Today’s Breaking News LIVE Updates : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. कित्येक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कोणीही भाष्य केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला, राज्याच्या राजकारणात सध्या केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे. हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी यावर अनुकूल वक्तव्ये केली आहेत. याबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील चिमुकल्या मुलांनी हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 22 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या.

15:55 (IST) 22 Apr 2025

हुसेन दलवाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात…वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्याचा आग्रह

दलवाई यांनी घटनास्थळी जाण्याचा हट्ट कायम ठेवल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. …अधिक वाचा
15:35 (IST) 22 Apr 2025

कोकणात पहिली वारकरी शाळा उभी राहणार, विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याचा उद्देश

श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे (आंबडस) यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा २४ गुंठे जागेवर उभी करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
15:28 (IST) 22 Apr 2025

अखेर मुंबई-अहमदाबाद मार्गांवरील सगनाई देवीचे मंदिर स्थलांतरित, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भाईंदर घोडबंदर रस्त्यावर आई सगनाई देवीचे जुने मंदिर आहे.हे मंदिर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहे. …अधिक वाचा
15:25 (IST) 22 Apr 2025

नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा, कर्जतच्या नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

श्रीमती उषा राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष निवडीची अधिसूचना नव्याने काढली जाईल. यामुळे आता कोण नगराध्यक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. …सविस्तर वाचा
15:19 (IST) 22 Apr 2025
काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरण, उद्ध्वस्त दर्ग्याची पाहणी करायला गेलेल्या हुसैन दलवाईंना पोलिसांनी ताब्यत घेतलं

काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरण, प्रशासनाने उद्ध्वस्त केलेल्या दर्ग्याची पाहणी करायला माजी मंत्री व काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यत घेतलं. दलवाई म्हणाले, मी तिथे दंगा करायला गेलो नव्हतो तरी पोलिसांनी मला तिथे जाऊ दिलं नाही. पोलीस दंगेखोरांना, वातावरण बिघडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत अन् आम्हा सामान्यांना तिथे जाण्यापासून रोखत आहेत.

15:14 (IST) 22 Apr 2025

वीरपत्नी रेवा कुलकर्णी यांना बांगलादेशचे कृतज्ञतापत्र प्रदान

१९७१ च्या युद्धातील कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी यांची वीरपत्नी रेवाताई यांना भारतीय लष्कराकडून बांगलादेशचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले कृतज्ञतापत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. …सविस्तर बातमी
14:50 (IST) 22 Apr 2025

“उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक”, संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मनसेबरोबरच्या युतीचे संकेत

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे सध्या मुंबईत नाहीत. ते कुठे आहेत त्याची माझ्याकडे माहिती नाही. मात्र, त्यांनी नक्कीच हात पुढे केला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नाहीत. पण, मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची भूमिका सकारात्मक आहे.

14:48 (IST) 22 Apr 2025

उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्वोतपरी प्रयत्न; आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदी, नाले सफाईची पाहणी

उल्हास नदीमध्ये औद्योगिक कंपन्यांचे पाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. त्यामुळे नदी जलप्रदुषित होऊन जलपर्णी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. …वाचा सविस्तर
14:41 (IST) 22 Apr 2025

माजलगावात आठवड्यातच दुसरा खून, मद्यपींच्या मारहाणीत ढाबामालकाचा मृत्यू

या घटनेत ढाबामालकाचा मुलगा व स्वयंपाकीही जखमी झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
14:34 (IST) 22 Apr 2025

परभणी : तापमानाचा पारा वाढला, परभणी जिल्ह्यात जलसाठे आटू लागले

जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, कडब्याचे भाव वाढताना दिसून येत आहेत. वाढत्या तापमानाने उन्हाळी पिकांना झळा बसत असून, फळबागाही पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. …अधिक वाचा
14:27 (IST) 22 Apr 2025

‘समृद्धी’ च्या मोबदल्यासाठी शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले, सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे रास्ता रोको आंदोलन

या आंदोलनामुळे जवळपास तीन तास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. …सविस्तर बातमी
14:14 (IST) 22 Apr 2025

आमदारांच्या तक्रारींची जबाबदारी सावेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ढकलली

पालकमंत्री सावे तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. …अधिक वाचा
14:06 (IST) 22 Apr 2025

विकिरण तंत्रज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रात १० टन कांद्याची ‘महाबँक’, ८३६ कोटींतून कोबाल्ट ६० च्या सुविधांसह पाच केंद्रांचा प्रस्ताव

अणुऊर्जा विभागातील तज्ज्ञास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली आहे. …अधिक वाचा
13:05 (IST) 22 Apr 2025

पिंपरी : महापालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; ‘एआय’…

नवीन संकेतस्थळात दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ असलेले संकेतस्थळ, डब्ल्यूसीएजी च्या डबल-ए (एए) मानांकनासह सुसज्ज आहे …अधिक वाचा
12:59 (IST) 22 Apr 2025

प्रयागराजच्या धर्तीवर भीमा नदी आषाढी यात्रेत स्वच्छ ठेवणार; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : जयकुमार गोरे

आषाढीला अडीच महिना अवधी आहे. मात्र यंदा पहिल्यांदा पालकमंत्री यांनी आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली …वाचा सविस्तर
12:06 (IST) 22 Apr 2025

विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, अंपगांसाठी सुविधा नसणे अयोग्य; उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर आणि इतर सुविधांच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने उपरोक्त मुद्याबाबत चिंता व्यक्त केली. …वाचा सविस्तर
12:04 (IST) 22 Apr 2025

पोप फ्रान्सिस यांना RSS कडून श्रद्धांजली; म्हणाले, “त्यांनी अनेक वर्षे…”

पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी निधन झालं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. फ्रान्सिस यांच्य निधनानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांना दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील असंख्य लोकांनी फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील पोप फ्रान्सिस यांना द्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या वतीने आरएसएसने एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झाले, आम्ही याबाबत शोकसंवेदना व्यक्त करतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक वर्षे कॅथलिकांचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो.

11:41 (IST) 22 Apr 2025

Adani Realty: नवी मुंबईत गुजरातपेक्षा दुप्पट मोठ्या टाउनशिपची अदाणींची योजना, विमानतळ सुरू होताच प्रकल्पाची होणार घोषणा!

Adani Project in Navi Mumbai Panvel: अदाणी रिअॅल्टीकडून लवकरच नवी मुंबईत तब्बल १ हजार एकरवरील १० हजार कोटींच्या प्रकल्पाची सुरुवात केली जाणार आहे. …वाचा सविस्तर
11:40 (IST) 22 Apr 2025

संग्राम थोपटेंचा रवींद्र चव्हण व बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी भाजपा नेते रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

11:15 (IST) 22 Apr 2025

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात धमकीसाठी दूरध्वनी आला होता. …सविस्तर बातमी
11:04 (IST) 22 Apr 2025

उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय २९ एप्रिलनंतरच; मनसे नेते म्हणाले, “पक्षनेतृत्वाने आम्हाला…”

Uddhav and Raj Thackeray : राज्यातील शाळांमधील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. …अधिक वाचा
11:01 (IST) 22 Apr 2025

पुण्यात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा, विलेपार्लेतील मंदिरावरील कारवाईविरोधात आक्रमक

विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुंबई महापालिका राजकीय पक्षांच्या रडारवर आहे. तसेच जैन धर्मियांनी नुकताच मुंबईत एक मोठा मोर्चादेखील काढला होता. आता पुण्यातील जैन धर्मियांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. जैन धर्मियांनी काही वेळापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. शेकडो जैन धर्मीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.