Marathi Batmya Updates : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा-शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका सुरू होती. त्यानंतर राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर राज्य मंत्रिमंडंळाने त्यावर कोणतीही पावलं उचलली नसल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच काल मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. आजही या विषयावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळेल. तसेच हसन मुश्रीफ यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी याबाबतचे काही महत्त्वाचे अपडेट्स आज पाहायला मिळतील.

Live Updates

Maharashtra Mumbai News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

18:38 (IST) 11 Apr 2023
वाशीम: बाजार समित्यापाठोपाठ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा धुरळा; ५५ ग्राम पंचायतसाठी १८ मे रोजी मतदान

वाशीम जिल्हयात सहकार क्षेत्रातील बाजार समित्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यासोबतच जिल्हयातील ग्राप पंचायतच्या पोट निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे.

सविस्तर वाचा

18:30 (IST) 11 Apr 2023
ठाणे : गावदेवी भाजी मंडई इमारतीतील दुचाकी वाहनतळ बंदावस्थेच

ठाणे : येथील गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भुमिगत वाहनतळ सुरु झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्याशेजारीच असलेल्या भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ बंदावस्थेतच असल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर...

18:20 (IST) 11 Apr 2023
मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव; बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन बाबरी मशीद पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती केली.

वाचा सविस्तर....

18:13 (IST) 11 Apr 2023
बुलढाणा पालिकेच्या एकछत्री कारभाराला आमदारांचे आव्हान; जिल्हाकचेरीत 'सीओ' समवेत उद्या स्वतंत्र बैठक, कामांची घेणार झाडाझडती

बुलढाणा पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या विकासकामांची आमदार धीरज लिंगाडे उद्या झाडाझडती घेणार आहे! जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार लिंगाडे व मुख्याधिकारी यांची आमनेसामने बैठक होणार आहे.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 11 Apr 2023
नवी मुंबई: अनधिकृतपणे वाहन व्यवसाय करणाऱ्यांवर आरटीओची कारवाई

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून व्यवसाय परवान्याशिवाय, अनधिकृतपणे वाहनविक्री करणाऱ्या वाहनवितरकांवर करडी नजर ठेवत कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी कोपरखैरणे येथील दोन वाहन वितरकांवर कारवाई करण्यात आली

सविस्तर वाचा

17:35 (IST) 11 Apr 2023
चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार २०२१-२२ मध्ये या जिल्ह्यात १२ हजार १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६ हजापर ५६२ पुरूष तर ५ हजार ४५३ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २ हजार ३१ लोकांचा मृत्यू हृदय विकाराने झालेला आहे. यात १०५९ पुरूष तर ९७२ महिलांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

17:34 (IST) 11 Apr 2023
डोंबिवलीत गुरचरण जमिनीवरील बेकायदा इमारतीमधील घर खरेदीत १२ जणांची फसवणूक

कल्याण डोंबिवली पालिकेचे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या आशीर्वादाने दोन वर्षापूर्वी ठाकुर्ली जवळील कांचनगाव (खंबाळपाडा) मधील गुरचरण जमिनीवर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली.

वाचा सविस्तर...

17:34 (IST) 11 Apr 2023
चंद्रपूरचा उत्पादन शुल्क विभाग वादात, अधिकाऱ्याच्या मदतीने देशी दारू दुकानावर कब्जा; महिलेच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे…

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर चंद्रपूरचा उत्पादन शुल्क विभाग सतत वादाच्या भोवऱ्यात आहे. दारू परवाना नूतनीकरण प्रक्रियेत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेराफेरी व अनियमितता केल्याचा आरोपी अनुज्ञुप्ती धारक फसवणूक झालेल्या महिलेनी केला आहे.

सविस्तर वाचा

17:00 (IST) 11 Apr 2023
मुंबई : उद्या परीक्षा, विद्यार्थी अद्याप प्रवेशपत्रांच्या प्रतिक्षेत

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनातील गोंधळाने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (बीए) परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) मिळालेली नाहीत.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 11 Apr 2023
अमरावती: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; पुणे-अमरावती विशेष रेल्‍वेगाडी १७ एप्रिलपासून

मध्‍य रेल्‍वेने पुणे आणि अमरावतीकर प्रवाशांसाठी आणखी एका रेल्‍वेची व्‍यवस्‍था केली असून ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्‍स्‍प्रेस पुण्‍याहून येत्‍या १७ एप्रिल रोजी रवाना होणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्‍स्‍प्रेस १८ एप्रिलपासून धावणार आहे.

सविस्तर वाचा

16:41 (IST) 11 Apr 2023
अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरण; ठाण्यातील शहापूरमधून अल्पवयीन मुलगा ताब्यात

मुंबई : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ठाण्यातील शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

16:40 (IST) 11 Apr 2023
राज्यातील तीन मोठे प्रकल्प लागणार मार्गी; बहुउद्देशीय मार्गिका, जालना-नांदेड महामार्ग आणि पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी एस्वारस्य निविदा जारी

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसह जालना – नांदेड समृद्धी मार्ग (विस्तारीत मार्ग) आणि पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या तिन्ही महत्त्वाकांक्षी आणि मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामासाठी मंगळवारी स्वारस्य निविदा जारी केल्या आहेत.

सविस्तर वाचा..

16:39 (IST) 11 Apr 2023
पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : कर्वेनगर भागात एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा..

16:39 (IST) 11 Apr 2023
स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्राची आयसर पुणेमध्ये स्थापना; चारशे शिक्षक, दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रशिक्षण

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर पुणे) विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) टिंकरिंग अनुभव केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. स्टेम-रेडी उपक्रमाअंतर्गत पुढील दोन वर्षांत चारशे शिक्षक, दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा..

16:38 (IST) 11 Apr 2023
गोवंडीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे आक्रमक

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अनेक वेळा तक्रारी करूनही मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर या अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन भरवण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

सविस्तर वाचा..

16:37 (IST) 11 Apr 2023
अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूक : २० उमेदवार बिनविरोध विजयी

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जवळ येत असून नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ परस्परांसमोर ठाकले आहेत. येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राज्यभरातील ६० पैकी २० जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.

सविस्तर वाचा..

16:33 (IST) 11 Apr 2023
बळीराजाचे अश्रू कोण पुसणार !; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नुकसान पाहणीकडे पाठ, शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचले नाही

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात ७१० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी आणि महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. याचबरोबर त्यांनी सत्तारूढ आमदार, खासदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचीही सूचना केली.

सविस्तर वाचा

16:33 (IST) 11 Apr 2023
चंद्रपूर: महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.

सविस्तर वाचा

15:40 (IST) 11 Apr 2023
जळगाव: बाबरी मशिदीसंदर्भातील चंद्रकांत पाटील यांची भूमिका व्यक्तिगत; चंद्रशेखर बावनकुळे

रामजन्मभूमी आंदोलनात हिंदुहृदयसम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील भाजपचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य हे व्यक्तिगत असून ती पक्षाची भूमिका नाही. ज्यावेळी रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते,

सविस्तर वाचा

15:16 (IST) 11 Apr 2023
नागपूर: संकटातील ऑर्किड्सला वाचवून आंब्यामधील जंगलात पुनःरोपण! भारतील सर्वात मोठी ऑर्किड्स पूनर्वसन मोहीम

ऑर्किड्स… निसर्गाला पडलेले मनोहारी स्वप्न ! २८००० पेक्षा जास्त विभिन्न प्रजाती ! बर्फाळ प्रदेशापासून ते तुफान पावसाच्या घनदाट अरण्यापासून ते अगदी वाळवंटात सुद्धा ऑर्कीड्स प्रजाती आढळून येतात.

सविस्तर वाचा

14:56 (IST) 11 Apr 2023
वर्धा : गळाच्या रथयात्रेसाठी माहेरवाशिणी सज्ज; तीनशे वर्षांची परंपरा आजही धडाक्यात

वर्धा : दिवाळीस कदाचित शक्य झाले नसेल, मात्र गळाच्या यात्रेस इतरत्र नांदणाऱ्या मुली हा दिवस सोडत नाही. माहेरवाशिणीनी गाव नटून थटून सज्ज झाले आले. कारण आज तीनशे दोन वर्षांची परंपरा चालवायची आहे न. आंजी तालुक्यातील पवणूर हे गाव अशा आगळ्या वेगळ्या उत्सवाने विदर्भात प्रसिद्ध झालेले आहे.

सविस्तर वाचा..

14:56 (IST) 11 Apr 2023
मुंबई : संगीतकार अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर’चे ऑस्ट्रेलियात आयोजन

मुंबई : अवीट गोडीची भावगीते, भक्तिगीते, जाहिरातींची अनोखी दुनिया, नाटक, चित्रपट आणि मालिकांचे संगीत अशा विविध प्रांतांमध्ये मुशाफिरी करणारे संगीतकार अशोक पत्की यांचे सूर आता थेट ऑस्ट्रेलियात घुमणार आहेत. ‘नटराज प्रोडक्शन’तर्फे अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रमाचे ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशातील मराठी आणि अमराठी रसिक प्रेक्षकांनाही या संगितांचा आनंद घेता येणार आहे.

सविस्तर वाचा..

14:55 (IST) 11 Apr 2023
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.

https://twitter.com/OfficeofUT/status/1645713984157523968

14:53 (IST) 11 Apr 2023
नागपुरात ‘सलीम’ नामसाधर्म्याने संशयकल्लोळ! कलावंतांच्या मंचावरही राजकारणाचे ‘प्रयोग’

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभागासाठी होणारी निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. या निवडणुकीत एकाच नावाचे दोन उमेदवार मैदानात असल्याने संभ्रमाचा संशयकल्लोळ समेवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा

14:52 (IST) 11 Apr 2023
नागपूरच्या सभेचा वाद न्यायालयाता जाणार

नागपूर पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभे विरोधात मैदान बचाव कृती समिती न्यालयात जाणार आहे, असे भाजपचे माजी नगरसेवक हरिश दिकोंडवार यांनी सांगतले.

सविस्तर वाचा

14:42 (IST) 11 Apr 2023
नागपूर: घराचे हप्ते थकले, किराण्याचेही वांदे! पगार अडकल्याने पोलिसांवर उसनवारीची वेळ

उपराजधानीत एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी पोलिसांचा पगार झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘मार्च एंडिंग’च्या धावपळीमुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 11 Apr 2023
“चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मिंधेंनी राजीनामा द्यावा”, बाळासाहेबांवरील 'त्या' वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी

उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

14:15 (IST) 11 Apr 2023
“चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मिंधेंनी राजीनामा द्यावा”, बाळासाहेबांवरील 'त्या' वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी

उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

14:04 (IST) 11 Apr 2023
यंदा देशात सरासरी ९६ टक्के, तर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

पुणे – नैऋत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के (+/- ५%) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मान्सून हंगामाबाबतचा अधिकृत अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला असून, यावेळी ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

14:04 (IST) 11 Apr 2023
मुंबई : थकबाकीदार विकासकाला नवी योजना राबविण्यावर बंदी?

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विक्री घटकावर स्थगिती, तसेच योजनेतून काढून टाकण्याचा इशारा देऊनही विकासक झोपडीवासीयांचे थकविलेले भाडे देत नाही, हे पाहून आता विकासकाला नवी योजना सादर करण्यावर बंदी आणण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा..

aditya thackeray vs eknath shinde

आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर टीका

Maharashtra Mumbai News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

Story img Loader