Marathi Batmya Updates : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा-शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका सुरू होती. त्यानंतर राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर राज्य मंत्रिमंडंळाने त्यावर कोणतीही पावलं उचलली नसल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच काल मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. आजही या विषयावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळेल. तसेच हसन मुश्रीफ यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी याबाबतचे काही महत्त्वाचे अपडेट्स आज पाहायला मिळतील.
Maharashtra Mumbai News Live Update : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबईत १४ एप्रिलपासून प्रत्येक विभागात महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलाविषयक विविध कल्याणकारी योजनांची माहिती या मेळाव्यांमध्ये देण्यात येणार आहे.
‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर, मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्रीपद दिले जावे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे’, असे विधान करून डी. के. शिवकुमार यांनी पक्षाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यातील मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र झाली असली तरी, सर्वोच्च पदासाठी पक्षाने कोणाचेही नाव घोषित केलेले नाही.
मुंबई : करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोमवारी राज्यातील सर्व रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये सध्या करोनाबाधित रुग्णांसाठी ५० खाटा राखीव असून, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन या रुग्णालयातील आरक्षित खाटांची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी काढलेल्या सोडतीच्या नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला अखेर काहीसा प्रतिसाद वाढला आहे. इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी कोकण मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीला मुदतवाढ दिली असून अर्ज भरण्यासाठीच्या नियमात काही बदल केले आहेत. याचा काहीसा फायदा आता मंडळाला होताना दिसत आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्याचा विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दर्शन कॉलनीच्या मैदानावर वज्रमुठ सभेसाठी सुरू करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.नागपुरातील वज्रमुठ सभेची जबाबदारी असलेले माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नेत्यांनी मैदानावर पाहणी केली.
राज्यात गेल्या तेरा दिवसांत करोनाचे संक्रमण वाढल्याने सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, राज्यात २८ मार्चला २ हजार ३४३ सक्रिय करोनाग्रस्त होते.
Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची पुष्टी केली आहे. अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. वाचा सविस्तर बातमी
कल्याण पूर्व भागातील विजयनगर मधील एका सोसायटीत राहत असलेल्या पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना रविवारी रात्री मध्यरात्री संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आरोपी पतीवर दाखल करण्यात आला आहे.
Twitter एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. याचे सीईओ Elon Musk आहेत. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया वेबसाईट ट्विटरवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. अब्जाधीश एलॉन मस्क हे जगातील निवडक राजकारण्यांना फॉलो करतात. वाचा सविस्तर बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळ या पक्षचिन्हाचं काय होणार यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (११ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो.
संयुक्त राष्ट्रांची पाणी परिषद २०२३ नुकतीच न्यूयॉर्क शहरात पार पडली. ही पाणी परिषद ४६ वर्षांनंतर झाली. संयुक्त राष्ट्राला १९७७ नंतर पुन्हा पाणी परिषद का घ्यावी लागली, या पाणी परिषदेत नेमकं काय झालं त्या विषयी…
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आयोगाच्या या निर्णयावर पक्षाची भूमिका मांडली. यात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ते मंगळवारी (११ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
चिनी नौदलाने दशकभरात वेगाने आपली शक्ती विस्तारत संख्यात्मकदृष्ट्या बलाढ्य अमेरिकन नौदलालाही मागे टाकले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणातही तो सक्रिय भूमिका निभावत आहे. ग्वादार बंदराच्या विकासातून चीनने आपले खनिज तेलाचे सागरी मार्ग सुरक्षित केले. शिवाय ओमानचे आखात आणि भारतीय नौदलाच्या अरबी समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली. सभोवताली बंदर आणि जोडीला नाविक तळ उभारून चिनी नौदल हिंद महासागर क्षेत्रात ती व्यूहरचना करीत आहे. चीन आणि पाकिस्तानी नौदलाचे एकत्रित आव्हान पेलण्याकरिता भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याची निकड संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीने मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. बावनकुळेंनी नियमांचं पालन झालं नसल्याने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याचं म्हटलं, तर सामंत यांनी यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचं म्हटलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी महाविकास आघाडीच्या सभेला भाजपचा विरोध नाही, हे स्पष्ट केल्यानंतरही भाजपचेच आमदार कृष्णा खोपडे यांचा सभेला विरोध कायम आहे. आता त्यांनी स्थानिक नागरिकांना पुढे करुन आंदोलन सुरू केले आहे.
अमरावती : गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता ‘हिंदुत्वा’ची ‘कार्यक्रम पत्रिका’ तयार केली असून आगामी लोकसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी मानली जात आहे.
मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या भावाची हत्या झाली असून त्याप्रकरणी संशयितांची नावे देऊनही त्यांना अटक झाली नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला व्यक्तीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे : लष्करात स्वयंपाकी असलेल्या एकाने सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्करात स्वयंपाकी असलेल्या एकास अटक करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. “त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? असे अनेक सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंवरील या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.
नागपूर महापालिकेतील सर्व चांगल्या-वाईट गोष्टींसाठी तेथील लोकप्रतिनिधींना जबाबदार ठरवले जाते, प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करण्याचाही आरोप केला जातो. गेल्या एक वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असून त्यांच्या कारकिर्दीमुळे लोकांना दिलासा मिळण्याऐवजी गैरसोयींनाच अधिक तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मंत्री होण्यापूर्वी पासूनच वर्धा जिल्ह्यावर लोभ. अडगळीत पडलेला महात्मा साखर कारखाना त्यांच्या समूहाने विकत घेवून मार्गी लावला. बेरोजगारांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर त्यांनी प्रथम वर्धेतच घेतले होते. आता तर ते वर्धा लोकसभा क्षेत्राचे पक्ष प्रभारीच झाले.
सायबर गुन्हेगारांनी ‘ऑनलाईन गेम’ खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य केले असून शहरातील एका महिलेच्या ११ वर्षीय मुलाला जाळ्यात ओढले.आईच्या खात्यातून एक लाख २ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे न पाठवल्यास बहिणीचे अपहरण करण्याची धमकी दिली.
कंपवात आजाराचा (पार्किंसन) परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो. ६५ वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला कंपवात असतो. वाढत्या वयोमानासह कंपवाताचेही रुग्ण वाढत आहेत. आज, ११ एप्रिल रोजी जागतिक कंपवात दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
अलिबाग – सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्या विरोधात अपशब्द काढले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गटातील) वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार थोरवे विरोधात आक्रमक झाली आहे.
पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महाेत्सवात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी कोकणातील १२ शेतकऱ्यांचे मोबाईल संच लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : उमरेड परिसरातील खाण परिसरातून १ मे रोजी देशभरात वीज-ऊर्जा निर्मितीसाठी जाणारा कोळसा रोखला जाईल. स्वतंत्र विदर्भाची मागणी व महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले.
पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून मिसळीच्या तयारीला सुरुवात झाली.
अमरावती : भारत ही जगातील बलवान अर्थव्यवस्था झाली आहे. विविध क्षेत्रांत विकास व अनेक संधी निर्माण होत आहेत. हा विकास पुढे नेण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती ही उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले. विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
वर्धा : शहरालगतच्या पुलफैल या झोपडपट्टी परिसरात घडलेली घटना दुर्दैवाची परिसीमाच ठरावी. गॅस सिलिंडर संपल्याने बाळू मसराम (२७) चूल पेटवण्यास बसला. एकाएकी चुलीतून आगीचा भडका उडाला आणि झोपडीवजा घराने पेट घेतला. त्यात बाळू होरपळून निघाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याची पत्नी व मुलगा घराबाहेर असल्याने ते वाचले.