Today’s Breaking News Highlights : महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये यावरून वातावरण तापलं असून त्यासाठी दोन्ही भावांनी केलेली विधानं कारणीभूत ठरताना दिसत आहेत. दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून यासंदर्भात संमश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना आता वैयक्तिक मैत्री वगैरे बोलणं सोडून द्या, अशा शब्दांत सुनावलं आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today 21 April 2025 : राज ठाकरे व उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच एकत्र येणार का?

20:02 (IST) 21 Apr 2025

अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराला कंटाळून मालकाचीच हत्या

अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराला कंटाळून भिवंडी येथील यंत्रमाग कामगाराने मालकाचीच दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. …वाचा सविस्तर
20:01 (IST) 21 Apr 2025

Ladki Bahin Yojana April Installment : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती!

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana April Installment : सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा सातवा हप्ता असून हा महिना संपत आला तरीही या योजनेअंतर्गत लाभ महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे यासंदर्भात सातत्याने सरकारला प्रश्न विचारला जात आहे. …अधिक वाचा
18:26 (IST) 21 Apr 2025

जळगावमध्ये सोने दराचा नवीन उच्चांक… लाखाचा टप्पा गाठण्यास अवघे काही रुपये बाकी

शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ७७७ रुपयांपर्यंत पोहोचले होते. …वाचा सविस्तर
18:20 (IST) 21 Apr 2025

शहिद कॅप्टनच्या मातेची न्यायासाठी धडपड

लेखिका अनुराधा गोरे यांनी स्वलिखीत पुस्तकांविषयीचा त्यांचा अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडला. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक खंत व्यक्त केली. …सविस्तर बातमी
18:03 (IST) 21 Apr 2025

मुख्यमंंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीची रक्कम लाटणाऱ्या आंबिवलीतील डाॅक्टरांंवर कठोर कारवाई, साहाय्यता निधी कक्षातील अधिकाऱ्यांचा इशारा

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाची फसवणूक करणाऱ्यांवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता मदत निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना दिली आहे. …सविस्तर बातमी
17:34 (IST) 21 Apr 2025

कल्याण पूर्वेत विजेच्या लपंडावामुळे शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा, महावितरणच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा

कल्याण पूर्वेतील वीज पुरवठा खंडित होत आहे. या सततच्या त्रासाला कंटाळुन सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महावितरणच्या कल्याण पूर्व टाटा पाॅवर येथील कार्यालयावर मोर्चा काढला. …वाचा सविस्तर
16:54 (IST) 21 Apr 2025

बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार, भर दिवसा गोळीबार

अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौकाजवळील सीताई सदन इमारतीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. …सविस्तर बातमी
16:49 (IST) 21 Apr 2025

Aaditya Thackeray on Raj Thackeray-Uddhav thackeray – दोन पक्षप्रमुख आपल्यासमोरच बोलत आहेत – आदित्य ठाकरे

दोन पक्षप्रमुख आपल्यासमोरच बोलत आहेत. त्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून काही बोलणार नाही. एकनाथ शिंदेंनी गावातल्या मुक्कामाचे दिवस वाढवलेत. बहुधा चंद्र कुठे आहे वगैरे बघून त्यांनी गावातला मुक्काम दोन दिवसांनी वाढवला आहे – आदित्य ठाकरे, शिवसेना (उद्धव ठाकरे)

16:39 (IST) 21 Apr 2025

सामान्य नागरिकांची फसवणुक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल… आमदार केळकर यांनी दिला विकासकांना इशारा

ठाणे येथील खोपट परिसरात भाजपचे कार्यालय आहे. या कार्यालयात भाजपचे आमदार संजय केळकर हे दर शुक्रवारी ‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम राबवितात. …वाचा सविस्तर
16:04 (IST) 21 Apr 2025

नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर…आगामी निवडणुकांमध्ये भाजप स्वतंत्र लढणार ?…माजी मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती

जिल्ह्यातील महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून भाजपचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर युती होणार नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे. …वाचा सविस्तर
16:01 (IST) 21 Apr 2025

महिलेची गळा दाबून हत्या, मृत महिलेची ओळख पटविण्याचे कार्य सुरु

भिवंडी येथील जलवाहिनी मार्गालगतच्या गवतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. …सविस्तर बातमी
15:06 (IST) 21 Apr 2025

Anil Deshmukh on sharad pawar ajit pawar meeting: दोन्ही पवार एकत्र येणार या… – अनिल देशमुख

दोन्ही पवार एकत्र येणार या फक्त मीडियानं चालवलेल्या बातम्या आहेत. आमच्याकडून किंवा त्यांच्याकडूनही कुणीच असं काही बोललेलं नाही. अजित पवार त्यांचा पक्ष वाढवतायत, शरद पवारांचा पक्ष आम्ही वाढवतोय – अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

15:04 (IST) 21 Apr 2025

Anil Deshmukh on Raj Thackeray-Uddhav Thackeray Joining Hands : दोघं एकत्र आले तर महाराष्ट्रात एक… – अनिल देशमुख

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत स्वत: राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. चांगलं आहे. ते दोघं एकत्र आले तर आनंदाचीच गोष्ट आहे. सर्वांनाच आनंद होईल. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना त्याचा सर्वाधिक आनंद होईल. दोघं भाऊ एकत्र आले, तर त्यानिमित्ताने महाराष्ट्रात एक वेगळी ताकद त्यानिमित्ताने निर्माण होईल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

14:22 (IST) 21 Apr 2025

सोलापूरजवळ रेल्वेवर दगड मारल्याने चिमुकलीचा मृत्यू

आपल्या डोळ्यादेखत लाडक्या मुलीचा हकनाक बळी गेल्याने आई-वडिलांसह आजीला धक्का बसला आहे. …वाचा सविस्तर
14:11 (IST) 21 Apr 2025

कोल्हापूर : भाजपचे बाबा देसाई यांचे निधन

कोल्हापूर : भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, येथील ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापुरातील भाजपच्या स्थापनेपासूनचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या देसाई यांनी शाहू मिलमध्ये दीर्घकाळ सेवा केली. याचवेळी त्यांनी प्रतिकूल काळात शहरात पक्षाची बांधणी करीत जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री, प्रदेश कार्यकारिणी कायम निमंत्रित सदस्य अशा विविध पदांवर काम केले. गोकुळ दूध संघाचे स्वीकृत संचालक होते. त्यांच्या मागे पत्नी, पत्रकार प्रवीण देसाई यांच्यासह तीन मुलगे, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

13:54 (IST) 21 Apr 2025

काका-पुतण्यांच्या गाठीभेटी वाढल्या, दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “राज्याला फायदा…”

पुण्यातील साखर आयुक्त कार्यालय येथे कृषी क्षेत्रात AI वापराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला पार पडली. या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. …वाचा सविस्तर
13:33 (IST) 21 Apr 2025

आता शाळांमध्‍ये सखोल पडताळणी मोहीम…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुविधांचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ मे २०२५ पर्यंत व्यापक तपासणी मोहीम राबवली जात आहे. …सविस्तर वाचा
13:03 (IST) 21 Apr 2025

केसगळतीने हातपाय पसरले; चिखली, मेहकरात सहा रुग्ण

बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक रित्या घाटावर आणि घाटाखाली असे भाग पडतात.या घाटाखालील तीन तालुक्याना चार महिन्यापासून छळणाऱ्या केसगळती आणि टक्कल या गूढ आणि विचित्र आजाराने आता घाटावरील तालुक्यातही चंचू प्रवेश केल्याचे धक्कादायक चित्र आहे. …वाचा सविस्तर
12:50 (IST) 21 Apr 2025

Naresh Mhaske on Raj Thackeray – राऊत उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय राज ठाकरेंच्या घराला कॅफे म्हणतात का – नरेश म्हस्के

संजय राऊत राज ठाकरेंच्या घराला कॅफे, रेस्टॉरंट म्हणतात. ते उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय तसं म्हणत असतील का? मुंबई महापालिका मलिदा देणारी आहे, ती जिंकायची आहे. म्हणून राज ठाकरेंना मस्का लावत आहेत. त्यांच्याकडे आता गर्दी जमवणारा नेता उरलेला नाही. त्यामुळे फक्त वापरण्यासाठी त्यांना राज ठाकरेंची गरज वाटतेय. संजय राऊत शरद पवारांना भेसळ म्हणाले. माझं सुप्रिया सुळेंना आव्हान आहे की त्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी – नरेश म्हस्के, खासदार

11:54 (IST) 21 Apr 2025

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू हत्याकांडाचा ‘लाईव्ह व्हिडिओ व्हायरल’

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि भूखंड विकासक अंकुश कडू हत्याकांडाचा ‘ लाईव्ह व्हिडिओ’ अनेकांच्या ‘मोबाईलवर व्हायरल’ झाला. …सविस्तर वाचा
11:39 (IST) 21 Apr 2025

Ajit Pawar on Meeting Sharad Pawar : शरद पवारांची गेल्या काही दिवसांत तीन वेळा भेट झाल्याबाबत अजित पवारांचं उत्तर…

परिवारातल्या कार्यक्रमासाठी परिवार म्हणून आपण एकत्र येत असतो. ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षं चालत आलेली परंपरा आहे. तो परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे.

शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तिथे मीही ट्रस्टी म्हणून काम करतो. तिथे आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला इतर पक्षाचे नेतेही आहेत. ती बैठक मुला-मुलींच्या भल्यासाठी होती. त्या चर्चेसाठी मी गेलो होतो. आज झालेल्या बैठकीसाठीही त्याच उद्दिष्टाने आलो होतो.

ज्यातून राज्याला जनतेचा फायदा होणार असेल, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. अशावेळी चर्चेसाठी बसावं लागतं. काही विषय राजकारणाच्या पलीकडे बघायच्या असतात. सगळ्याच गोष्टींत राजकारण आणायचं नसतं.

11:32 (IST) 21 Apr 2025

Ajit Pawar on Sangram Thopte Joining BJP: “मग मी काय करू?”

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करण्याबाबत अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी “मग मी काय करू?” असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. “ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते. ते आता पराभूत झाले आहेत. आता काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मी मत व्यक्त करणं योग्य होणार नाही”, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. साखर संकुलातील बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

11:03 (IST) 21 Apr 2025

पिंपरी- चिंचवड मध्ये अज्ञात दोघांनी केली ११ वाहनांची तोडफोड, भोसरी पोलीस अज्ञात दोघांचा शोध घेत आहेत

पिंपरी- चिंचवड मधील भोसरी मध्ये अज्ञात दोन व्यक्तींनी अकरा चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. भोसरी पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. भोसरी मधील आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती परिसरात अज्ञात दोघांनी कोयता आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री दीडच्या सुमाराची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपान केलेल्या दोघांनी तोडफोड केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास आदिनाथ नगर आणि गव्हाणे वस्ती येथे रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी वाहनांना लक्ष करत दोघांनी कोयता आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच पुन्हा एकदा नुकसान झाल आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचे प्रकरण हे काही नवीन नाही. या आधी देखील अनेकदा वाहन तोडफोडीचे प्रकार घडलेले आहेत. अज्ञात व्यक्तींना अटक केल्यानंतरच वाहन तोडफोडीच कारण समजू शकणार आहे. सध्या भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

10:53 (IST) 21 Apr 2025

Sharad Pawar – Ajit Pawar Meeting: शरद पवार – अजित पवार यांच्यात साखर संकुलात बैठक

साखर संकुलात शरद पवार अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

10:51 (IST) 21 Apr 2025

Raj Thackeray – Uddhav Thackeray: उत्तम राजकारण हे भूतकाळात न पाहण्याचं असतं – संजय राऊत

२०१४ साली भाजपा व शिवसेनेनं युती तोडली, मोठी टीका केली. पण परत आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही. उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं. तेव्हा आम्ही राज्याच्या व देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो. उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे आहेत. महाराष्ट्र, मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं हे ठरलंय दोन नेत्यांमध्ये. त्यानंतर त्यांनी खाली संदेश दिला आहे. हा नवीन सुरू होणारा प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कधीही करणार नाही – संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रवक्ते

10:50 (IST) 21 Apr 2025

Raj Thackeray – Uddhav Thackeray : मागे काय घडलं, हे विसरून पुढे जायला हवं – संजय राऊत

भूतकाळात वळायचं नाही. उद्धव ठाकरेंनी ठरवलंय की एक पाऊल पुढे टाकायचं. ते करत असताना मागे काय घडलं त्याकडे दुर्लक्ष करायचं. मागे काय घडलं, त्यांनी काय टीका केली, काय भूमिका मांडल्या हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टीकोन म्हणतात. आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली, त्याआधी आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. पण एकत्र आलो तेव्हा आम्ही भविष्याचा विचार केला – संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रवक्ते

10:46 (IST) 21 Apr 2025

Sanjay Raut on Eknath Shinde: संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला!

काही लोकांना त्यामुळे वेदना होणार. कारण जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले, तर त्यांना कायमचं शेतावर जावं लागेल. किंवा कायमच संघ शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्रानं ठाकरे कुटुंबावर कायम प्रेम केलं आहे. त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल. त्यातून काहींची पोटातली मळमळ बाहेर पडत असेल. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने आम्ही पाहतो – संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रवक्ते

10:45 (IST) 21 Apr 2025

Uddhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी जनतेच्या मनातली भूमिका व्यक्त केली – संजय राऊत

उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घेतली पाहिजेत ही लोकभावना आहे. मग आता प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? त्या दोघांनी महाराष्ट्राच्या मनातली भूमिका व्यक्त केली आहे – संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रवक्ते

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो (संग्रहीत फोटो)

Mumbai-Maharashtra News Live Today 21 April 2025 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर