Mumbai News Live Today काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया देशभरात येत आहेत. महाराष्ट्रातले सहा पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. डोंबिवलीतले तीन जण हल्ल्यात मारले गेले आहेत. याचा निषेध म्हणून आज डोंबिवली शहर बंद ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. आज शरद पवार यांनी जगदाळे आणि गणबोटेंच्या कुटुंबाची भेट घेतली. तर संजय राऊत यांनी दहशतवादाचा बिमोड करण्याच्या चर्चेवर विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी केली आहे. तर दहशतवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Mumbai-Pune News Live Today 24 April 2025 : "दहशतवादी आणि त्यांचे मास्टरमाईंड यांना योग्य उत्तर भारत देईल", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
ठाणे महापालिकेत सात सहाय्यक आयुक्तांची शासनाकडून नेमणूक, कार्यालयीन अधिक्षकांकडील अतिरिक्त पदभार होणार कमी
कोण आहे हिंदू…. आणि काही क्षणात संजय लेले, अतुल मोने रक्ताच्या थारोळ्यात
पहलगाम हल्लयाचा निषेध करत सकल हिंदू समाजाचा मोर्चा, पाकिस्तानचा झेंडा जाळला
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानचा ध्वज असलेला झेंडा जाळण्यात आला. यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
भारतीय युवकाचं पाकिस्तानात लग्न, अटारी सीमा बंद केल्याने बेत रद्द; पुढे काय होणार?
भारताने पाकिस्तानावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यात अटारी सीमा बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या भारतीय युवकाला त्याच्या लग्नाचा बेत तात्पुरता रद्द करावा लागतोय.
काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे ? आणि मुस्लिम कोण आहे ? सर्वात आधी संजय लेले यांनी हात वर केले. त्यांना लगेचच अतिरिक्यांनी गोळी मारली. त्यानंतर आमच्या समोरच लोकांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांविरोधात सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. माझ्या आईने वडिलांना कव्हर केलं पण वडिलांच्या पोटात दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या असं अतुल मोनेंच्या मुलीने सांगितलं
पहलगामच्या पार्श्वभूमीवर उलगडला आठ वर्षांपूर्वीचा थरार! ठाण्यातील चितळे कुटुंबीयांना काश्मीरच्या सहलीचा आलेला अनुभव
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती; चौकशी समिती ७ मे रोजी चंद्रपुरात
नवमित्र क्रीडा मंडळ (वरळी आयोजित) मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धेचे २३ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्याच दिवशी आयोजकांकडून पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच, यात सहभाग घेतलेल्या आंबेवाडी क्रीडा मंडळाने डाव्या हाताला काळ्या फिती बांधून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला.

वसई विरार पाणी पट्टीकर थकबाकीदारांच्या ४७१ नळजोडण्या खंडित; पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची कारवाई
काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये हॉटेल बंद
काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये हॉटेल बंद
सर्व हॉटेल बंद करण्याचे डोंबिवलीमधील हॉटेल असोसिएशन अध्यक्ष अजित शेट्टी यांचे आवाहन आहे त्यानुसार डोंबिवलीतील हॉटेल्स आज दुपारपर्यंत बंद राहणार आहेत.
१०० पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं जाणार-देवेंद्र फडणवीस
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पर्यटकांमध्ये राज्यातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले शेकडो नागरिक अडकले आहेत. हल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
अशात महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. या विशेष विमानातून १०० पर्यटकांना परत राज्यात आणले जाणार आहे. या १०० पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, कालही सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून परत आणल्या जाणाऱ्या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती.
काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया देशभरात येत आहेत. महाराष्ट्रातले सहा पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. डोंबिवलीतले तीन जण हल्ल्यात मारले गेले आहेत. याचा निषेध म्हणून आज डोंबिवली शहर बंद ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. आज शरद पवार यांनी जगदाळे आणि गणबोटेंच्या कुटुंबाची भेट घेतली.
(दहशतवादी कृत्याचा नागरिकांकडून रस्त्यावर उतरून निषेध.) (लोकसत्ता टीम)