …वाचा सविस्तर
13:57 (IST) 23 Apr 2025

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरीताई मिसाळ कोऑर्डिनेशन पाहत आहेत. पर्यटकांशी कॉर्डिनेशन करतो आहोत. ज्यांनी संपर्क साधलाय त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगोतून आणत आहोत. परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा आढावा घेऊन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ इंडिगोला एक अतिरक्त विमान द्यावं अशी विनंती करणार आहेत, आवश्यक तिकिटाची व्यवस्था मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार.

मंत्रालयाची आपत्ती व्यवस्थापन केंद्रातही व्यवस्था उभ्या केल्या आहेत. माहिती देणे- घेणं सोपं होईल. जम्मूचं प्रशासनही योग्य उत्तर मिळतंय. व्यवस्था करत आहे. जखमींना उपचार सुरू आहेत. जखमींना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर करू. दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले आहे, त्यांच्या परिवाला ५ लाख रुपये देणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

13:48 (IST) 23 Apr 2025

अमोल कोल्हे अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात

13:40 (IST) 23 Apr 2025

सोने ग्राहकांना सुखद धक्का…जळगावमध्ये दरात मोठी घसरण

बुधवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत घसरले. …वाचा सविस्तर
13:33 (IST) 23 Apr 2025

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारने जारी केला हेल्पलाईन क्रमांक

13:28 (IST) 23 Apr 2025

महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून श्रीनगरला रवाना होतोय, गिरीश महाजन यांची माहिती

12:50 (IST) 23 Apr 2025

मंत्री गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना, अडकलेल्या प्रवाशांसाठी व्यवस्था करणार

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जणांनी आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.२५ वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. ६ वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.

मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.

12:37 (IST) 23 Apr 2025

देशामध्ये दोन समाजात वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा हा कट – विजय वडेट्टीवार

12:15 (IST) 23 Apr 2025

“केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलावून नेमकं काय झालंय ते सांगावं”, सुप्रिया सुळेंची मागणी

आपण सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत. आता सर्वांची सुरक्षितता प्राथमिक गरज आहे. पुढच्या दोन दिवसांत श्रीनगरचा प्रत्येक नागरीक सुरक्षित झाला पाहिजे. तिथे राहणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्र परिवाराच्या मी संपर्कात असून ते सर्वजण घाबरलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून अधिकृत स्टेटमेंट येत नाही, तोपर्यंत शांतता राखा. पुढचा अहवाल आल्यानंतर आपण टीका टिप्पणी करूयात. ही तू तू में मे ची वेळ नाहीय. सध्या आपण लोकांच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. काश्मीरमध्ये राहणारा प्रत्येक नागरीक सुरक्षित झाला पाहिजे. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि देशाला कळलं पाहिजे की नेमकं काय झालंय? – सुप्रिया सुळे</p>

12:02 (IST) 23 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates : “राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन…”, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत!

11:54 (IST) 23 Apr 2025

Jammu and Kashmir terror attack latest updates : अकोल्याचे १६ पर्यटक सुखरुप, अमोल मिटकरी यांची माहिती

11:51 (IST) 23 Apr 2025

पहलगाम हल्ल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची केंद्र सरकारवर टीका

11:49 (IST) 23 Apr 2025

Maharashtra Live Blog : पहलगाम हल्लाप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

11:47 (IST) 23 Apr 2025

काश्मीर हल्ला : नागपुरातील ५० यात्रेकरू सुखरूप

काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या रुपचंदानी कुटुबातील महिला जखमी झाली आहे. दरम्यान काश्मीरमध्ये नागपूरहून पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या ४० ते ५० असून त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे. हे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त वाचा

11:46 (IST) 23 Apr 2025

Maharashtra Live Blog : भाजपाच्या देवयानी ठाकरे काश्मीरमध्ये अडकल्या, मुलगा म्हणाला, “परिस्थिती भीतीदायक असून…”

भाजपाच्या जळगावच्या चाळीसगावच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे आपल्या कुटुंबासह काश्मीरमध्ये अडकल्या आहेत.

“रात्रीच बोलणं झालंय. आईबरोबर १४ जण श्रीनगरला आहेत. परिस्थिती भीतीदायक असून त्या सुरक्षित आहेत. जळगावचे खासदार आणि आमदार संपर्कात असून २५ तारखेचे फ्लाईट बुक झाले आहेत – धीरेंद्र ठाकरे

Mumbai-Pune News Live Today 23 April 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या