Today’s Breaking News LIVE Updates : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. कित्येक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कोणीही भाष्य केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला, राज्याच्या राजकारणात सध्या केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे. हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी यावर अनुकूल वक्तव्ये केली आहेत. याबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील चिमुकल्या मुलांनी हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Mumbai-Pune News Live Today 22 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या.
हुसेन दलवाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात…वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्याचा आग्रह
कोकणात पहिली वारकरी शाळा उभी राहणार, विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याचा उद्देश
अखेर मुंबई-अहमदाबाद मार्गांवरील सगनाई देवीचे मंदिर स्थलांतरित, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा, कर्जतच्या नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष
काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरण, प्रशासनाने उद्ध्वस्त केलेल्या दर्ग्याची पाहणी करायला माजी मंत्री व काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यत घेतलं. दलवाई म्हणाले, मी तिथे दंगा करायला गेलो नव्हतो तरी पोलिसांनी मला तिथे जाऊ दिलं नाही. पोलीस दंगेखोरांना, वातावरण बिघडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत अन् आम्हा सामान्यांना तिथे जाण्यापासून रोखत आहेत.
वीरपत्नी रेवा कुलकर्णी यांना बांगलादेशचे कृतज्ञतापत्र प्रदान
"उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक", संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मनसेबरोबरच्या युतीचे संकेत
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे सध्या मुंबईत नाहीत. ते कुठे आहेत त्याची माझ्याकडे माहिती नाही. मात्र, त्यांनी नक्कीच हात पुढे केला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नाहीत. पण, मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची भूमिका सकारात्मक आहे.
उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्वोतपरी प्रयत्न; आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदी, नाले सफाईची पाहणी
माजलगावात आठवड्यातच दुसरा खून, मद्यपींच्या मारहाणीत ढाबामालकाचा मृत्यू
परभणी : तापमानाचा पारा वाढला, परभणी जिल्ह्यात जलसाठे आटू लागले
‘समृद्धी’ च्या मोबदल्यासाठी शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले, सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे रास्ता रोको आंदोलन
विकिरण तंत्रज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रात १० टन कांद्याची ‘महाबँक’, ८३६ कोटींतून कोबाल्ट ६० च्या सुविधांसह पाच केंद्रांचा प्रस्ताव
पिंपरी : महापालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; 'एआय'…
प्रयागराजच्या धर्तीवर भीमा नदी आषाढी यात्रेत स्वच्छ ठेवणार; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : जयकुमार गोरे
विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, अंपगांसाठी सुविधा नसणे अयोग्य; उच्च न्यायालयाची टिप्पणी
पोप फ्रान्सिस यांना RSS कडून श्रद्धांजली; म्हणाले, "त्यांनी अनेक वर्षे..."
पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी निधन झालं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. फ्रान्सिस यांच्य निधनानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांना दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील असंख्य लोकांनी फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील पोप फ्रान्सिस यांना द्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या वतीने आरएसएसने एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की "पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झाले, आम्ही याबाबत शोकसंवेदना व्यक्त करतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक वर्षे कॅथलिकांचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो.
Adani Realty: नवी मुंबईत गुजरातपेक्षा दुप्पट मोठ्या टाउनशिपची अदाणींची योजना, विमानतळ सुरू होताच प्रकल्पाची होणार घोषणा!
संग्राम थोपटेंचा रवींद्र चव्हण व बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी भाजपा नेते रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल
उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय २९ एप्रिलनंतरच; मनसे नेते म्हणाले, "पक्षनेतृत्वाने आम्हाला…"
पुण्यात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा, विलेपार्लेतील मंदिरावरील कारवाईविरोधात आक्रमक
विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुंबई महापालिका राजकीय पक्षांच्या रडारवर आहे. तसेच जैन धर्मियांनी नुकताच मुंबईत एक मोठा मोर्चादेखील काढला होता. आता पुण्यातील जैन धर्मियांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. जैन धर्मियांनी काही वेळापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. शेकडो जैन धर्मीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.